मुंबईः सध्या राज्यातील राजकारणात प्रचंड वेगाने मोठ मोठ्या घडामोडी घडत आहेत. महाविकास आघाडीच्या सरकारला पायउतार व्हावं लागल्यानंतर मविआ आणि शिंदे-फडणवीस गटाकडून आरोप-प्रत्यारोप केले जात आहेत. त्यातच राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी मंत्री आणि मंत्री जितेंद्र आव्हाड यांच्यावर विनयभंगप्रकरणी तक्रार दाखल झाल्यानंतर राष्ट्रवादी आणि भाजपचा सामना रंगला आहे. रिदा राशीद यांनी विनयभंगाची तक्रार दाखल केल्यानंतर आमदार जितेंद्र आव्हाड यांनी खरचं, विनयभंग केला आहे का यावरुनही आता वादंग माजले आहे.
याप्रकरणी आता वकील रमा सरोदे यांनी आपले स्पष्टपण मत मांडून विनयभंग केल्याचे त्या व्हिडीओमध्ये दिसून येत नसल्याची प्रतिक्रिया त्यांनी दिली आहे.
ज्या प्रकारे रिदा काशीद यांनी आमदार जितेंद्र आव्हाड यांच्यावर टीका टिप्पणी केली आहे. त्याप्रमाणे तर या व्हिडीओत कुठेही तक्रारदार महिलेनं केलेल्या आरोपासारखं दृश्य दिसत नसल्याचे स्पष्ट मत मांडले आहे.
त्यांच्यावर 354 अ लैगिंक अत्याचार विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला असला तरी जो या प्रकरणाचा व्हिडीओ समोर आला आहे. त्यामध्ये विनभंग असं म्हटलं जात आहे मात्र तसे काही दिसून येत नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे.
तो व्हिडीओ बघून त्या म्हणाल्या की, या प्रकरणावरुन असंच दिसतं की, हे स्पष्ट आहे की त्यांच्यावर खोटा गुन्हा दाखल करण्यात आला आहे .
जितेंद्र आव्हाड यांच्या प्रकरणावर आणि पोलीस तक्रार दाखल झाल्यानंतर रमा सरोदे म्हणाल्या की, अशी प्रकरणं घडली असतील तर पोलीसही अशा वेळी गंभीर गुन्हे नोंदवून घेतात असं गंभीर विधानही त्यांनी केलं आहे.
त्या बरोबरच राज्यातील राजकारण पाहता असं दिसून येत आहे की, जिथे काही घडलं नाही तिथं गुन्हे दाखल केले जातात मात्र खरंच जिथे मदतीची गरज असते तिथं मात्र मदत मिळत नाही हे वास्तव असल्याचेही त्यांनी सांगितले.
या अशा प्रकारामुळे महिला त्यांच्या अधिकारांचा गैरवापर करतात असंही दिसून येतं. त्यामुळे जितेंद्र आव्हाडांवर खोटा गुन्हा दाखल करण्यात आला असल्याचेही रमा सरोदे यांनी सांगितले.