नवी मुंबई : नवी मुंबईतील एका नामांकित खाजगी कोचिंग क्लासेसच्या वर्गातच शिक्षकाने कर्मचारी तरुणीवर बलात्कार केल्याचा आरोप (Khargar Teacher Rapes Lady in Class) होत आहे. धक्कादायक म्हणजे आठवड्याभरानंतर दुसऱ्या शिक्षकानेही पीडितेवर बलात्कार करण्याचा प्रयत्न केला. या घटनेनंतर दोन्ही आरोपी पसार झाले आहेत.
खारघरमध्ये संबंधित खाजगी क्लासेसची शाखा आहे. येथील शिक्षकाने क्लासमध्येच सुपरवायझरचं काम करणाऱ्या तरुणीवर बलात्कार केल्याचा आरोप केला जात आहे. भरवर्गातच हा संतापजनक प्रकार घडल्यामुळे परिसरात चीड व्यक्त केली जात आहे.
धक्कादायक बाब म्हणजे पीडित तरुणीवर आठ दिवसांनंतर दुसऱ्या शिक्षकानेही बलात्कार करण्याचा प्रयत्न केला, असा आरोप आहे.
घरच्या परिस्थितीमुळे आणि आरोपींना घाबरुन दोन दिवस पीडित तरुणीने आपल्या कुटुंबीयांकडे घडलेल्या प्रकाराविषयी (Khargar Teacher Rapes Lady in Class) कुठलीच वाच्यता केली नव्हती. अखेर धीर एकवटून तिने आपल्यावर झालेल्या अत्याचाराविषयी सांगितलं.
गुंगीचे औषध देऊन रशियन महिलेवर बलात्कार, पोलीस अधिकाऱ्यावर गुन्हा दाखल
पीडित तरुणीने कुटुंबीयांच्या मदतीने खारघर पोलिसात बलात्कारीच तक्रार नोंदवली आहे. पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून घटनेनंतर पसार झालेल्या दोन्ही शिक्षकांचा खारघर पोलिस कसून शोध घेत आहेत.
काही दिवसांपूर्वीच मुंबईत एका रशियन महिलेने पोलिस अधिकाऱ्याने बलात्कार केल्याची तक्रार दिली होती. या प्रकरणी पोलिस अधिकारी अनिल जाधव यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता. चेंबुरमध्ये आरोपी पोलिसाने गेली 12 वर्ष अत्याचार करत वारंवार गर्भपात केल्याचा आरोपही पीडित महिलेने केला होता.