मुंबई: मुंबई महापालिकेकडून राणीबागेत पेंग्विन आणण्यात आले होते. पेंग्विन आणण्यावरुन सत्ताधारी शिवसेनेवर विरोधकांनी टिका केली होती. महापौर किशोरी पेडणेकर यांनी विरोधकांना प्रत्युत्तर दिलं आहे. पेंग्विन आदित्य ठाकरे यांच्या संकल्पनेतून आणण्यात आले होते. पेंग्विनवर जे राजकारण करू पाहत होते, ते आज जाऊन पेंग्विन पाहून मजा घेतायत. पेंग्विनची सुश्रुषा करण्यासाठी खर्च होतोय , पण पर्यटकांमुळे रेव्हेन्यू वाढतोय, असं किशोरी पेडणेकर म्हणाल्या.
पर्यावरण आणि वातावरणीय बदल मंत्री आदित्य ठाकरे यांच्या संकल्पनेतून मुंबई महापालिकेनं पेंग्विन आणण्याचा निर्णय घेतला आहे. पेंग्विनवरुन राजकारण करणारे लोक आता पेंग्विन पाहून मजा घेतायत असा टोला किशोरी पेडणेक यांनी लागवला आहे. राणी बागेची ओळख म्हणून पेंग्विन ओळखला जात आहे. एवढा मोठा खर्च होतोय , पण या पक्षाला वेगळं वातावरण लागतं, तेच वातावरण आम्ही देण्याचा प्रयत्न करतोय , त्यामुळे त्यात कोणतीही तडजोड होणार नाही, असं किशोरी पेडणेकर म्हणाल्या आहेत.
पेंग्विन पक्षी थंड प्रदेशातील आहे , सर्वांना बघता यावा म्हणून आणलं गेले.पेंग्विन मुळे चांगलं उत्पन्न मिळत आहे. त्यांच्या देखभालीसाठी हा खर्च केला जाणार आहे, अशी माहिती शिवसेना सभागृह नेत्या विशाखा राऊत यांनी दिली आहे. पेंग्विन प्रकल्पामुळे उत्पन्न जास्त मिळत आहे , खर्च कमी आहे. पेंग्विनच्या मुळे राणी बाग मध्ये येणाऱ्यांची संख्या वाढली आहे, असंही त्या म्हणाल्या आहेत.
मुंबई महापालिकेच्या पेंग्विन प्रकल्पावर नितेश राणे यांनी टीका केली आहे. पेंग्विन आणण्याचं जो हट्ट आहे तो बाल हट्ट पुरावण्याचा प्रयत्न आहे. महापालिका पेंग्विन साठी 15 कोटी रुपये पुरवत आहेत. यांच्याकडे डॉक्टरांना द्यायला देण्यासाठी पैसे नाहीत. दुसरीकडे 15 कोटी रुपये पेंग्विन साठी आहेत. याला काँग्रेसचा विरोध नावापुरता आहे, असा आरोप नितेश राणे यांनी केला आहे.
महापौर किशोरी पेडणेकर यांनी मुंबईत लसीकरणाविषयी माहिती दिली. केंद्र लसीचा साठा राज्याला देत, मग राज्य पालिकेला अशी प्रक्रिया आहे. मुंबईत लसीकरण जास्त होण्यात आदित्य ठाकरे यांचा मोठा वाटा आहे. आदित्य ठाकरे यांच्या प्रयत्नातून खासगी रुग्णालयातील लस आणून मोफत वितरण केलं जातंय, अस किशोरी पेडणेकर म्हणाल्या. महापालिका देखील मेहनत घेऊन लस वितरित करतेय.या सगळ्यामुळेच देशात लसीकरणात मुंबई पहिली आलीय, असं किशोरी पेडणेकर म्हणाल्या.
इतर बातम्या:
पेंग्विनमुळे राणीबागेतील पर्यटकांमध्ये वाढ
पती-पत्नीपेक्षाही त्यांचं नातं गहिरं होतं; शहनाजची हालत पाहून राहुल महाजनला धक्का
पोटासाठी भारतात, नवी मुंबईत राबणाऱ्या नेपाळी कामगारांसाठी लसीकरण कॅम्पची मागणी
Kishori Pednekar mayor of BMC said those criticise on penguins they are now watching penguins