कल्याण : चोरी गेलेले आणि हरवलेले 27 महागडे मोबाईल कल्याणच्या खडकपाडा पोलिसांनी नागरिकांना (Kalyan Police Found Theft-Missing Mobile) परत केले आहेत. दिवाळीच्या शुभमुहूर्तावर नागरिकांना मोबाईल परत मिळाल्याने त्यांनी पोलिसांचे आभार व्यक्त केले. विशेष म्हणजे 2019 च्या पुरात हरवलेला मोबाईल सुद्धा पोलिसांनी शोधून काढला आहे (Kalyan Police Found Theft-Missing Mobile).
कल्याण-डोंबिवलीत गेल्या काही दिवसांपासून मोबाईल स्नॅचिंग आणि चोरीच्या घटना वाढल्या आहेत. कल्याणचे अप्पर पोलीस आयुक्त दत्तात्रय कराळे आणि पोलीस उपायुक्त विवेक पानसरे यांच्या नेतृत्वात पोलीस पथक तयार करुन सर्व गुन्हे उघडकीस आणण्याचा प्रयत्न सुरु आहे. गेल्या काही दिवसात पोलिसांनी अनेक मोबाईल स्नॅचर आणि घरफोडी करणाऱ्या चोरट्यांना अटक केली आहे. त्यांच्याकडून चोरी केलेल्या वस्तूसुद्धा पोलिसांनी हस्तगत केल्या आहेत.
कल्याणच्या खडकपाडा पोलीस ठाण्यात चोरीला गेलेले आणि हरवलेले मोबाईलचा तपास सुरु होता. अखेर पोलिसांनी 27 महागडे मोबाईल चोरट्यांकडून हस्तगत केले आहेत. यामध्ये हरविलेले मोबाईल सुद्धा आहेत. आज पोलीस उपायुक्त विवेक पानसरे आणि खडकपाडा पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरिक्षक अशोक पवार यांच्या हस्ते 27 मोबाईल नागरिकांना परत करण्यात आले. कर्नाटकहून एक महागडा मोबाईल हस्तगत केला आहे (Kalyan Police Found Theft-Missing Mobile).
विशेष म्हणजे 2019 च्या पुरात कल्याण पश्चिमेतील मोहने परिसराजवळील फुलेनगर परिसरातील एका तरुणाचा मोबाईल हरवला होता. पाणी जास्त असल्याने या तरुणाचा तोल गेला आणि त्याच्या हातातील मोबाईल पाण्यात पडून हरवला होता. हा मोबाईल सुद्धा पोलिसांनी शोधून तरुणाची बहीण ऐश्वर्या मोरेच्या स्वाधीन केला आहे.
यापुढेही नागरिकांचे मोबाईल शोधून परत केले जातील, असे पोलिसांनी सांगितले. मात्र, दिवाळीच्या दिवशीच नागरिकांचे हरवलेले मोबाईल परत मिळाल्याने नागरिकांनी आनंद व्यक्त करत पोलिसांचे आभार मानले आहेत.
घर सोडून गेलेल्या मुलाचा अवघ्या तीन मिनिटात शोध; जीआरपी पोलिसांची कौतुकास्पद कामगिरीhttps://t.co/I43xgufu0H#Kalyan #KalyanGRP #RaqilwayPolice
— TV9 Marathi (@TV9Marathi) October 31, 2020
Kalyan Police Found Theft-Missing Mobile
संबंधित बातम्या :
कल्याणचा इश्कबाज चोरटा; पाच गर्लफ्रेंड्सची हौस भागविण्यासाठी मोबाईल चोरी
नाशकात गॅरेज मालकाचा खून, पाच तासात पोलिसांनी मारेकऱ्याला पकडलं
सहा वर्षीय मुलाचं अपहरण, 18 तासात सुटका, सोलापूर पोलिसांची कारवाई