मुंबई: मुंबई महापालिका आयुक्त प्रवीण परदेशी यांना हटवण्यात (Iqbal Chahal to replace BMC commissioner Praveen Pardeshi) आलं आहे. मुंबईतील कोरोनावर नियंत्रण न मिळवल्याने त्यांची बदली करण्यात आल्याचं सांगण्यात येत आहे. प्रवीण परदेशींच्या जागी नगरविकास खात्याचे प्रधान सचिव इक्बाल चहल यांची नियुक्ती करण्यात आली आहे. (Iqbal Chahal to replace BMC commissioner Praveen Pardeshi)
इक्बाल चहल हे 1989 च्या बॅचचे आएएस अधिकारी आहेत. त्यांचा प्रशासकीय अनुभव दांडगा आहे. आशियातील सर्वात मोठी झोपडपट्टी असलेल्या मुंबईतील धारावी पुनर्विकास प्रकल्पाचे मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून त्यांनी काम पाहिलं आहे. सध्या इक्बाल चहल हे नगरविकास खात्याचे प्रधान सचिव आहेत. मात्र त्यांचा धारावीतील कामाचा अनुभव सध्या तिथला कोरोनो रोखण्यासाठी कामी येतो का हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.
इक्बाल चहल यांनी म्हाडाचे अध्यक्ष, उत्पादन शुल्क आयुक्त, औरंगाबाद आणि ठाणे जिल्ह्याचे जिल्हाधिकारी म्हणूनही काम पाहिलं आहे.
इक्बाल चहल हे शारिरिकदृष्ट्या फिट असलेले आयएएस अधिकारी म्हणून ओळखले जातात. चहल हे 2004 पासून मुंबई मॅरेथॉनच्या शर्यतीत भाग घेतात.
कोण आहेत इक्बाल चहल? (Who is new BMC commissioner Iqbal Chahal )
प्रवीण परदेशींना हटवलं
मुंबई महापालिका आयुक्त प्रवीण परदेशी यांना हटवण्यात (BMC commissioner Praveen Pardeshi transferred) आलं आहे. ठाकरे सरकारने मुंबई महापालिका आयुक्त प्रवीणसिंह परदेशी यांची बदली केली आहे. मुंबईतील कोरोना रुग्णसंख्या आवरत नसल्याने ही कारवाई केल्याचं सांगण्यात येत आहे.
संबंधित बातम्या
BMC commissioner transferred | मुंबई महापालिका आयुक्त प्रवीण परदेशींना हटवलं