शिवसेनेचा आणखी एक नेता किरीट सोमय्यांच्या रडारवर; अनधिकृत बांधकामाविरोधात लोकायुक्तांकडे तक्रार

| Updated on: Mar 30, 2021 | 9:54 AM

आपण ठाकरे सरकारच्या तीन विकेट पाडणार, असे सोमय्या यांनी म्हटले होते. | Kirit Somaiaya Shivsena

शिवसेनेचा आणखी एक नेता किरीट सोमय्यांच्या रडारवर; अनधिकृत बांधकामाविरोधात लोकायुक्तांकडे तक्रार
किरीट सोमय्या
Follow us on

मुंबई: भाजप नेते किरीट सोमय्या यांनी आता शिवसेनेचे मंत्री अनिल परब (Anil Parab) यांच्याविरोधात तक्रार दाखल केली आहे. अनिल परब यांनी अनधिकृतपणे म्हाडाची जागा बळकावली. या जागेवर त्यांनी अनधिकृत बांधकाम केले, असे सोमय्या यांनी लोकायुक्तांकडे दाखल केलेल्या याचिकेत म्हटले आहे. त्यामुळे आता अनिल परब सोमय्यांच्या (Kirit Somaiaya) आरोपांना कशाप्रकारे प्रत्युत्तर देणार, याकडे आता सर्वांच्या नजरा लागल्या आहेत. या मुद्द्यावरुन पुन्हा एकदा शिवसेना विरुद्ध किरीट सोमय्या असा सामनाही रंगण्याची शक्यता आहे. (BJP leader Kirit Somaiya slams Shivsena minister Anil Parab

किरीट सोमय्या गेल्या काही महिन्यांपासून शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यासह शिवसेनेच्या नेत्यांवर सातत्याने भ्रष्टाचाराचे आरोप करत आहेत. आपण ठाकरे सरकारच्या तीन विकेट पाडणार, असे सोमय्या यांनी म्हटले होते.

अनिल परब यांच्यावर नक्की काय आरोप?

वांद्रे येथील म्हाडाच्या दोन इमारतींमधील मधल्या जागेत अनिल परब यांनी अनधिकृतरित्या आपले कार्यालय थाटल्याचा आरोप किरीट सोमय्या यांनी केला होता. विलास शेगले हे या अनधिकृत बांधकामाबाबत संघर्ष करत आहेत. 27जून 2019 रोजी म्हाडाने अनिल परब यांना नोटीस बजावली होती. मात्र, त्यानंतर ठाकरे सरकारच्या दबावामुळे अनिल परब यांच्या अनधिकृत कार्यालयावर कारवाई झाली नसल्याचे किरीट सोमय्यांचे म्हणणे आहे.

‘किशोरी पेडणेकरांनी झोपडपट्टीवासियांची जागा बळकावली’

किरीट सोमय्या यांनी मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांच्यावरही आरोप केले होते. किशोरी पेडणेकर यांनीही त्यांच्या कंपनीसाठी जागा बळकावली. ही जागा समाजकल्याण केंद्र आणि झोडपट्टी पुनवर्सन यंत्रणेची SRA आहे. SRA ने देखील ही बाब मान्य केली आहे. महापौरांच्या या कार्यालयाच्या पत्त्यावर आणखी आठ कंपन्या स्थापन झाल्या आहेत. या सर्व कंपन्यांविरोधात आपण सक्तवसुली संचलनालयाकडे ED तक्रार करणार असल्याचा इशारा सोमय्या यांनी दिला होता.

संबंधित बातम्या:

किरीट सोमय्यांनी पुन्हा वात पेटवली; ठाकरे सरकारच्या तीन कथित घोटाळ्यांची कागदपत्रे जाहीर

किशोरी पेडणेकरांवर कारवाई का नाही? सोमय्यांची महापौर, ठाकरे सरकार, मुंबई मनपाविरोधात याचिका

एकदा किरीट सोमय्यांच्या आरोपांची मालिका संपू द्या, दिवाळीनंतर आम्ही सुरु करु: शिवसेना

(BJP leader Kirit Somaiya slams Shivsena minister Anil Parab