मुंबई : पाटणाचे एसपी म्हणून आपल्या वेगळ्या शैलीत देशभरात प्रसिद्ध असलेले बिहार कॅडरचे डॅशिंग आयपीएस अधिकारी शिवदीप लांडे यांच्या ‘वुमन बिहाईंड दी लायन’ यांचे पुस्तक प्रकाशित झाले आहे. या पुस्तकात लांडे यांनी आपल्या बालपणीच्या आठवणींना उजाळा दिला आहे. अकोला जिल्ह्यातील परसा गावात एका शेतकरी कुटुंबात शिवदीप लांडे यांचा जन्म झाला. शेतकरी कुटुंबात जन्माला आल्यामुळे लहानपणी जे खडतर आयुष्य आपल्या वाट्याला आलं, त्याचा उलगडा लांडे यांनी आपल्या पुस्तकात केला आहे.
शिवदीप लांडे आपलं पुस्तक तीन रुपात मांडणार आहेत. लहानपण, आयपीएस पदापर्यंतचा प्रवास आणि त्यानंतर आयपीएस बनल्यानंतरचा प्रवास. शिवदीप लांडे यांचा महाराष्ट्रातील पाच वर्षाचा डेप्युटेशनचा कालावधी 26 नोव्हेंबर 2021 रोजी संपला असून ते मंगळवारी बिहारमध्ये जॉईन होणार आहेत.
माझ्या लहानपणाचा मला उध्वस्त करू पाहणारा काळ आधी लोकांसमोर ठेवण गरजेचं होतं म्हणून मी स्वतः पुस्तक लिहायला घेतलं. माझी आईच माझी हिरो आहे आणि तिची कहाणी लोकांना कळणं गरजेचं आहे, लांडे यांनी पुस्तकाबाबत प्रतिक्रिया देताना म्हटलं आहे. पुस्तकाच नाव ‘वूमन बिहायइंड द लायन’ असं पुस्तकाचं नाव ठेवलंय, मात्र त्यात असणारा लायन मी स्वतः नाहीये तर माझ्या वर्दीवर असणारा लायन आहे, असे लांडे यांनी सांगितले.
प्रत्येक जण सांगत राहतो मी हे केलं ते केलं मी हे ऑपरेशन केलं ते ऑपरेशन केलं पण वास्तव कोणी मांडू पाहत नाही म्हणून मी वास्तव मांडण्याचा निर्णय घेतला. मागच्या काही वर्षांत माझ्यावर चित्रपट बनवण्यासाठी आणि पुस्तकासाठी अनेक जणांकडून प्रयत्न सुरू होते. लांडे यांचं बालपण, त्यांच्या वाट्याला आलेला संघर्ष आणि त्यावेळी त्यांच्या कुटुंबांच्या वाट्याला आलेल्या गोष्टी ‘वूमन बिहाइंड द लायन’ या पुस्तकात त्यांनी प्रामाणिकपणे मांडल्या आहेत.
मी ज्यावेळी बिहार जॉईन केलं तव्हा तिथे 18 जिल्ह्यात नक्षलवादी होते आता फक्त तीन जिल्ह्यात त्यांचं अस्तित्व उरलंय. फिटनेस हा पोलीस अधिकाऱ्याला खूप महत्वाचा आहे. 0.4 च्या स्पीडने बाजूने गोळी जाते त्यामुळे तिथे रिटेक करता येत नाही म्हणून फिटनेस खूप महत्वाचा आहे. बिहारला जाऊन पुन्हा एकदा तितक्याच आत्मीयतेने काम करायचंय. मी माझी सर्व्हिस निस्वार्थपणणे आजवर करत आलो आणि यापुढेही करत राहीन, असे लांडे म्हणाले.
