मुंबई: भाजप नेते किरीट सोमय्या यांनी आणखी एक नवा आरोप केला आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा मेव्हणा बेनामी कंपन्यात गुंतवणूक करणार असेल तर त्याचे उत्तर मुख्यमंत्र्यांना द्यावं लागेल, असं किरीट सोमय्या यांनी म्हटलं आहे. त्यामुळे उलटसुलट चर्चांना उधाण आलं आहे.
किरीट सोमय्या यांनी मीडियाशी संवाद साधताना हा गंभीर आरोप केला आहे. उद्धव ठाकरे यांचा मेव्हणा बेनामी कंपन्यांमध्ये गुंतवणूक करणार असेल तर उद्धव ठाकरे यांनाही उत्तर द्यावं लागणार आहे, असं सांगतानाच मी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या वक्तव्याशी सहमत आहे. उद्धव ठाकरे हे बायकोच्या नावाने 19 बंगल्याचे घोटाळे करत आहेत, असा टोला सोमय्या यांनी लगावला.
अजित पवारांनी स्टेटमेंट केलं पण मग मी पुरावे ठेवले ना, मग पार्टनरशिप मागे का घेतली? असा सवाल करतानाच अजित पवार यांनी जमवलेली माया उघड केली. 9 दिवसांच्या धाडीचा दुसरा अंतिम रिपोर्ट येणं बाकी आहे. हे 1000 कोटींचे बेनामी व्यवहार आहेत. यात 15 मोठे सहकारी, पत्नी मुलगा, बहीण यांच्या नावाखाली घोटाळा करण्यात आला आहे, असा दावा त्यांनी केला.
सुनेत्रा पवार या दोन डझन कंपन्यांमध्ये डायरेक्टर आहेत. तर तीन डझन कंपन्यांमध्ये भागधारक मालक आहेत. बहिणी, मुलगा, यजमान त्यांचा मुलगा यांच्या नावेही बेनामी कंपन्या आहेत. हे आधी एक होल्डिंग कंपनी तयार करतात, मग त्याच्या खाली कंपन्या या करतात. सरकारी मालमत्ता कवडीमोल दरात विकत घेतात. पवार कुटूंबियांसाठी राज्याची जमीन चमकणारी आहे. जरंडेश्वर कंपनी यांचीच आहे. महाराष्ट्र राज्य सहकारी बँक यांचीच आहे. पदाचा दुरूपयोग करून त्यांनी हे सर्व मिळवलं आहे. उपमुख्यमंत्री स्वत:चा कारखाना विकत घेतात. यांचेच बिल्डर कंपन्या विकत घेतात, असा दावाही त्यांनी केला.
अजित पवार, पार्थ पवार, सुप्रिया सुळे, शरद पवार, उद्धव ठाकरे हे इडी, सीबीआयच्या नावाने बोंबाबोंब करत आहेत. वसुलीवाले अटॅक करतील. आरटीआयवाले अटॅक करतील. राज्य सरकार अटॅक करेल. पण ईडी आणि सीबीआय त्यांचं काम करतच राहणार, असंही त्यांनी सांगितलं.
100 Super Fast News | सुपरफास्ट 100 न्यूज | 16 October 2021 https://t.co/USApX9K4fX #News #Bulletin
— TV9 Marathi (@TV9Marathi) October 16, 2021
संबंधित बातम्या:
रावणालाही वाटत असेल हा आपल्या तावडीत सापडावा; निलम गोऱ्हेंचा किरीट सोमय्यांना खोचक टोला
(kirit somaiya allegations against cm uddhav thackeray over property)