शिंदे गटाचा स्वाभिमान कुठे शेण खातोय, ठाकरे गटाच्या नेत्याने तोफ डागली…

| Updated on: Nov 24, 2022 | 5:38 PM

स्वाभिमान म्हणत 40 आमदार शिवसेनेतून बाहेर पडले पण आता महाराष्ट्रातील 40 गावं शेजारच्या राज्यातील मुख्यमंत्री हिसकावून घेण्याचा प्रयत्न करतोय तेव्हा कुठे गेला यांचा स्वाभिमान.

शिंदे गटाचा स्वाभिमान कुठे शेण खातोय, ठाकरे गटाच्या नेत्याने तोफ डागली...
Follow us on

मुंबईः कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोमई यांनी काल सांगली जिल्ह्यामधील जत तालुक्यातील 40 गावांची मागणी केल्यानंतर राज्यातील राजकीय वातावरण ढवळून निघाले आहे. त्यामुळे राज्यातील शिंदे-फडणवीस सरकारवर जोरदार हल्लाबोल सुरू करण्यात आला आहे. आज शरद पवारांनी कर्नाटक वादाबाबत राज्यातील आणि केंद्रातील सत्ताधाऱ्यांवर निशाणा साधण्यात आल्यानंतर ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनीही शिंदे गटावर जोरदर निशाणा साधला आहे.
खासदार संजय राऊत यांनी शिंदे गटावर स्वाभिमानाच्या विषयावरुन त्यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला.

यावेळी बोलताना ते म्हणाले की, शिवसेनेतून ज्या स्वाभिमानासाठी जो 40 आमदारांचा गट बाहेर पडला आहे. आता कुठे गेला आहे, त्यांचा स्वाभिमान.

शेजारच्या राज्यातील एक मुख्यमंत्री आपल्या राज्यातील काही गावं हिसकावून घेण्याचा प्रयत्न करतो आहे. आणि तुम्ही षंडासारखे शांत बसला आहात. आता कुठे शेण खातो आहे तुमचा स्वाभिमान असा सवाल त्यांनी उपस्थित केला आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी आज सकाळीच केंद्र आणि राज्य सरकारवर निशाणा साधला होता. त्यानंतर खासदार संजय राऊत यांनी जोरदार निशाणा साधत त्यांनी षंडासारखे का शांत बसलात असा सवाल आता शिंदे गटाला केला आहे. त्यामुळे कर्नाटक-महाराष्ट्राच्या सीमावादावरुन हा वाद आणखी पेटणार असल्याचे दिसून येत आहे.

तर दुसरीकडे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनीही शिंदे गटावर निशाणा साधला आहे. ते म्हणाले की, शिंदे-फडणवीस यांनी बसवराज बोमई यांना समज द्यायला हवी. नाहीतर ते आता मुंबईही मागायला मागेपुढे बघणार नाहीत असा टोला त्यांनी राज्य सरकारला लगावला आहे.