राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे नेते, आमदार जितेंद्र आव्हाड यांनी अजित पवार यांची भेट घेऊन निधीची मागणी केल्याचं म्हणटं आहे. अजित पवार यांना मी तीन वर्ष भेटलो. निधी द्या, असे सांगितलं. मात्र त्यांनी लक्ष दिले नाही. मात्र त्यानंतर अजित पवार पक्षातून बाहेर पडले आणि मी त्यांच्यावर तोफ डागली. त्यामुळे आता हे होणारच आहे. त्यामुळे आता त्यांना माझ्या विरोधात कोणीतरी उभा करायचं आहे. एक आमदार पैसे मागत असताना अजित पवार यांनी दिले नाहीत. पैसे देऊन अख्ख्या मुंब्य्रातील जनतेला विकत घेणार का? हे न समजण्या इतकं जनता मूर्ख नाही. त्यांचे आमदार आमचे दरवाजे का ठोकत आहेत. आमदारांना निधी न देता जो साधा नगरसेवक नाही. त्याला निधी देण्यात आला, असं जितेंद्र आव्हाड म्हणालेत.
एमएमआरडीए एकही अधिकार आला नाही. मागच्या एक वर्ष पत्र व्यवहार करत आहोत. काही उपयोग नाही. अधिकाऱ्यांचे लक्ष नाही. मागच्या काही दिवसांपूर्वी रेडीमिक्स टँकर पलटी झाला. अजूनही ती भिंत बांधली गेली नाही. कॉन्ट्रॅक्टरला भिंत बांधण्यासाठी का थांबवण्यात आलं? तिथे पंधरा-वीस मुलं कायम खेळत असतात नशिबाने एकच मुलगा गेला. मात्र तिथे जर मुलं खेळत असती. तर काय झालं असतं. शासनाला वेदना , संवेदना, भावना नाहीत. आगामी अधिवेशनात हा मुद्दा मी काढणारच आहे, असं म्हणत म्हणत जितेंद्र आव्हाड यांनी मुंब्रा अपघातावर प्रतिक्रिया दिली आहे.
जितेंद्र आव्हाडांना अडचणीत आणण्यासाठी अजित पवार प्रयत्न करत असतात. त्यांची मानसिकता स्पष्ट होते. ते इतक्या कोत्या मनोवृत्तीचे असतील असं वाटलं नव्हतं. पण मला गद्दारीबद्दल प्रचंड राग आहे. तुम्हाला खर हरवलं ते महाराष्ट्र मातीने… जी पोलखोल करायची ती करा. मी कोणाच्या बापाला घाबरत नाही. आव्हान आहे करा पोल खोल करा, असं जितेंद्र आव्हाड म्हणाले.
अयोध्येतील राम मंदिरात पाणी गळत आहे. राम लल्लावर पण पाणी गळत आहे. तिथल्या महंतांनी हा व्हीडिओ पाठवला आहे, असं म्हणत जितेंद्र आव्हाडांनी अयोध्येतील राम मंदिरातील व्हीडिओ माध्यमांना दाखवला आहे.