पोलीस दलातलं पॉवरफुल पोस्टिंग ते थेट साईडलाईन, मुंबई कमिश्नर झालेल्या IPS अधिकाऱ्यांची अशी परंपरा?
उद्योजक मुकेश अंबानी यांच्या घरासमोर जिलेटीनच्या कांड्या असलेली गाडी उभी केल्याप्रकरणी मुंबई पोलिसांनी मोठी नाचक्ती झाली.
-
-
प्रातिनिधिक फोटो
-
-
अरुप पटनायक (Arup Patnaik) हे 1 मार्च 2011 ते 23 ऑगस्ट 2012 या काळात मुंबई पोलीस आयुक्तपदी कार्यरत होते. मुंबईतील आझाद मैदानावर उसळलेल्या दंगलीप्रकरणी त्यांच्यावर कारवाई करण्यात आली. मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी त्यावेळी तत्कालीन गृहमंत्री आर. आर. पाटील यांच्या राजीनाम्याची मागणी केली होती. यावरुन मोठा वाद तयार झाला. ते राजकीय षडयंत्राचा बळी ठरल्याचंही मत ज्युलियो रिबेरो आणि बी. रमन यांनी व्यक्त केलं होतं.
-
-
सत्यपाल सिंग (Satyapal Singh) 23 ऑगस्ट 2014 ते 31 जानेवारी 2014 या काळात त्यांनी मुंबई पोलीस आयुक्त म्हणून काम पाहिलं. त्यांनी भाजपमध्ये प्रवेश करुन लोकसभा निवडणूक लढवण्यासाठी स्वेच्छा निवृत्ती घेत आपल्या पदाचा राजीनामा दिला. त्यांनी डार्विनचा सिद्धांत नाकारल्याने ते चांगलेच वादात सापडले होते.
-
-
राकेश मारिया (Rakesh Maria) हे 16 फेब्रुवारी 2014 ते 8 सप्टेंबर 2015 या काळात मुंबई पोलीस आयुक्त म्हणून कार्यरत होते. त्यांनी शिना बोरा या हायप्रोफाईल हत्येप्रकरणी केलेल्या कारवाईनंतर त्यांना अचानक बधती देऊन मुंबई पोलीस आयुक्तपदावरुन हटवण्यात आलं होतं. त्यांचीही बदली पोलीस महासंचालक (होमगार्ड) येथे करण्यात आली होती.
-
-
अहमद जावेद (Ahmed Javed) हे 8 सप्टेंबर 2015 ते 31 जानेवारी 2016 या काळात मुंबई पोलीस आयुक्त होते. राकेश मारिया यांची शिरा बोना प्रकरणी बदली झाल्यानंतर त्यांना या पदावर नियुक्त करण्यात आलं. त्यानंतर त्यांची नियुक्ती सौदी अरबच्या राजदूत म्हणून करण्यात आली.
-
-
परमबीर सिंग यांनी (Param Bir Singh) 29 फेब्रुवारी 2020 रोजी मुंबई पोलीस आयुक्त म्हणून जबाबदारी स्वीकारली. ते 1988 बॅचचे आयपीएस अधिकारी आहेत. त्यांनी तत्कालीन पोलीस आयुक्त संजय बर्वे यांच्याकडून पदभार स्वीकारला होता. उद्योजक मुकेश अंबानी यांच्या घरासमोर जिलेटीनच्या कांड्या असलेली गाडी उभी केल्याप्रकरणी वादग्रस्त अधिकारी सचिन वाझे यांना पाठीशी घातल्याचा त्यांच्यावर आरोप झाल्याने त्यांची बदली झाली.