भारत जोडो यात्रेकरिता या दोन मोठ्या नेत्यांना निमंत्रण, बाळासाहेब थोरात यांची माहिती

| Updated on: Oct 17, 2022 | 9:34 PM

भारत जोडो यात्रा राज्यात असताना उद्धव ठाकरे व शरद पवार यांनी येथं यावं. यात्रेमध्ये सहभागी व्हावं, अशी आम्ही त्यांना विनंती केली आहे.

भारत जोडो यात्रेकरिता या दोन मोठ्या नेत्यांना निमंत्रण, बाळासाहेब थोरात यांची माहिती
Follow us on

मुंबई : काँग्रेसचे नेते बाळासाहेब थोरात म्हणाले, अंधेरी पोटनिवडणुकीत भाजपनं माघार घेतली, ही चांगली गोष्ट आहे. नाहीतरी महाविकास आघाडीचा मोठा विजय निश्चित होता. एक चांगली परंपरा यामुळं घडली आहे, हे नाकारता येत नाही. यामुळं उद्धव ठाकरे यांचं अभिनंदन आम्ही सर्वांनी केलं आहे. महाविकास आघाडीचं वातावरण संपूर्ण राज्यात आहे. जनता महाविकास आघाडीच्या पाठीशी आहे. झालेला बदल त्यांना मान्य नाही. हे संपूर्ण वातावरणातून दिसते आहे.

याचा परिणाम असा होता की, अंधेरीत प्रचंड मोठा विजय महाविकास आघाडीचा झाला असता. भारत जोडो यात्रेकरिता आम्ही उद्धव ठाकरे यांना निमंत्रित केलं आहे. त्यांनी या यात्रेमध्ये यावं, सहभागी व्हावं, स्वागत करावं, यासाठी त्यांना विनंती केली.

शरद पवार यांनाही भेटण्याकरिता आम्ही जात आहोत. त्यांनासुद्धा भारत जोडो यात्रेसाठी निमंत्रित करतो आहोत. राहुल गांधी यांची पदयात्रा आहे. अत्यंत चांगल्या पद्धतीनं चालली आहे. प्रचंड प्रतिसाद या यात्रेला मिळतो आहे.

त्यामुळं महाविकास आघाडीचे मित्रपक्ष हेसुद्धा भारत जोडो यात्रेचं स्वागत करतील, असा आम्हाला विश्वास आहे, असंही बाळासाहेब थोरात म्हणाले.

माजी मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण म्हणाले, उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांची आज आम्ही भेट घेतली. राहुल गांधी यांच्या नेतृत्वातील भारत जोडो ही साडेतीन हजार किलोमीटरपेक्षा जास्त लांब यात्रा आहे.

महाराष्ट्रातील चार-पाच जिल्हे यात कव्हर होत आहेत. सहा तारखेला ती यात्रा येणं अपेक्षित आहे. भारत जोडो यात्रा राज्यात असताना उद्धव ठाकरे व शरद पवार यांनी येथं यावं. यात्रेमध्ये सहभागी व्हावं, अशी आम्ही त्यांना विनंती केली आहे.