कोकण रेल्वे आता धुरांच्या रेषा हवेत काढणार नाही, 12 तारखेपासून या 12 ट्रेन वीजेवर धावणार

| Updated on: Feb 09, 2023 | 7:41 PM

कोकण रेल्वेचे विद्युतीकरण पूर्ण होऊन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते हा प्रकल्प राष्ट्राला अर्पण करण्यात आला होता. रत्नागिरी, मडगाव आणि उड्डपी येथून 20 जून 2022 रोजी इलेक्ट्रिक लोको ट्रेनला पंतप्रधानांनी व्हिडीओ कॉन्फरन्सच्या माध्यमातून हिरवा झेंडा दाखवला होता.

कोकण रेल्वे आता धुरांच्या रेषा हवेत काढणार नाही, 12 तारखेपासून या 12 ट्रेन वीजेवर धावणार
KRCL
Image Credit source: socialmedia
Follow us on

मुंबई : कोकण रेल्वेचे विद्युतीकरण पूर्ण झाले असल्याने आता कोकण रेल्वेच्या ( KONKANRAILWAY ) गाड्या आता हवेत धुरांच्या रेषा काढणार नाही. कोकण रेल्वे मार्गावरून तब्बल एक डझन ट्रेन 12 ते 18 फेब्रुवारीच्या काळात वीजेवरील इंजिनावर धावणार आहेत. त्यामुळे कोकण जाणाऱ्या चाकरमान्यांचा प्रवास वेगवान आणि प्रदूषणमुक्त  ( POLLUTION FREE ) होणार आहे. कोकण रेल्वेचे विद्युतीकरण ( Electrification ) अखेर पूर्ण झाले असून चाकरमान्यांना वेगवान आणि प्रदुषणमुक्त प्रवासाचा आनंद घेता येणार आहे. त्यामुळे या मार्गावर आता 12 मेल-एक्स्प्रेसचा प्रवास वीजेवर चालणाऱ्या इंजिनांद्वारे होणार असल्याचे कोकण रेल्वेचे सूत्रांनी स्पष्ट केले आहे.

कोकण रेल्वेचे विद्युतीकरण पूर्ण होऊन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते हा प्रकल्प राष्ट्राला अर्पण करण्यात आला. रत्नागिरी, मडगाव आणि उड्डपी येथून 20 जून 2022 रोजी  इलेक्ट्रिक लोको ट्रेनला पंतप्रधानांनी व्हिडीओ कॉन्फरन्सच्या माध्यमातून हिरवा झेंडा दाखवला. त्यामुळे आता चाकरमान्यांना वेगवान आणि प्रदुषणमुक्त प्रवासाचा आनंद घेता येणार आहे.

प्रकल्पावर 1287  कोटींंचा खर्च 

कोकण रेल्वेच्या विद्युतीकरण प्रकल्पाच्या कोनशिलचे अनावरण तत्कालीन रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांच्या हस्ते नोव्हेंबर 2015  मध्ये झाले होते. २०१६ मध्ये प्रत्यक्षात कामाला सुरुवात झाली होती. कोकण रेल्वेच्या 741  कि.मी.च्या मार्गाच्या विद्युतीकरणाची कामे दोन टप्प्यांत सुरू झाली होती. या संपूर्ण प्रकल्पावर 1287  कोटी रुपयांचा खर्च करण्यात आला आहे.

वार्षिक 150  कोटी रुपयांची डिझेल बचत

मार्च 2020 पासून विविध सहा टप्प्यांमध्ये या मार्गाचे रेल्वे सुरक्षा आयुक्तांतर्फे ‘इन्स्पेक्शन’ करण्यात आले. 24 मार्च रोजी रत्नागिरी ते थिवीम मार्गावर शेवटचे ‘इन्स्पेक्शन’ पूर्ण होऊन संपूर्ण मार्गाच्या विद्युतीकरणाला अखेर ग्रीन सिग्नल मिळाला आहे. कोकणातील दुर्गम मार्ग त्यातच कोरोना काळ आणि जोरदार पर्जन्यवृष्टी असूनही विद्युतीकरणाचे काम थांबले नाही. कोकण रेल्वे मार्गावर आता वीजेच्या इंजिनावर मेल-एक्सप्रेस गाड्या धावणार असल्याने प्रदुषण तर कमी होईलच शिवाय गाड्यांचा वेग वाढून वार्षिक 150  कोटी रुपयांची डिझेल बचत होणार आहे.

