कल्याण : अभ्यास करत नाही म्हणून वडील रागावल्याने एका 13 वर्षीय मुलगा घर सोडून (Kalyan GRP Found Minor) ट्रेनमध्ये बसला आहे, इतक्या माहितीच्या आधारे जीआरपी पोलिसांनी हरवलेल्या मुलाला अवघ्या तीन मिनिटात शोधून काढलं (Kalyan GRP Found Minor).
कल्याण जीआरपी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरिक्षक वाल्मिक शार्दूल यांना पो लीस नियंत्रण कक्षाद्वारे माहिती मिळाली होती की, “पालघर मध्ये राहणारा एक 13 वर्षाचा मुलगा अजमेर म्हैसूर या एक्सप्रेस गाडीने जाण्यास निघाला आहे”. ही माहिती पोलिसांना मिळाली तेव्हा पोलिसांच्या हाती केवळ दहा मिनिटांचाच अवधी होता. कारण दहा मिनिटात कल्याण रेल्वे स्थानकात ही एक्सप्रेस गाडी येणार होती. कल्याण जीआरपीचे पोलीस अधिकारी डी.आर. साळवे हे पोलीस पथकासह रात्री 12.30 वाजता स्थानकात सज्ज झाले.
ही गाडी कल्याण स्थानकात केवळ चारच मिनिटे थांबते. त्यामुळे पोलिसांजवळ फक्त चार मिनिटांचा अवधी होता. मुलाच्या पालकांनी मुलाचा फोटो पोलिसांना व्हॉटसअॅपवर पाठवला होता. गाडी स्थानकात येताच पोलिसांनी गाडीचा ताबा घेतला. मुलाचा शोध घेतला. पोलिसांकडे असलेला मुलाचा फोटा पाहून त्यांनी एका 13 वर्षीय मुलाला हटकले. तेव्हा त्याने तो काकासोबत बाहेर जात असल्याचे सांगितले. फोटोतील मुलगा हाच असल्याने पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले.
अभ्यास करण्याच्या कारणावरुन वडील रागावले म्हणून तो मुलगा निघून गेला होता, अशी प्राथमिक माहिती पोलिसांकडे असल्याचं पोलीस निरिक्षक योगेश देवरे यांनी सांगितलं. जीआरपी पोलिसांनी अवघ्या तीन मिनिटात या मुलाला शोधून काढले आहे. मुलाचे नाव अनुव्रत त्रिपाठी आहे. मुलाचे वडील राजेश त्रिपाठी यांनी पोलिसांचे आभार मानले आहेत. पालक आल्याने पोलिसांनी मुलाला पालकांच्या ताब्यात दिले. हा मुलगा सापडल्याने आई वडिलांचा जीव भांड्यात पडला.
कल्याणचा इश्कबाज चोरटा; पाच गर्लफ्रेंड्सची हौस भागविण्यासाठी मोबाईल चोरीhttps://t.co/WturhM1X90#KalyanNews #CrimeNews #kalyanpolice
— TV9 Marathi (@TV9Marathi) October 29, 2020
Kalyan GRP Found Minor
संबंधित बातम्या :
लोकलमधून चोरट्याचा बिनबोभाट प्रवास; मोबाईल चोरताना प्रवाशांकडून चोप; कल्याणमधील धक्कादायक प्रकार
भाईचा बड्डे पडला महागात ! बारा मित्रांचे पोलिसांनी वाजवले बारा