Housing Project : मोठी बातमी, पनवेलमध्ये उभी रहाणार एमएमआर रिजनमधली सर्वात मोठी टाऊनशिप, जितेंद्र आव्हाडांची घोषणा, आडवली चेहरामोहरा बदलणार

| Updated on: Jun 27, 2022 | 9:13 PM

आडवली येथे महाराष्ट्र शासनाची 63.17 हेक्टर इतकी जमीन आहे. या जमिनीवरती एकात्मिक गृहनिर्माण प्रकल्प मंजूर केला आहे. त्या प्रकल्पाला गरजेचा सार्वजनिक प्रकल्प म्हणून आज जाहीर करण्यात आला आहे.

Housing Project : मोठी बातमी, पनवेलमध्ये उभी रहाणार एमएमआर रिजनमधली सर्वात मोठी टाऊनशिप, जितेंद्र आव्हाडांची घोषणा, आडवली चेहरामोहरा बदलणार
पनवेलमध्ये उभी रहाणार एमएमआर रिजनमधली सर्वात मोठी टाऊनशिप
Follow us on

मुंबई : शिळफाटापासून काही अंतरावर असलेल्या पनवेल तालुक्यातील आडवली गावात एकात्मिक गृहनिर्माण प्रकल्पा (Housing Project)ला मंजुरी मिळाली आहे. आडवली येथे महाराष्ट्र शासनाची 63.17 हेक्टर इतकी जमीन आहे. या जमिनीवरती एकात्मिक गृहनिर्माण प्रकल्प मंजूर केला आहे. त्या प्रकल्पाला गरजेचा सार्वजनिक प्रकल्प म्हणून आज जाहीर करण्यात आला आहे. मंत्री जितेंद्र आव्हाड (Jitendra Avhad) यांनी ट्विट करुन ही घोषणा केली आहे. तसेच पनवेलमध्ये MMR रिजनमधील म्हाडाची ही सर्वात मोठी टाऊनशीप (Township) असणार आहे, असेही ते म्हणाले. या प्रकल्पामुळे आडवली गावचा चेहरामोहराच बदलणार आहे.

केंद्रीय लोकसेवा आयोग अधिकाऱ्यांनाही दिलासा

2011 पासून राज्यातील केंद्रीय लोकसेवा आयोगामार्फत (UPSC) नियुक्त अधिकाऱ्यांना कुठेही घर मिळाले नाही. घराबाबतची शेवटची प्रक्रिया ही 2011 साली झाली होती. आता मात्र 350 सदनिकांच्या एकत्रित गृहनिर्माण प्रकल्पाला मी आज मंजुरी दिली. सदरच्या योजनेचे बांधकाम हे म्हाडामार्फत केले जाईल. राज्यातील 2017 पर्यंत केंद्रीय लोकसेवा आयोगाने (UPSC) महाराष्ट्रात आलेले अधिकारी ह्यांना या निमित्ताने घराबाबत सुटकेचा निश्वास टाकता येईल, असा दिलासा जितेंद्र आव्हाड यांनी दिला आहे.

बीबीडी चाळवासीयांना आवाहन

माननीय मुख्यमंत्री उद्धव ठाकरेजी आणि माझे नेते शरद पवारसाहेब ह्यांच्या सल्ल्यानुसार बीडीडी चाळीतील निवृत्त पोलीस कर्मचाऱ्यांना कायम स्वरूपी घर नावावर करून देण्यात आले. आता ती घर 50 लाख ऐवजी 25 लाख रुपयात देण्यात येतील. आता घर रिकामी करा आणि प्रकल्प पुढे जाऊद्यात, असे आवाहनही जितेंद्र आव्हाड यांनी बीडीडी चाळवासीयांना केले आहे. (Jitendra Awhad announced the integrated housing project in Panvel as a public project)