जळगावः भाजपमधून राष्ट्रवादीत आलेले आमदार एकनाथ खडसे (MLA Eknath Khadase) यांचे नाव जळगाव दुध संघप्रकरणी पुन्हा एकदा चर्चेत आले होते. जळगाव दुध संघात आर्थिक घोटाळा (Financial fraud) झाल्याचा आरोप एकनाथ खडसे यांच्यावर करण्यात आले होते. जळगाव जिल्हा दूध संघात (Jalgaon District Milk Sagh) 10 कोटीचा निधी शासनाची परवानगी न घेता संचालक मंडळांनी परस्पर खर्च केल्याच्या कारणावरून शासनाने याबाबत कारवाईचे आदेश देण्यात आले आहेत. त्यामुळे एकनाथ खडसे गटाला शिंदे सरकारकडून हा पुन्हा एक मोठा धक्का मानला जात आहे. मात्र याबाबत एकनाथ खडसे आणि दूध संघाची चौकशी लावून काही मिळणार नाही, दुसरं काहीतरी नवीन शोधा अशी खोचक टीका करुन एकनाथ शिंदे यांनी सरकारवर निशाणा साधला आहे.
यावेळी त्यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे नाव न घेता त्यांच्यावरही निशाना साधण्यात आला. भाजपमधून राष्ट्रवादी येण्याआधीपासून त्यांनी देवेंद्र फडणवीसांवर निशाना साधला आहे. त्यामुळे आता ही त्यांंनी नाव न घेता देवेंद्र फडणवीसांवर निशाना साधला आहे.
दरम्यान नाथाभाऊला आणखी किती बदनाम करणार असा सवालदेखील एकनाथ खडसे यांनी यावेळी उपस्थित केला आहे. एकनाथ खडसे व दुध संघाच्या संचालकांना बदनाम करण्याची हे षडयंत्र असल्याचा आरोपही एकनाथ खडसे यांनी केला आहे. याबाबत न्यायालयात दाद मागणार असून दोशी असेल त्याला शिक्षा होईलच असेही यावेळी त्यांनी सांगितले.
दुध संघाविषयी बोलताना त्यांनी सांगितले की, ज्या प्रकरणी दूध संघावर प्रशासक नेमण्यात आला आहे, त्याप्रकरणावर एकनाथ खडसे म्हणाले की, जिल्हा दूध संघावर नियुक्त करण्यात आलेले प्रशासक यांचा दुरांन्वयेसुद्धा दूध संघाशी संबंध नसल्याची टीका त्यानंनी प्रशासक मंडळावर केली आहे.
एकनाथ खडसे व दूध संघाचा संचालकांना बदनाम करण्याचं षडयंत्र सुरू असल्याचा आरोप एकनाथ खडसे यांच्याकडून करण्यात आला आहे. यावेळी त्यांनी बोलतान सांगितले की, दूध संघाची चौकशी करा या प्रकरणी जो दोषी असेल त्याला शिक्षा ही होईलच असंही त्यांनी यावेळी सांगितले, जळगाव दूध संघाविषयी ज्या काही अफवा पसरवण्यात येत आहेत, त्यातून हेतू पुरस्सर बदनाम करण्याच प्रयत्न चालू असल्याचेही त्यांनी सांगितले.