मुंबई : मायक्रोब्लॉगिंग प्लॅटफॉर्म ट्वीटरने ( Twitter ) अनेक पत्रकारांचे अकाऊंट (account ) सस्पेंड केल्यानंतर आता त्यांचा भारतातील स्पर्धक असलेल्या कू KOO चे अकाऊंट सस्पेंड केले आहे. यामुळे खळबळ उडाली आहे. त्यामुळे या दोन कंपन्यांमध्ये खडाजंगी उडणार आहे. सोशल मिडीया प्लॅटफॉर्म कू चे अकाऊंट सस्पेंड केल्यामुळे आता इलॉन मस्क ( Elon Musk ) आणखी काय काय चमत्कार करणार आहेत याची उत्सुकता लागली आहे.
ट्वीटरने जगभरातील जानेमाने पत्रकारांची ट्वीटर खाती नुकतीच बंद करून टाकत एकच खळबळ उडवून दिली आहे. त्यातच आता ट्वीटरचे प्रमुख असलेल्या इलॉन मस्क यांनी थेट त्याचे भारतातील स्पर्धक असलेल्या कू चे खाते बंद केले आहे.
कूचे को फाऊंडर मयंक बिदावत यांनी ट्वीटरवर लांबलचक ट्वीटर थ्रेड शेअर केला आहे. आणि याबाबत मयंक यांनी मस्क यांचा खरपूस समाचार घेतला आहे. मयंक बिदावत यांनी म्हटले आहे की, कू चे एक अकाऊंट सस्पेंड करण्यात आले आहे. का तर आम्ही ट्वीटरचे तगडी स्पर्धा देत आहोत. Mastodon चे खातेही आज बॅन केले आहे.
ही काही फ्री स्पीच आहे काय ? आपण कोणत्या जगात जगत आहोत..? हे काय चालले आहे ? इलॉन मस्क ट्वीटरने अनेक पत्रकारांची खाती बंद केली आहेत. यामागे कारण दिले आहे की यांनी मस्क यांचा रियल टाइम लोकेशन शेअर केला होता. याबरोबरच मॅस्टॉडनचे खातेही बंद केले आहे. ही सुद्धा एक मायक्रोब्लॉगिंग वेबसाईट आहे. परंतू ती ओपन सोर्स नेटवर्क वर काम करते.