मुंबई : भाजप नेते किरीट सोमय्यांचा (Kirit Somaiya) अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळला आहे, त्यांच्या आयएनएस विक्रांत (INS Vikrant) प्रकरणात अडचणी वाढल्या आहेत. त्यामुळे आता सोय्यांची अटक अटळ आहे का? असा सवाल उपस्थित होत आहे. सोमय्या दोन दिवसांपासून संपर्कात नाहीत. दोन तासांचा युक्तीवाद झाल्यानंतर सोमय्यांचा अकपूर्व जामीन अर्ज फेटाळला आहे. आम्ही याविरोधात आता हायकोर्टात धाव घेणार आहे. आत्ताच या प्रकरणात काही सांगता येणार नाही, अशी माहिती किरीट सोमय्यांच्या वकिलांनी दिली आहे. तसेच आज फक्त किरीट सोमय्या यांचा जामीन फेटाळला आहे. नील सोमय्यांच्या (Neel Somaiya) अटकपूर्व जामीनावर उद्या सुनवाणी होणार आहे. किरीट सोमय्या यांना अटकेपासून संरक्षण मागितलं होतं. मात्र त्यांना कोणतेही संरक्षण मिळालं नाही. सोमय्यांनी जो पैसा गोळा केला त्याबाबत कोणतेही स्पष्टीकरण न दिल्याने जामीन फेटाळला आहे. त्यामुळे आता किरीट सोमय्या आणि त्यांचे पूत्र नील सोमय्या यांच्यावर अटकेची टांगती तलावर आहे.
किरीट सोमय्या यांच्याबाबत आज सकाळी युक्तीवाद झाला. त्यांनी जी कागदपत्र सादर केली त्याद्वारे गुन्हा कबूल केल्यासरखं आहे, अशी प्रतिक्रिया या प्रकरणावर सरकारी वकील प्रदीप घरत यांनी दिली आहे. सोमय्याचं म्हणणं आहे, की ते निष्पाप आहे. पण डॉक्युमेन्ट्समध्ये सोमय्यांनी काही फोटो आणि डॉक्टुमेन्ट दिलेत. त्यात त्यांनी मदतीसाठी म्हणून पैसे जमा केले. त्यांनी म्हटलं होतं की राज्यपालांकडे ते पैसे जमा करायचे होते. पण त्यांनी हे पैसे जमा केले नाहीत. चौकशीसाठी सोमय्यांची कस्टडी जरुरी अशल्याचं कोर्टानं म्हटलंय. पोलिसांनी दोन दिवसांत कसून तपास केलाय. सोमय्यांचा पहिला मोबाईल जो एप्रिलच्या आधी ते वापरत होते, तो त्यांनी दिलेला नाही. किंवा त्यांनी तो नष्ट केल्याचा अंदाज आहे, असेही प्रदीप घरत म्हणाले आहेत.
गेल्या अनेक दिवसांपासून या प्रकरणावरून आरोप प्रत्यारोप होत आहेत. शिवसेना खासदार संजय राऊत यांनी सोमय्या यांच्यावर कोट्यवधी रुपये या प्रकरणात लाटल्याचा आरोप केला आहे. तसेच सोमय्यांनी कोणताही पैसा राज्यपालांकडे जामा केला नाही, अशी माहिती राज्यपाल भवनात जे दही खिचडी खात बसतात, त्यांनीच मला दिल्याचेही राऊत म्हणले होते. तसेच भाजप नेते किरीट सोमय्या यांची बाजू घेत आहेत. मात्र देशद्रोहासारखा गुन्हा आहे. त्यामुळे त्यांना सोमय्यांची बाजू घेताना लाज वाटली पाहिजे असेही राऊत म्हणाले आहेत. तसेच सोमय्या आणि मुलगा देशाबाहेर पळून जाऊ शकता अशी शंकाही संजय राऊतांनी व्यक्त केली आहे .
Gunratna Sadavarte: सदावर्तेंनी आतापर्यंत दीड कोटी गोळा केले, वकिलांचा कोर्टातील युक्तिवाद काय?