मुंबई: परिवहन मंत्री अनिल परब यांना ईडीची नोटीस आली आहे. तर शिवसेना खासदार भावना गवळी यांच्या संस्थावर ईडीने धाडी टाकल्या आहेत. त्यावरून राज्याचे जलसंपदा मंत्री आणि राष्ट्रवादीचे नेते जयंत पाटील यांनी भाजपला सुनावले आहे. ईडीच्या नोटिसा पाठवून आघाडीचा आवाज दाबण्याचा हा प्रयत्न आहे. मात्र, आम्ही त्याला बळी पडणार नाही, अशा शब्दात जयंत पाटील यांनी सुनावले आहे. (jayant patil slams bjp over temple reopening agitation)
जयंत पाटील यांनी मीडियाशी संवाद साधताना भाजपवर जोरदार टीका केली. महाविकास आघाडीच्या वेगवेगळ्या नेत्यांना नोटीसा पाठवल्या जात आहेत. हे भाजपचे राजकारण आहे. महाविकास आघाडीचा आवाज दाबण्याचा हा प्रयत्न असल्याचे दिसून येते. खासदार भावना गवळी यांच्याकडे छापे पडले हे माझ्या कानावर आले आहे. पण महाविकास आघाडीचे नेते अशा प्रकारच्या दबावाला बळी पडणार नाहीत, असा इशारा पाटील यांनी दिला.
परिवहन मंत्री अनिल परब यांनाही नोटीस दिल्याचं समजलं. परब त्याला कायद्याने उत्तर देतील. मात्र, परब यांच्याशी माझी अद्याप कोणतीही चर्चा झाली नाही, असं त्यांनी स्पष्ट केलं.
भाजपने आज मंदिरं उघडण्यासाठी आंदोलन केलं. त्यावरून त्यांनी भाजपवर जोरदार हल्ला चढवला. मंदिर उघडण्यास संदर्भात भाजपची मागणी असली तरी कोरोनाचा फैलाव होऊ नये अशा पद्धतीचे नियम आहेत. त्यामुळे कोरोनाचे नियम पाळून सर्व परवानगी दिली जात आहे. त्यासंदर्भात मुख्यमंत्री निर्णय घेतील. मंदिरं उघडण्याच्या मुद्द्यावरून भाजपचं राजकारण सुरू आहे, असं ते म्हणाले.
यावेळी त्यांनी अलमट्टी धरणाबाबतही माहिती दिली. अलमट्टी धरणाची उंची वाढवण्यासंदर्भात संदर्भात कुठलाही प्रस्ताव आलेला नाही. कर्नाटक सरकारकडून आम्हाला अधिकृत माहिती आलेली नाही. त्याबाबत चर्चा करूनच निर्णय घेता येईल, असं त्यांनी स्पष्ट केलं. (jayant patil slams bjp over temple reopening agitation)
MahaFast News 100 | महाफास्ट न्यूज 100 | 7 AM | 30 August 2021 https://t.co/ZKb2sr6sXN #News #bulletin
— TV9 Marathi (@TV9Marathi) August 30, 2021
संबंधित बातम्या:
ईडीच्या धाडी, भाजपचे हल्ले, शरद पवारांनी राष्ट्रवादीच्या मंत्र्यांची बैठक बोलावली!
भावजयी शेतात शौचास गेली म्हणून दीर भडकला, आधी शिवीगाळ, नंतर भावासोबत हाणामारी, मरेपर्यंत मारलं
(jayant patil slams bjp over temple reopening agitation)