ठाणेः अप्पासाहेब नलावडे साखर कारखान्यातील 100 कोटींच्या घोटाळ्याप्रकरणी राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार हसन मुश्रीफ यांच्या घरावर 11 रोजी छापेमारी करण्यात आली होती. त्यानंतर मुश्रीफ यांच्या घरावर ईडी आणि आयकर विभागाने छापे मारल्यानंतर 158 कोटी रुपयांचे पुरावे दिली असल्याची माहिती भाजपचे नेते किरीट सोमय्या यांनी दिली होती.
त्यानंतर त्यांनी आज पुन्हा एकदा हसन मुश्रीफ यांच्या घोटाळ्याविषयी माहिती देत आपण कोल्हापूर जाणार आणि अंबाबाईचं दर्शन घेणार असल्याचा थेट इशारा त्यांनी हसन मुश्रीफ यांना दिला आहे.
त्यामुळे काही दिवसापूर्वी किरीट सोमय्या यांनी केलेल्या आंदोलनामुळे कोल्हापूरात त्यांना विरोध दर्शवण्यात आला होता. तर आता पुरावे दिले असल्याचे सांगितले.
त्यांनी आता मी कोल्हापूरात जाणार आणि त्या दौऱ्याला काय मुश्रीफांची परवानगी लागणार का असा खोचक सवाल त्यांनी आमदार हसन मुश्रीफ यांना केला आहे. त्यामुळे सोमय्या आणि मुश्रीफ वाद पुन्हा एकदा पेटणार असल्याचे दिसून येत आहे.
महाविकास आघाडीचे सरकार असताना किरीट सोमय्या यांनी आमदार हसन मुश्रीफ हे मंत्री असताना त्यांच्या भ्रष्टाचाराचे आरोप केले होते. त्यावेळी त्यांनी तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी त्यांना वाचावले असल्याचा आरोप केला होता.
मात्र आता त्यांनी शिंदे-फडणवीस सरकारच्या काळात हसन मुश्रीफ यांनी केलेले घोटाळे बाहेर काढणार असून त्यांच्यावर केलेले आरोप सिद्ध होणार असल्याचेही किरीट सोमय्यांकडून सांगितले जात आहे.
त्यांनी आता यावेळी बोलताना सांगितले की, गेल्या वेळेस मिया मुश्रीफ हे सत्तेत होते त्यामुळे त्यांनी आपल्या अधिकाराचा गैरवापर करत मला कोल्हापूरला जाण्यापासून अडवलं होत पण आत्ता आम्ही कोल्हापूरला जाऊन येणार आणि अंबाबाईच दर्शन घेणार असा जोरदार टोला त्यांनी त्यांना हाणला आहे.
किरीट सोमय्या यांनी हसन मुश्रीफ यांच्यावर टीका करताना त्यांनी काही सवालही उपस्थित केले आहेत. यावेळी ते म्हणतात की, आम्हांला आमच्या अंबाबाईचं दर्शन घेण्यासाठी आत्ता मिया मुश्रीफ, मिया नवाब मलिक, मिया अस्लम शेख यांची परवानगी घ्यावी लागणार आहे का? असा सवाल त्यांनी उपस्थित केला आहे.
हसन मुश्रीफ यांनी घोटाळा आणि हेराफेरी केली आहे त्यामुळे त्यांच्यावर कारवाई होणार असल्याचा विश्वासही किरीट सोमय्या यांनी व्यक्त केला आहे.
किरीट सोमय्या यांनी कोल्हापूरात येणार आणि अंबाबाईचं दर्शन घेणार असल्याचा इशारा दिला असून आता कोल्हापूरातील राष्ट्रवादी आणि भाजपचा वाद पुन्हा एकदा रंगणार का असा सवाल आता उपस्थित होऊ लागला आहे.