कीर्तनकार सुनीता अंधारे यांची सुषमा अंधारे यांच्यावर जहरी टीका, म्हणाल्या, कीर्तनात बसली असती तर…

| Updated on: Dec 16, 2022 | 10:31 PM

आमच्याच देवाविषयी आमच्या संतांविषयी वाईट बोलता. अशा बाईला पक्षामध्ये ठेवताना तुम्हाला लाजा वाटल्या पाहिजे, असंही सुनीता अंधारे या कीर्तनकारानं सुनावलं.

कीर्तनकार सुनीता अंधारे यांची सुषमा अंधारे यांच्यावर जहरी टीका, म्हणाल्या, कीर्तनात बसली असती तर...
सुषमा अंधारे
Follow us on

मुंबई : कीर्तनकार सुनीता अंधारे यांनी सुषमा अंधारे यांच्यावर जहरी टीका केली. सुनीता अंधारे म्हणाल्या, ज्ञानोबारायांनी रेडा बोलावला. पण, तू त्या दिवशी गैरहजर होती. तुला जिथं दिसलं तसं फाडून टाकणार आहे. त्या सुषमा अंधारे हिचा जाहीर निषेध करते. जिथं दिसालं तिथं ठोकणार, असा इशाराही दिला. ज्ञानोबांवर केलेल्या वक्तव्यानंतर सुषमा अंधारे यांच्या विरोधात आंदोलन होतं होती. पण, आता कीर्तनकार सुनीता आंधळे यांनी फाडून काढण्याची आणि ठोकण्याचीच भाषा केली. तू जर एखाद्या कीर्तनात बसली असती तर तुला अक्कल आली असती. ज्ञानोबा कोण होते. त्यांच्याविषयी काय बोललं पाहिजे. कीर्तनामध्ये मी बोलू शकते. पण, कीर्तनामध्ये एवढी खालची भाषा येऊ शकणार नाही. म्हणून हा व्हिडीओ काढल्याचंही सुनीता अंधारे यांनी सांगितलं.

हनुमंतराव उडाण घेऊन लंकेला गेले. मग, तू नाही का या पक्षातून त्या पक्षात उडाण घेतली. संतांच्या पदस्पर्शानं पुनित झालेली ही भूमी आहे. याच महाराष्ट्रात तू राहते. त्याचं हिंदू धर्मातून मतदान मिळविणार आहे. त्यांच्याविषयी इतकी वाईट बोलते.

आमच्याच देवाविषयी आमच्या संतांविषयी बोलते. अशा बाईला पक्षामध्ये ठेवताना तुम्हाला लाजा वाटल्या पाहिजे, असंही सुनीता अंधारे या कीर्तनकारानं सुनावलं. गावाच्या बाहेर का देशाच्या बाहेर घाकलून द्या तिला, असा संतापही त्यांनी व्यक्त केला.

यावर सुषमा अंधारे म्हणाल्या, मला काही लोकांनी व्हिडीओज दाखविले. कुणीतरी फार अश्लाघ्य भाषा वापरली. मुळात मला हे लोकं कीर्तनकार वाटत नाहीत. काम, क्रोध, मोह, मत्सर अजूनही आपल्या मनातून काढून टाकू शकले नाही. जे राजकीय दावणीला बांधून घेतात, ते कीर्तनकार असू शकत नाही, अशी टीकाही त्यांनी केली.

नाशिकमध्ये सुषमा अंधारे यांच्या विरोधात मोर्चा काढण्यात आला. याआधी मुक्ताईनगर, ठाण्यात जोडे मारो आंदोलन झालं. आळंधीत प्रतिकात्मक अंत्ययात्रा काढून निषेध व्यक्त करण्यात आलाय. यात आता सुनीता अंधारे यांची भर पडली.