मुंबई : मराठा आरक्षणासाठी घेण्यात आलेल्या एकदिवसीय अधिवेशनामध्ये मराठा आरक्षण विधेयकाचा मसुदा विधानसभा आणि विधानपरिषदेमध्ये एकमताने मंजुर करण्यात आला. आता मराठा समजाला शिक्षण आणि नोकरीमध्ये स्वतंत्र 10 टक्के आरक्षण मिळालं आहे. आता हे आरक्षण न्यायालयात टिकणार का याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. विरोधकांनी हे आंदोलन टिकणार नसून मराठा समाजाच्या तोंडाला पानं पुसण्याचं काम केल्याची टीका केली आहे. अशातच यावर वकील गुणरत्न सदावर्ते यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे.
कोणत्या आधारावर आर्थिक मागासलेपणाला सामाजिक मागासलेपणामध्ये रूपांतरित करत आहात. सर्वोच न्यायालयाचे अनेक निवाडे आहेत, ज्यामध्ये अशा प्रकारची कृती म्हणजेच मुख्यमंत्री महाराष्ट्र शासन त्या निकालामध्ये जी काही गाईडलाईन तत्त्व सांगितली होती. त्या गाईडलाईन्सचा चकनाचुर या बिलाच्या माध्यमातून केला आहे. मुळातच मराठा समाज सामाजिक मागास आहे हे दाखवण्यासाठी जो संदर्भा दिला गेला तोही चुकीचा आहे. हा चुकीचा संदर्भ अशा एका व्यक्तीच्या हातात देण्यात आला. जे निवृत्त न्यायाधीश शुक्रे आहेत ते मराठा आरक्षणवादी कार्यकर्ते असल्याचं गुणरत्न सदावर्ते यांनी म्हटलं आहे.
मी एका सर्वसामान्य मराठा शेतकऱ्याचा मुलगा आहे. मराठा समाजाच्या वेदना, दुःखाची मला जाणीव आहे. राज्य सरकारने दिलेला शब्द पाळला. एकेकाळी प्रगत असलेला मराठा समाज आता काळाच्या ओघात मागे पडला आहे. शैक्षणिक, आर्थिक आणि सामाजिकदृष्ट्याही तो मागे लोटला जातोय. मराठा समाजाला कोणत्याही परिस्थितीत आरक्षण मिळवून द्यायच हा निर्धार आम्ही केला होता. हे आरक्षण न्यायालयामध्ये टिकणार असून त्यासाठी एक समिती स्थापन केल्याचं एकनाथ शिंदे म्हणाले.
सरकारने 10 टक्के आरक्षण दिलं म्हणजे काय दिलं, तुम्हाला तसे अधिकार कुणी दिले? तुम्हाला या गोष्टीचे अधिकार आहेत का? निवडणुकीच्या तोंडावर या सगळ्या गोष्टी करायच्या. याला काही अर्थ आहेत का? असं एका राज्यात एका जातीसाठी असं करता येत नसल्याचं राज ठाकरे यांनी म्हटलं आहे.