मुंबई : बालवीर मालिकेत ‘ज्वाला परी’ची भूमिका निभावणारी आघाडीची अभिनेत्री खुशबू मुखर्जीच्या (खुशी मुखर्जी) घरात चोरी झाली आहे. शुक्रवारी (16 ऑक्टोबर) रात्री हा चोरीचा प्रकार घडला असून, चोरीत जवळपास 2 लाख किमतीचे सोन्याचे दागिने अज्ञाताने चोरले आहेत. खुशबू मुखर्जी मालाड पश्चिमच्या जनकल्याण नगरमधील मरीना प्लाझा इमारतीत राहते. याच इमारतीतील तिच्या 301 नंबरच्या फ्लॅटमध्ये शुक्रवारी (16 ऑक्टोबर) रात्री हा प्रकार घडला. (Jewelery of worth 2 lakh stolen from actress Khushboo Mukherjee’s house)
मिळालेल्या माहितीनुसार, खुशबू मुखर्जी ही मालाड पश्चिमच्या प्लाझा इमारतीत राहते. तिथे तिचा फ्लॅट आहे. याच फ्लॅटमध्ये शुक्रवारी रात्री तिने फोटोशुटचे आयोजन केले होते. यावेळी फोटोशूसाठी बाहेरुन तीन जण आले होते. त्यानंतर फोटोशुट झाल्यानंतर अभिनेत्री खुशबूच्या घरातील जवळपास 2 लाख किमतीचे सोन्याचे दागिने चोरीला गेले. खुशबू मुखर्जीला हे कळताच तिने पोलिसात धाव घेतली. खुशबूने मालवणी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली असून, पोलिसांनी भादविच्या कलम 380 अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे.
दरम्यान, अभिनेत्री खुशबू मुखर्जी ही लोकप्रिय अभिनेत्री आहे. बालवीर मालिकेत तिने ज्वाला परीची भूमिका केलेली आहे. तिच्या या भूमिकेमुळे घराघरात तिचे चाहते आहेत. रहस्यमय पद्धतीने झालेल्या या चोरीनंतर सर्वांकडून आश्चर्य व्यक्त केले जात आहे. तसेच, चोरी फोटोशुटसाठी आलेल्या तिघांनी केली ? की तिच्या घरच्यांनीच कुणीतरी दागिने पळवले? हा प्रश्न अजूनही अनुत्तरीत आहे. तर दुसरीकडे मालवणी पोलिसांनी प्रकरणाची कसून चौकशी सुरु केली असून, लवकरच आरोपीला बेड्या ठोकण्याचा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे.
संबंधित बातम्या :
नागपुरात ‘इराणी’ चेन स्नॅचर्सच्या मुसक्या आवळल्या, चोरीसाठी वापराचये ‘ही’ स्पेशल टेक्निक
सावधान! तुमचा डेटा चोरी होतोय, Google play store वरुन 34 अॅप्स हटवले
चोराचं धाडस बघा ! चक्क कोरोना रुग्णालयात जाऊन करायचा चोरी; पोलीसही अवाक
(Jewelery of worth 2 lakh stolen from actress Khushboo Mukherjee’s house)