स्वातंत्र्यानंतरचा पहिला मोठा प्रकल्प

कोकण रेल्वेचा मार्ग रोहा ते ठोकूरपर्यंत असून विद्युतीकरण आणि दुपरीकरणाचे काम एकत्र सुरू झाले होते. रोहा ते वीर असे दुपदरीकरण पूर्ण झाले असून रेल्वे उर्वरित ठिकाणी दहा क्रॉसिंग स्थानके बांधण्यात आली आहेत. या 741  कि.मी.च्या मार्गाचे विद्युतीकरण पूर्ण झाल्याने कोकण रेल्वे सारख्या स्वायत्त महामंडळाने स्वातंत्र्यानंतर पूर्ण केलेला हा पहिला मोठा प्रकल्प ठरला आहे.

नैसर्गिकदृष्ट्या दुर्गम मार्ग

कोकण मार्गावर 1880  पुल आणि 91 बोगदे आहेत. रत्नागिरीच्या करबुडवे येथे सर्वात लांब 6.5 कि.मी.चा बोगदा आहे. तर पनवेल नदीवर सर्वात 64 मीटर उंचीचा पुल आहे.

दहा नवीन स्थानकांची भेट

कोकण रेल्वेवर आठ नविन क्रॉसिंग स्टेशन बांधण्यात आली आहेत. त्यात सापेवामणे, कलवणी, कडवई, वेरवली, खारेपाटण, आचिर्णे ही कोकण रेल्वेवर तर मिर्झान व इन्नांजे ही दोन रेल्वे स्थानके कर्नाटकातील आहेत.

खालील ट्रेनचा प्रवास आता इलेक्ट्रीक इंजिनांद्वारे

1)  ट्रेन क्र.  12223 लोकमान्य टीळक जं. – एर्नाकुलम  जं. (Bi-Weekly) एक्सप्रेस मंगळवार 14 फेब्रुवारी पासून प्रवास सुरू होणारी

2) ट्रेन क्र.  12224 एर्नाकुलम जं. – लोकमान्य टीळक जं. (Bi-Weekly) एक्सप्रेस बुधवार 15 फेब्रुवारीपासून प्रवास सुरू होणारी

3)  ट्रेन क्र. 22150 पुणे जं. – एर्नाकुलम Jn. (Bi-Weekly)  एक्सप्रेस बुधवार 15 फेब्रुवारीपासून प्रवास सुरू होणारी

4)  ट्रेन क्र.  22149 एर्नाकुलम जं.- पुणे जं. (Bi-Weekly) एक्सप्रेस शुक्रवार  17 फेब्रुवारीपासून प्रवास सुरू होणारी

5)  ट्रेन क्र.  11099  लोकमान्य टीळक  जं. – मडगांव  जं. (04 days a week) एक्सप्रेस शनिवार 18 फेब्रुवारी पासून प्रवास सुरू होणारी

6)  ट्रेन क्र.  11100 मडगांव  जं.-  लोकमान्य टीळक  जं. (04 days a week) एक्सप्रेस शनिवार 18 फेब्रुवारीपासून प्रवास सुरू होणारी

7)  ट्रेन क्र.  12133 सीएसएमटी – मंगळुरू जं. (Daily) एक्सप्रेस  गुरूवार 16 फेब्रुवारीपासून प्रवास सुरू होणारी

8)  ट्रेन क्र.  12134 मंगळुरू जं.- सीएसएमटी  (Daily) एक्सप्रेस शुक्रवार 17 फेब्रुवारीपासून प्रवास सुरू होणारी

9) ट्रेन क्र.  10105 दिवा – सावंतवाडी रोड (Daily) एक्सप्रेस रविवार  12 फेब्रुवारीपासून प्रवास सुरू होणारी

10)  ट्रेन क्र.  10106 सावंतवाडी रोड – दिवा  (Daily) एक्सप्रेस  सोमवार 13 फेब्रुवारीपासून प्रवास सुरू होणारी

11)  ट्रेन क्र.  50107 सावंतवाडी रोड – मडगांव  जं. (Daily) रविवार 12 फेब्रुवारीपासून प्रवास सुरू होणारी

12)  ट्रेन क्र.  50108 मडगांव  जं. – सावंतवाडी रोड (Daily)  सोमवार 13 फेब्रुवारीपासून प्रवास सुरू होणारी