लाडकी बहीण योजनेने सध्या राज्यात धुमाकूळ घातला आहे. ही योजना महिला वर्गात लोकप्रिय ठरली आहे. या योजनेवर काही भाऊरायांनी पण डल्ला मारला आहे. अर्थात ही घुसखोरी उघड झाली आहे. त्यातच आता राज्य सरकारने एक मोठी खेळी खेळली आहे. या योजनेचे तीन हप्ते जमा झाले आहेत. महायुती सरकार विधानसभेच्या रणधुमाळीत अर्धी लढाई अगोदरच जिंकण्याची तयारी करत आहे. त्यानुसार दिवाळीपूर्वीच नोव्हेंबरचा हप्ता जमा करण्याची तयारी सुरू असल्याचा दावा करण्यात येत आहे. ऑक्टोबर महिन्याच्या अखेरीस दिवाळीचा धूम धडाका असेल. त्यातच लाडकी बहीण योजनेचा हप्ता मिळणार असल्याने दिवाळीचा गोडवा वाढणार आहे. विधानसभेच्या तोंडावर शिंदे सरकारची ही खेळी चर्चेचा विषय ठरली आहे.
मुदत वाढणार का?
या योजनेतंर्गत कोट्यवधींचा निधी राज्यातील महिलांच्या खात्यात जमा करण्यात आला आहे. या योजनेत सहभागी होण्यासाठी सुरूवातीला महिलांची मोठी तारांबळ उडाली. त्यांना कागदपत्रे जमा करावी लागली. त्यानंतर बँकेत ज्यांची खाती नव्हती. ती उघडावी लागली. यापूर्वी ऑगस्टपर्यंत या योजनेत सहभागी होण्याची मुदत होती. ती 30 सप्टेंबरपर्यंत वाढवण्यात आली होती. आता ही मुदत अजून वाढवल्या जाण्याची दाट शक्यता आहे. त्यामुळे ज्या महिलांचे बँके खाते उघडले नाही. एखादं कागदपत्रं कमी पडल्याने त्यांना लाभ मिळाला नसेल तर आता त्या महिला योजनेचा लाभ घेऊ शकतील.
नोव्हेंबरचा हप्ता याच महिन्यात
काही दिवसांपूर्वी लाडकी बहीण योजनेचा तिसरा हप्ता जमा झाला. काहींच्या खात्यात ही रक्कम जमा लवकरच जमा होईल. नोव्हेंबर महिन्यात विधानसभा निवडणुका होण्याची शक्यता आहे. या निवडणुकीची आचारसंहिता अगोदरच लागू शकते. त्यामुळे नोव्हेंबर महिन्यातील लाडकी बहीण योजनेचा हप्ता याच महिन्यात, ऑक्टोबरमध्ये जमा होण्याची शक्यता आहे. ही भाऊबीजेची ओवळणी अनेक बहिणींचा आनंद द्विगुणित करणारी आहे. दिवाळी त्यामुळे धूम धडाक्यात साजरी होईल. महिलांना ऑक्टोबर आणि नोव्हेंबर महिन्यांचे, दोन ही हप्ते याच महिन्यात जमा होण्याची शक्यता आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी भाऊबीजेची ओवाळणी बहिणींच्या खात्यात जमा करण्याचा शब्द दिला आहे.