विधानसभा निवडणुकीपूर्वी राज्यात महायुती आणि महाविकासा आघाडीतील नेत्यांमध्ये वाकयुद्ध रंगले आहे. दोन्ही गोटातून गोटमार करण्यात येत आहे. शाब्दिक टीकांनी एकमेकांना घायाळ करण्यात येत आहे. शुक्रवारी टीव्ही 9 मराठीच्या कॉन्क्लेव्हमध्ये उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शरद पवार यांच्यावर टीका केली होती. महाविकास आघाडीत कोण मुख्यमंत्री होणार यावरुन त्यांनी टीका केली होती. त्याला आज जितेंद्र आव्हाड यांनी चोख प्रत्युत्तर दिले.
काय म्हणाले होते फडणवीस?
शुक्रवारी देवेंद्र फडणवीस यांची टीव्ही9 मराठीचे व्यवस्थापकीय संपादक उमेश कुमावत यांनी मुलाखत घेतली होती. त्यात फडणवीस यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर टीका करताना शरद पवार यांच्या मनात काय सुरू आहे, याचा अंदाज व्यक्त केला होता. महाविकास आघाडीचा मुख्यमंत्रीपदाचा चेहरा घोषित करावा आणि तो आपला असावा यासाठी उद्धव ठाकरे तीन दिवस दिल्लीत तळ ठोकून होते. त्यांनी सोनिया गांधी यांच्याबरोबर चर्चा केली. पण बैठकीचे छायाचित्र काढण्यास परवानगी दिली नाही. दिल्लीत उद्धव ठाकरे यांच्या हातात काहीच लागले नाही. आता तर शरद पवार यांनी पण स्पष्ट केले आहे की, मुख्यमंत्री पदाचा चेहरा असणार नाही. काँग्रेसचे नाना पटोले यांनी पण तीच री ओढली. उद्धव ठाकरे यांच्या मनात जे आहे, ते घडून येताना दिसत नाही. शरद पवारांच्या डोक्यात कुणाला मुख्यमंत्री करायचे? हे शिजत आहे. त्यांच्या डोक्यात जे तीन-चार चेहरे आहेत, त्यात उद्धव ठाकरे यांचा चेहरा नक्कीच नाही, असे फडणवीस म्हणाले.
जितेंद्र आव्हाड यांचा खोचक टोला
जितेंद्र आव्हाड यांनी फडणवीस यांच्या या वक्तव्याचा खरपूस समाचार घेतला. त्यांनी फडणवीस यांच्यावर पलटवार केला. शरद पवारांच्या मनात काय हे त्यांच्या बायकोला उभ्या महाराष्ट्राला माहिती नसते तर देवेंद्रंना काय माहिती असणार असा पलटवार आव्हाड यांनी केला आहे.
खोलवर झालेल्या जखमेचा वर्ण जात नाही
आज गणेशोत्सव निमित्त आलो होतो माहिती घेतली ते येणार होते, मी आलो. भेट घेतली. मुख्यमंत्र्यांसोबत चर्चा कशी होणार त्यांच्या घरी गर्दी खूप होती, असे ते म्हणाले. सुप्रिया ताईंचे तसे वक्तव्य नव्हते, त्या असं कधीच बोलत नाहीत, पत्रकारांनी चुकीची माहिती दिली
आमचे वैचारीक मतभेद आहेत पण मैत्री आहेत. आमची मैत्री आहे पण मुख्यमंत्री झाल्या पासून त्यांचे मित्र वाढलेत असे आव्हाड म्हणाले. खोलवर झालेल्या जखमेचा वर्ण जात नाही, असा चिमटा त्यांनी अजितदादा यांना काढला.