मुंबई : परदेशाप्रमाणे आता मुंबईतील काळ्या-पिवळ्या टॅक्सी आणि रिक्षाच्या टपावर दिवे लावण्यात येणार (Lamps on rickshaw taxi) आहे. त्यामुळे टॅक्सी-रिक्षा प्रवाशी आहेत कि नाही याची माहिती प्रवाशांना मिळणार (Lamps on rickshaw taxi) आहे. संपूर्ण देशभरात पहिल्यांदाच हा प्रकल्प परिवहन विभागाकडून मुंबईत राबवण्यात येणार (Lamps on rickshaw taxi) आहे.
अनेकदा प्रवाशांना रिक्षा टॅक्सी मिळवण्यासाठी मोठी कसरत करावी लागते. अनेकदा रिक्षा-टॅक्सीवाले भाडे नाकारतात. तर काहीवेळा रिक्षा टॅक्सीत प्रवाशी असल्याचेही दिसत नाही. रिक्षा चालकांनी गाडी थांबवली नाही तर काही प्रवासी RTO कडे तक्रार करतात. प्रवाश्यांची हिच समस्या लक्षात घेऊन टॅक्सी आणि रिक्षाच्या टपावर लाल आणि हिरवा दिवा बसवण्यात येणार आहे.
नव्या वर्षात या योजनांची अंमलबजावणी परिवहन मंडळाकडून करण्यात येणार आहे. सध्या मुंबई उपनगरात टॅक्सीची संख्या 30 हजार आहे. तर रिक्षांची संख्या 1 लाख इतकी (Lamps on rickshaw taxi) आहे. शहरात वाढत असलेल्या इ-टॅक्सी, बेस्टची भाडे कपात तसेच इंधन दरवाढीमुळे टॅक्सी आणि चालकांच्या व्यवसायावर मंदी आहे. त्यातच आता टपावर दिवा बसवण्यासाठी 700 ते 800 रुपयांचा खर्च करावा लागणार आहे.