मुंबई: महापौर किशोरी पेडणेकर यांनी कोविन अॅपमध्ये तांत्रिक सुधारणा करण्यासाठी लसीकरणाला स्थगिती देण्यात आल्याची माहिती दिली आहे. कोविन अॅपमध्ये काही तांत्रिक अडचणी आहेत त्या सुधारण्यासाठी 17 आणि 18 जानेवारीला लसीकरण स्थगित करण्यात आले आहे. नागरिकांनी कोरोना लसीकरणाबाबत गैरसमज करू घेऊ नये, असे आवाहन किशोरी पेडणेकर यांनी केलं आहे. लसीकरण रद्द झालं नसून दोन दिवसांसाठी स्थगित करण्यात आलं आहे. असंही पेडणेकर म्हणाल्या. (Kishori Pednekar said corona vaccination stopped for two day not cancelled)
कोरोना लसीकरणाबाबत केंद्राने सूचना केल्या आहेत. कोरोना प्रतिबंधक लसीकरणाची ऑफलाईन नोंदणी करता येणार नाही. त्यामुळे कोविन अॅपमधील तांत्रिक अडचणी दूर करून लसीकरण सुरू होईल, अशी माहिती किशोरी पेडणेकर यांनी दिली. शनिवारी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे आणि महापौर किशोरी पेडणेकर यांच्या उपस्थितीत मुंबईत कोरोना लसीकरणाला शुभारंभ झाला होता.
किशोरी पेडणेकर यांनी मुंबईतील शाळा सुर करण्याबद्दल मोठं वक्तव्य केलं आहे. कोरोनाचा धोका अजून टळला नाही. त्यामुळे शाळा सुरु करण्याबाबत स्थानिक पातळीवर निर्णय घेणार आहेत. मुंबईतील पालिका शाळा, अनुदानित, विना अनुदानित शाळा कधी सुरू होणार याचा निर्णय अजून झालेला नाही. येत्या आठवड्यातील सोमवारनंतर शाळा सुरु करण्याबद्दल निर्णय होईल, अशी माहिती किशोरी पेडणेकरांनी दिली.
भारत बायोटेकच्या लसीच्या आपत्कालीन वापराला केंद्र सरकारनं विचार मंजुरी दिली आहे. भारत बायोटेकच्या कोवॅक्सिन लसीला केंद्र सरकारनं मंजुरी दिली आहे, त्यामुळे शंका घेण्याची गरज नाही, असंही त्या म्हणाल्या.
दरम्यान, परदेशातून भारतात परतणाऱ्या प्रवाशांना विमानतळावर क्वारंटाईन होण्यापासून वाचण्यासाठी पैसे घेतले जात आहेत. जे लोक अशा प्रकारचे गुन्हे करत असतील त्यांना शोधून त्याच्यावर कारवाई करण्यात येईल, असं किशोरी पेडणेकर म्हणाल्या.
Covaxin लसीचे दुष्परिणाम आढळल्यास भरपाई, भारत बायोटेकची मोठी घोषणाhttps://t.co/mU9xR4fbcg#Bharatbiotech #covaxin | #corona | #CoronaVaccine
— TV9 Marathi (@TV9Marathi) January 17, 2021
लसीकरणाच्या मुद्द्यावर राजकारण नको; मुख्यमंत्र्यांचं आवाहन
Corona vaccination : कोरोनाचं संकट टळलेलं नाही, त्रिसूत्रीचं पालन करा; मुख्यमंत्र्यांचं आवाहन
मुंबई विमानतळावर पैसे घेऊन परदेशी प्रवाशांना अलगीकरणातून सूट, बीएमसीची मोठी कारवाई
(Kishori Pednekar said corona vaccination stopped for two day not cancelled)