मुंबईः कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी सांगली जिल्ह्यातील जत तालुक्यामधील 40 गावांवर दावा केला होता. त्यानंतर त्यांनी अक्कलकोट आणि पंढरपूरवरही दावा केला. तेव्हापासून कर्नाटक-महाराष्ट्र सीमावादावर दोन्ही राज्यात प्रचंड गदारोळ माजला. त्यातच कर्नाटचे मुख्यमंत्र्यांनी एक ट्विट केले. त्यानंतर महाराष्ट्रातून कर्नाटकात गेलेल्या वाहनांवर कन्नडिगांनी हल्ला करत वाहनांची तोडफोड केली होती.
दोन्ही राज्यातील वातावरण बिघडल्यामुळे केंद्र सरकारने सीमाप्रश्न हस्तक्षेप करून तो सोडवण्याची मागणी होऊ लागली. त्यानंतर आज महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी व इतर मंत्र्यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेतली.
त्यावेळी अनेक मुद्यांवर चर्चा करण्यात आली. त्यानंतर राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी महाराष्ट्राची आम्ही ठाम भूमिका मांडली असल्याचे त्यांनी सांगितले होते.
केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या भेटीच्यावेळी कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी केलेल्या ट्विटवरही चर्चा करण्यात आली. बसवराज बोम्मई यांनी महाराष्ट्रच्या शिष्टमंडळानं केंद्रीय गृहमंत्री अमित शहांची भेट घेतल्यानं काही फरक पडणार नाही.
महाराष्ट्राने यापूर्वीही असा प्रयत्न केला आहे. हे प्रकरण सुप्रीम कोर्टात आहे. सुप्रीम कोर्टात आमची कायदेशीर बाजू मजबूत आहे. आमचं सरकार सीमावादावर कोणतीही तडजोड करणार नाही. असं त्यांनी ट्विट केले आणि सीमाभागात मराठी भाषिकांना त्याचा प्रचंड त्रास झाला.
त्यामुळे या ट्विटवर गृहमंत्री अमित शहा यांनी चर्चा केली त्यावेळी बसवराज बोम्मई यांनी हे मी ट्विट केले नाही असा निर्वाळा दिला. मात्र ज्या ट्विटर हँडलवरून हे ट्विट करण्यात आले होते ते ट्विटर अकाऊंट व्हेरिफाय असल्याचे नंतर समजले आहे.
मात्र सीमाभागातील जे मराठी भाषिक आहेत. त्यांना या ट्विटचा प्रचंड त्रास झाला होता. तरीही या ट्विटबद्दल महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून मात्र त्यांना पाठिशी घालण्यात येत आहे अशी टीका केली जात आहे.