मी लग्न करायचं ठरवलच नव्हतं पण करावं लागलं. माझं लग्न गव्हर्नर डी वाय पाटील यांच्यामुळे झालं. मुलगी बघायला ये, लग्न कर यासाठी त्यांनीच तसदी घेतली आणि मी लग्न केलं. महाराष्ट्राच्या मातीत 5 वर्षे काम करायला मिळाले. हा अनुभव माझ्यासाठी खूप चांगला होता. 2017 साली मी अंमली पदार्थ विरोधी पथकात पदभार सांभाळला आणि ड्रग्सविरोधात एक वेगळी मोहीम उघडली. 2017 सालीच ड्रग्सविरोधात एक वेगळं रेकॉर्ड झालं, सर्वाधिक कारवाया, ड्रग्स जप्त करणं, आरोपीना अटक करणं याच वेगळा रेकॉर्ड बनवला. मुंबईत 2017 साली मी माझ्या पत्नी आणि मुलीमुळे आलो. बिहारनंतर त्यांनी इथेच राहण्याचा निर्णय घेतला त्यामुळे मी इथे आलो.
बिहारमध्ये होतो तेव्हा मराठी – बिहारी असा बराच वाद होता. त्यात एक मराठी अधिकारी म्हणून हे वाद मिटवण्यासाठी प्रयत्न केला होता. त्यात मी यशस्वी झालो, लोकांचं भरभरून प्रेम मला मिळालं. 2017 ला जेंव्हा मी इथे आलो तेव्हा अंमली पदार्थ विरोधी पथकात मी आलो तेव्हा बेबी पाटणकरची केस चर्चेत होती आणि ANC चे सात अधिकारी आतमध्ये गेले होते. अशा परिस्थितीत अंमली पदार्थ विरोधी पथकात पुन्हा चैतन्य आणणं आणि तिथल्या अधिकाऱ्यांमध्ये नव्याने काम करण्याची तयारी आणणं महत्वाचं होतं. यासाठी मी कारवाईला सुरुवात केली.
अनेक महत्वाची प्रकरणं हाताळली, मोठं सिजर केलं, फेंटानीलची केलेली केस ही जगातली मोठी केस होती असं मी आजही सांगतो. मी ड्रग्ससंदर्भात त्यावेळीच ही मोहीम उघडली होती. सप्लाय चैन तुटली पाहिजेत हे माझं ध्येय त्यावेळीच होतं. मला फक्त एकाच गोष्टीची खंत आहे ती म्हणजे मला भारतात ड्रग्स सप्लाय करणारा एक मोठा किंगपीन आणता आला नाही. परदेशात टीम गेली होती पण लॉकडाऊन असल्यामुळे ते ऑपरेशन सक्सेसफुल झालं नाही.
एटीएसला डीआयजी म्हणून काम केलं तेंव्हा मला निसर्गाचा न्याय पाहायला मिळालं. भरतीच्या वेळी त्यावेळी मनसुखचा मृतदेह बाहेर आला आणि एटीएसकडे तपास आला. यामध्ये मनसुखची हत्या झाल्याचा मोठा निष्कर्ष हा एटीएसनेच काढला आणि हत्येचा गुन्हा दाखल केला. तपासाची दिशा एका महत्त्वाच्या टप्प्यावर एटीएसनेच आणून ठेवली. NIA च्या चार्जशीटमध्येही एटीएसचा अनेकदा उल्लेख पाहायला मिळेल.
शिवदीप वामनराव लांडे हे 2006 च्या बॅचचे आयपीएस अधिकारी आहेत. बिहार कॅडरचे अधिकारी असलेले लांडे ह सध्या महाराष्ट्रात कार्यरत आहेत. एका शेतकऱ्याच्या पोटी जन्म घेतलेले शिवदीप लांडे शिक्षणात हुशार होते. शिष्यवृत्ती मिळवून त्यांनी इंजिनिअरिंगचे शिक्षण पूर्ण केले. मुंबईत यूपीएससीचे शिक्षण घेतले. त्यानंतर बिहार कॅडरमध्ये आयपीएस म्हणून निवड झाली. बिहारमधील मुंगेर जिल्ह्यातील नक्षलग्रस्त जमालपूरमध्ये पहिल्यांदा पोस्टिंग मिळाली. पाटणाचे एसपी म्हणून वेगळ्या शैलीमुळे देशभरात प्रसिद्ध झाले. तसेच ते शिवसेना नेते आणि माजी मंत्री विजय शिवतारे यांचे जावई आहेत. (IPS officer Shivdeep Lande’s book published, Read Lande’s interview in this regard)
इतर बातम्या