बेळगाव : कर्नाटकातील कलबुर्गीच्या ( Kalburgi ) दहावीत शिकणाऱ्यांना एका शाळकरी विद्यार्थीनीने महिलांच्या सुरक्षेसाठी अनोखे (Anti-rape footwear ) उपकरण तयार केले आहे. तिने अशा प्रकारच्या चपला तयार केल्या आहेत, ज्यामुळे हल्लेखाेरापासून महिलांना स्वत:चा बचाव करता येणार आहे.
लैंगिकविकृतांपासून महिलांना सुरक्षा प्रदान करणाऱ्या चप्पलांची तिने निर्मिती केली आहे. या चपला घालून महिलांना आता बिनधास्तपणे घराबाहेर पडता येणार आहे. या चप्पलामध्ये करंट तयार होत असून त्यामुळे हल्लेखोराला लाथ मारताच त्यातून तयार झालेला करंट हल्लेखाेर गोंधळ जाऊन निष्क्रीय होईल असे तिने म्हटले आहे.
महीलांना स्वसंरक्षण करताना या आधुनिक तंत्राची मदत मिळणार आहे. कलबुर्गीच्या दहावीत शिकणाऱ्या विजयलक्ष्मी बिरादर या विद्यार्थीने या अनोख्या फूटवेअरची निर्मिती केली आहे. विजयलक्ष्मी बिरादर हीला अलिकडेच गोवा येथे भरलेल्या इंटरनॅशनल इन्वेशन अॅण्ड इनोव्हेंशन एक्स्पो अवार्डमध्ये गौरवण्यातही आले आहे.
विजयलक्ष्मी बिरादर हीने विकसित केलेल्या या अॅण्टी रेप फुटवेअरमध्ये बॅटरींचा वापर केला आहे. त्यामुळे हल्लेखोराशी प्रतिकार करताना या चपलांचा फायदा होणार आहे. यातून बाहेर पडणाऱ्या विद्युत लहरींमुळे हल्लेखोराला करंट बसेल. तसेच या फुटवेअरमध्ये जीपीएस सिस्टीम बसविण्यात आल्याने नातेवाईकांना संदेश जाऊन ठिकाण कळण्यास मदत होईल असे विजयलक्ष्मी हीचे म्हणणे आहे. विजयलक्ष्मी सातवीत असल्यापासून या प्रकल्पावर काम करीत होती.
बाजारात महिलांच्या सुरक्षेसाठी अनेक उपकरणे आली आहेत. स्मार्ट वॉचेस, बेल्ट सारखी उपकरणांचा समावेश आहे. परंतू या वस्तू तुम्ही घरी विसरण्याची जास्त शक्यता असते. परंतू चपला तर तुम्हाला घरातून बाहेर पडताना घालाव्या लागतातच त्यामुळे हे डिव्हाईस अधिक उपयोगाचे असल्याचे विजयलक्ष्मी हीचे म्हणणे आहे.