कौतुकास्पद, खालापूरच्या इर्शाळवाडीमधील ग्रामस्थांच्या मदतीला ‘लालबागचा राजा’ निघाला

| Updated on: Jul 21, 2023 | 1:00 AM

रायगडमधील खालापूरजवळील इर्शाळवाडीवर दरड कोलसळी त्यामध्ये 16 जणांचे बळी गेले आहेत. गावात आक्रोश होत असून कोणाचा मुलगा तर कोणाचे भाऊबंध या नैसर्गिक आपत्तीमध्ये गेले आहेत. अशातच मुंबईमधील गणपती मंडळाने मोठा निर्णय घेतला आहे.

कौतुकास्पद, खालापूरच्या इर्शाळवाडीमधील ग्रामस्थांच्या मदतीला लालबागचा राजा निघाला
Follow us on

मुंबई :  राज्यात गुरूवारी एक मोठी दुर्घटना घडली, यामध्ये 16 जणांना आपला जीव गमवावा लागला आहे. अजून बचावकार्य असून तात्पुरतं थांबवण्यात आलं असून पहाटे शुक्रवारी 5 वाजता पुन्हा बचावकार्य सुरू होणार आहे. गावातील लोकांना सुरक्षित ठिकाणी हलवण्यात आलं आहे. मृतांना आणि जखमींना मुख्यमंत्र्यांनी 5 लाखांच्या मदत करण्याचा निर्णय घेतला आहे. अशातच मुंबईतील प्रसिद्ध गणपती मंडळाने पुढाकार घेत इर्शाळवाडीतील ग्रामस्थांना मदत करण्याचा निर्णय घेतला आहे.

या भीषण दुर्घटनेमध्ये वाचलेल्या लोकांना लालबागचा राजा सार्वाजनिक गणेशोत्सव मंडळाचे कार्यकर्ते मोठी मदत करणार आहेत. ज्यामध्ये महिला, पुरुष आणि लहान मुलांचे सर्व अत्यावश्यक कपडे, खाण्यासाठी सुका खाऊ, अन्नपदार्थ, ग्रामस्थांसाठी तसेच मदतकार्य करणाऱ्या प्रशासनाच्या सर्व कर्मचाऱ्यांसाठी लागणाऱ्या सर्व जीवनाश्यक पदार्थ आणि वस्तूंचा यात समावेश करण्यात आला आहे. शुक्रवारी सकाळी 10 वाजता ही मदत लालबागचा राजा मुख्य प्रवेशद्वार येथून इर्शाळवाडीकडे रवाना होणार आहे.

संपूर्ण घटनाक्रम

इर्शाळवाडीमध्ये जाण्यासाठी 1.5 किमीपर्यंत चालत जावं लागतं. एकंदरित घटनाक्रम पाहिला तर, रात्री 11 वाजती डोंगराचा कडा कोसळला, 11.15 वाजता बाजूच्या भागातील लोक जमा झाले, रात्री 11.20 ला गावचे सरपंच दाखल झाले, रात्री 1 वाजता मंत्री उदय सामंत तर रात्री 3 वाजता गिरीश महाजन घटनास्थळी दखल, सकाळी 6.20 पासून NDRF टीमकडून बचावकार्य सुरू त्यानंतर 7.25 ला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे दाखल, 9 वाजता उपमुख्यमंत्री अजित पवार आणि शिंदेचा फोन झाला, 11 वाजता 10 जणांचा मृत्यू आणि 80 जण वाचले आणि 100 जण अडकल्याची आकडेवारी समोर आली.