लॉरेन्स बिश्नोई… गुन्हेगारी विश्वात दबादबा असणारं नाव. गायक सिद्धू मुसेवाला याचा मर्डर असो की राष्ट्रवादीचे नेते बाबा सिद्दिकी यांची हत्या… या मागे लॉरेन्स बिश्नोईचा हात होता. पण मागच्या 10 वर्षांपासून तुरुंगात असणारा लॉरेन्स बिश्नोई त्याचं नेटवर्क कसं चालवतो? त्याच्या हस्तकांशी कसा संपर्क करतो? याबाबत अनेकांच्या मनात प्रश्न असेल. लॉरेन्स बिश्नोई याच्या नेटवर्कबद्दलची माहिती समोर आली आहे. लॉरेन्स बिश्नोई त्याच्या गँगमधील लोकांशी कसा संपर्क साधतो? त्याच्या हस्तकांशी संपर्कासाठी तो कोणतं माध्यम वापरतो? जाणून घेऊयात…
एखाद्याच्या हत्येचं प्लनिंग लॉरेन्स करतो. हत्या कशी होणार, हत्यारं कोण पोहोचवणार, पळून कुठे जाणार, याचं सगळं गणित लॉरेन्स बिश्नोई आखतो. संपर्कासाठी VOIP अर्थात व्हॉइस ओव्हर इंटरनेट प्रोटोकॉल सिस्टिमचा लॉरेन्स बिश्नोई वापर करतो. या सिस्टिममधून तो इंटरनेट कॉलिंग करतो. याला ट्रेस करणं अवघड असतं. पण असे कॉल्स लॉरेन्स बिश्नोई स्वत: करत नाही. तर तो त्याच्या लोकांना बोलावून घेतो. त्यांच्या माध्यमातून तो हे कॉल्स करतो, असं एका रिपोर्टमध्ये सांगण्यात आलं आहे.
एका रिपोर्टनुसार लॉरेन्स बिश्नोई जेलमधून कम्युनिकेशन करत त्याची टोळी चालवतो. यासाठी तो त्याच्या इतर साथिदारांची मदत घेतो. जेलमध्ये असणाऱ्या इतर गुन्हेगारांशी तो संपर्कात असतो. त्यांना जामीनासाठी तसंच जेलच्या बाहेर गेल्यानंतर लपण्यासाठी लॉरेन्स बिश्नोई जागा देतो. त्यामुळे छोट्या गुन्ह्यांमध्ये अटकेत असणारे लोक त्याला मदत करत असतात.
लॉरेन्स बिश्नोईच्या गँगने कुणाचीही हत्या केली. कुठेही गोळीबार केला तरी लॉरेन्स बिश्नोई पुढे त्याची जबाबदारी स्विकारतो. सोशल मीडियावर पोस्ट लिहित लॉरेन्स बिश्नोई आपणच ही हत्या केल्याचं कबुल करतो. पण अनेकांना प्रश्न पडला असेल की तो पुढे येत गुन्ह्याची कबुली का देतो? तर जेव्हा लॉरेन्स बिश्नोई अशा हत्येच्या घटनांची जबाबदारी स्विकारतो तर त्याचा दबदबा निर्माण होईल, असं लॉरेन्स बिश्नोईला वाटतं. त्याचा वचक असावा, असं लॉरेन्स बिश्नोईला वाटत असल्याने तो पुढे येत हत्येची जबाबदारी स्विकारतो.