katrap
Image Credit source: https://images.tv9marathi.com/wp-content/uploads/2022/12/10230256/katrap1.jpg
मुंबई : नगरपालिका हद्दीतील कात्रप पेट्रोल पंप ते खरवई बाह्यवळण रस्त्याची अवस्था अत्यंत वाईट झाली होती. याठिकाणी आता एमएमआरडीएने (MMRDA ) काँक्रीटचे रस्ते बांधले आहेत. याठिकाणी मुंबई (MUMBAI ) पायाभूत सुविधा असल्याने अलीकडे येथे गृहसंकुलांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली आहे. त्यामुळे मुंबई ते पुण्याला हे रस्ते आणि रेल्वेने चांगल्याप्रकारे जोडले जाणार आहेत.
अलिकडच्या दशकात कुळगाव – बदलापूर नगरपरिषद क्षेत्रात विकसित झालेल्या पायाभूत सुविधा तसेच परवडणाऱ्या घरांच्या उपलब्धतेमुळे येथील शहरीकरण वाढले आहे. कुळगाव -बदलापूरात भविष्यात मेट्रोची जोडणी देखील मिळणार असल्यामुळे सामान्य नागरीक स्थायिक होण्यासाठी बदलापूरला प्राधान्य देत आहेत.
शहरातील वाढत्या लोकसंख्येमुळे रहदारीत वाढ होऊन वाहतूक कोंडी निर्माण झाली आहे. त्यासाठी प्राधिकरणामार्फत विस्तारित मुंबई नगरी पायाभूत सुविधा प्रकल्पांतर्गत 3+3 मार्गिका असलेल्या 3.61 कि.मी.च्या रस्त्याचे बांधकाम बांधण्यात आले आहे.
हा 30 मी. रुंद मार्ग संपूर्ण काँक्रीटचा केल्यामुळे नागरिकांची वाहतूक कोंडी आणि खड्ड्यांपासून सुटका होणार आहे. तसेच राज्य महामार्ग 43 आणि राज्य महामार्ग 76 मार्गे मुंबई- पुणे जोडला जाणार असल्यामुळे नागरिकांच्या प्रवासाच्या वेळेत बचत होणार आहे. पावसाच्या पाण्याचा योग्य निचरा होण्यासाठी रस्त्याच्या दुतर्फा पूर्ण लांबीच्या पर्जन्य जलवाहिन्या तसेच पादचारी मार्ग बांधण्यात आला आहे. तसेच सदर प्रकल्पात 5 मो-यांचा समावेश केला आहे.