मुंबई : आज देशाचे पंतप्रधान मोदी (Pm Modi) यांना मुंबईत पहिला लता दिनानाथ मंगेशकर पुरस्कार (Lata Mangeshkar Award) देण्यात आला. त्यासाठी पंतप्रधान मोदी मुंबईत दाखल झाले होते. मात्र या पुरस्कार सोहळ्यावरून आता जोरदार वाद सुरू झाला आहे. कारण या पुरस्कार सोहळ्याला राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Cm Uddhav Thackeray) यांना निमंत्रण तर होते. मात्र निमंत्रण पत्रिकेवर त्यांचे नाव नव्हते. त्यावरून आता शिवसेनेसह राष्ट्रवादीच्या नेत्यांकडून जोरदार प्रतिक्रिया उमटू लागल्या आहेत. काही वेळापूर्वीच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे नाव नसल्यावरून शिवसेने नेत्या मनिषा कायंदे यांनी आक्रमक होत मंगेशकर परिवारावर निशाणा साधला होता. त्यांनी एक ट्विट करत उघड नाराजी व्यक्त केली होती. मात्र राष्ट्रवाादी नेते जितेंद्र आव्हाड यांनी यावर प्रतिक्रिया देताना हा तर मराठा माणसांचा अपमान आहे, असे म्हटले आहे. तर आमदार रोहित पवार यांनीही यावरून खोचक टोलेबाजी केली आहे.
जितेंद्र आव्हाड ट्विट करत म्हणतात, लता मंगेशकर पुरस्कार सोहळ्याच्या निमंत्रण पत्रिकेवर मुख्यमंत्र्यांचे नाव टाकण्याच मंगेशकर कुटुंबीयांनी टाळले.त्यांची ही भूमिका अगम्य आहे.या राज्यात राहून अमाप लोकप्रियता मिळवणाऱ्या मंगेशकर कुटुंबीयांची ही कृती 12 कोटी मराठी माणसांचा अपमान करणारी आहे. असे ट्विट आव्हाडांकडून करण्यात आले आहे.
लता मंगेशकर पुरस्कार सोहळ्याच्या निमंत्रण पत्रिकेवर मुख्यमंत्र्यांचे नाव टाकण्याच मंगेशकर कुटुंबीयांनी टाळले.त्यांची ही भूमिका अगम्य आहे.या राज्यात राहून अमाप लोकप्रियता मिळवणाऱ्या मंगेशकर कुटुंबीयांची ही कृती 12 कोटी मराठी माणसांचा अपमान करणारी आहे.#निषेद pic.twitter.com/xVarHhGfou
— Dr.Jitendra Awhad (@Awhadspeaks) April 24, 2022
रोहीत पवार यांनी याबाबत बोलताना म्हटले आहे की, पहिला ‘लता दीनानाथ मंगेशकर पुरस्कार’ मिळाल्याबद्दल पंतप्रधान @narendramodi साहेबांचं मनःपूर्वक अभिनंदन! शिवसेनाप्रमुख स्व.बाळासाहेब ठाकरे आणि देशात प्रदीर्घ राजकारणाचा अनुभव असलेले एकमेव नेते आदरणीय पवार साहेब यांच्याशीही गानसम्राज्ञी लतादीदी यांचे तेवढेच जिव्हाळ्याचे संबंध होते. या दोघांनीही प्रत्येक कलेला नेहमीच प्रोत्साहन आणि पाठिंबा दिला. आजच्या कार्यक्रमात स्व. बाळासाहेब ठाकरे साहेबांचे पुत्र म्हणून मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे साहेब आणि पवार साहेबांची उपस्थित असती तर हा कार्यक्रम अधिक गोड दिसला असता, असे ट्विट रोहीत पवार यानी केले आहे.
या दोघांनीही प्रत्येक कलेला नेहमीच प्रोत्साहन आणि पाठिंबा दिला. आजच्या कार्यक्रमात स्व. बाळासाहेब ठाकरे साहेबांचे पुत्र म्हणून मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे साहेब आणि पवार साहेबांची उपस्थित असती तर हा कार्यक्रम अधिक गोड दिसला असता.
— Rohit Pawar (@RRPSpeaks) April 24, 2022
तर शिवसेना नेत्या मनिषा कायंदे याबात नाराजी व्यक्त करतना लिहीतात, #लता दिदीवर मराठी माणसाने भरभरून प्रेम केले. ठाकरे कुटूंब कायमच मंगेशकर कुटूंबाच्या पाठीशी राहिले, त्याच ठाकरे कुटुंबातील मा #उध्दवठाकरे आज महाराष्ट्राचे #मुख्यमंत्री आहेत. कार्यक्रम पत्रिकेत त्यांचे नाव न टाकून #मंगेशकर कुटुंबाने मनाचा कोतेपणा दाखवला आहे.
#लता दिदीवर मराठी माणसाने भरभरून प्रेम केले. ठाकरे कुटूंब कायमच मंगेशकर कुटूंबाच्या पाठीशी राहिले, त्याच ठाकरे कुटुंबातील मा #उध्दवठाकरे आज महाराष्ट्राचे #मुख्यमंत्री आहेत. कार्यक्रम पत्रिकेत त्यांचे नाव न टाकून #मंगेशकर कुटुंबाने मनाचा कोतेपणा दाखवला आहे.@ShivsenaComms pic.twitter.com/N3Ccz9D9ww
— Dr.ManishaKayande (@KayandeDr) April 24, 2022
Ravi Rana : आमदार रवी राणा यांचा आजचा मुक्काम तळोजा जेलमध्ये, आणखी किती अडचणी वाढणार?