मुंबईः आयपीएस अधिकारी अतुलचंद्र कुलकर्णी यांची गुरुवारी प्रतिनियुक्तीवर राष्ट्रीय तपास संस्थेचे (National Investigation Agency) अतिरिक्त महासंचालक (ADG) म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. याबाबतचे केंद्रीय गृह मंत्रालयाकडून (Home Minister)आदेश जारी करण्यात आले आहेत. केंद्रीय गृहमंत्रालयाकडून महाराष्ट्र सरकारला अतुलचंद्र कुलकर्णी यांना तात्काळ कार्यमुक्त करण्यासही सांगण्यात आले असल्याचे या आदेशामध्ये स्पष्ट म्हटले आहे.
Ips Atulchandra kulkrani is appointed as additional director of general in national investigation agency.
IPS Atul kulkarni is former ATS and CID chief..@TV9Marathi @NIA_India @maharashtra_hmo @CMOMaharashtra pic.twitter.com/xqNtqJKzlp
— Krishna Sonarwadkar कृष्णा सोनारवाडकर (@KrishnaSonarwa1) May 12, 2022
राष्ट्रीय तपास संस्थेचे पोलीस महानिरीक्षक हे पद आता तात्पुरते अतिरिक्त पोलीस महासंचालक पदावर श्रेणीसुधारित म्हणून करण्यात आले आहे. आणि कुलकर्णी यांची ही नियुक्ती एका वर्षाच्या कालावधीसाठी किंवा पुढील आदेश येईपर्यंत करण्यात आली आहे अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे.
कुलकर्णी हे 1990 च्या बॅचचे महाराष्ट्र केडरचे आयपीएस अधिकारी असून ते सध्या पुण्यात एडीजी म्हणून कारागृहात कार्यरत आहेत.
यापूर्वी ते महाराष्ट्र दहशतवाद विरोधी पथकाचे प्रमुख, राज्य गुन्हे अन्वेषण विभाग (CID) तसेच मुंबईतील सह पोलिस आयुक्त (गुन्हे) होते. मुंबईत पदस्थापना होण्यापूर्वी ते केंद्रात प्रतिनियुक्तीवर होते.
अतुलचंद्र कुलकर्णी यांची राज्याच्या कारागृह विभागाचे अतिरिक्त पोलीस महासंचालक होते. तर सध्या त्यांची एनआयएमध्ये नियुक्ती करण्यात आली असून राष्ट्रीय तपास संस्थेंकडून डी गँगशी संबंधित प्रकरणांचा तपास सुरू आहे..
अतुलचंद्र कुलकर्णी यांनी महाराष्ट्रात एटीएसप्रमुख म्हणूनही त्यांनी काही काळ काम केलं आहे. शिवाय ते राज्याच्या सीआयडी विभागाचेही प्रमुख राहिलेले आहे. त्यामुळे अतुलचंद्र कुलकर्णी यांची ही नियुक्ती महत्वाची मानली जात आहे.