[svt-event title=”CSMT – वाशी मार्गावरील लोकल वाहतूक सुरु” date=”03/08/2019,7:52PM” class=”svt-cd-green” ]
CSMT – वाशी मार्गावरील लोकल वाहतूक सुरु, मध्य रेल्वेवरील सर्व मार्गावरील, सर्व दिशेची वाहतूक सुरु, मध्य रेल्वेचा दावा @Central_Railway pic.twitter.com/VGLTdngmOX
— TV9 Marathi (@TV9Marathi) August 3, 2019
[svt-event title=”कोयना धरणातून पाण्याचा विसर्ग वाढवला” date=”03/08/2019,7:20PM” class=”svt-cd-green” ] कोयने धरणाचा पाण्याचा विसर्ग वाढविला. कोयना धरण पाणलोट क्षेत्रात जोरदार पाऊस. धरणात 82010 क्यसूकने पाण्याची आवक. धरणाचा पाणीसाठा 90.46 TMC, धरणाचे सहा वक्रद्वार 3 फुटांवर उचलले. कोयना नदीपात्रात एकूण 19580 क्यूसेक विसर्ग [/svt-event]
[svt-event title=”पुण्यात भिंत कोसळली” date=”03/08/2019,7:47PM” class=”svt-cd-green” ]
#पुणे : कसबा पेठ, धडफळे वाड्याची रस्त्याकडील बाजूची भिंत पडली, चारचाकी वाहनावर भिंत पडल्यामुळे गाडीचे नुकसान,पालिकेचे कर्मचारी घटनास्थळी दाखल, सुदैवाने जीवितहानी नाही,दोन दिवसात पडझडीची तिसरी घटना pic.twitter.com/DBR2410gsC
— TV9 Marathi (@TV9Marathi) August 3, 2019
[svt-event title=”कल्याणकडे जाणाऱ्या लोकलमध्ये गर्दी” date=”03/08/2019,7:14PM” class=”svt-cd-green” ] ठाणे फलाट क्रमांक एकवर मोठ्या प्रमाणात गर्दी, कल्याणकडे जाणाऱ्या गाडीत तुफान गर्दी [/svt-event]
[svt-event title=”वेण्णा,कृष्णा नद्यांनी धोक्यांची पातळी ओलांडली” date=”03/08/2019,7:09PM” class=”svt-cd-green” ] साताऱ्यातील वेण्णा,कृष्णा नद्यांनी धोक्यांची पातळी ओलांडली. सातारा- बारामती- शिरुर राज्य मार्गावरील ब्रिटिशकालीन वाडे आणि वडुज येथील पुलांवरील अवजड वाहतूक थांबवली. जिल्हा प्रशासनाकडून पुलांची पाहणी. जिल्हाधिकारी श्वेता सिंघल यांनी पाहणी केली. नागरीकांनी पुराच्या पाण्यात उड्या न मारण्याचं प्रशासनाचं आवाहन [/svt-event]
[svt-event title=”CSMT-वाशी अद्याप बंद” date=”03/08/2019,6:59PM” class=”svt-cd-green” ] पश्चिम आणि मध्य रेल्वे, ठाणे-पनवेल/वाशी ट्रान्सहार्बर रेल्वे मार्गावरील वाहतूक सुरु, फक्त सीएसएमटी-वाशी मार्गावरील वाहतूक अद्याप बंद [/svt-event]
[svt-event title=”कुर्ल्याहून कल्याणच्या दिशेने पहिली लोकल रवाना, मध्य रेल्वेची वाहतूक पूर्वपदावर” date=”03/08/2019,5:05PM” class=”svt-cd-green” ] मुंबई : कुर्ल्याहून कल्याणच्या दिशेने पहिली लोकल रवाना, गेल्या काही तासांपूर्वी कुर्ल्यात रेल्वे रुळावर पुलाचा कठडा कोसळला होता, त्यामुळे कल्याणच्या दिशेने जाणारी वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली होती, त्यानंतर आता कुर्ल्याहून कल्याणकडे जाणारी वाहतूक पुन्हा सुरळीत सुरु झाली आहे [/svt-event]
[svt-event title=”डोंबिवलीत स्वाईन फ्लूने दीड वर्षीय मुलीचा मृत्यू ” date=”03/08/2019,3:50PM” class=”svt-cd-green” ] डोंबिवलीमध्ये स्वाईन फ्लूमुळे दीड वर्षाच्या मुलीचा मृत्यू झाला. पियुषा अरुण सैल असं या मृत मुलीचे नाव आहे. ही घटना डोंबिवली राजूनगर परीसरातील आहे. विशेष म्हणजे केडीएमसीच्या रुग्णालयात डेंग्यू आणि स्वाईन फ्लू तपासणीचे किट उपलब्ध नाहीत. आयुक्तांनी त्वरित किट आणि डॉक्टर उपलब्ध करावा, अशी मागणी स्थानिकांनी केली. [/svt-event]
[svt-event title=”पुण्यातील खडकवासला धरणातून 27 हजार क्यूसेक्स पाण्याचा विसर्ग” date=”03/08/2019,3:37PM” class=”svt-cd-green” ] पुण्यातील खडकवासला धरणातून सायंकाळी 4 नंतर 27 हजार क्यूसेक्स पाण्याचा विसर्ग सुरु होणार आहे. नदीकाठी परिसरातील नागरिकांना प्रशासनाचा सतर्कतेचा इशारा दिला आहे. [/svt-event]
[svt-event title=”मुख्यमंत्र्यांच्या सभेत गोसीखुर्द प्रकल्पग्रस्तांचे आंदोलन” date=”03/08/2019,3:32PM” class=”svt-cd-green” ] मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या भंडाऱ्यातील सभेत गोसीखुर्द प्रकल्पग्रस्तांचे आंदोलन. प्रकल्पग्रस्त आंदोलक हे आमदार बच्चू कडू यांच्या प्रहार संघटनेचे कार्यकर्ते आहेत. मागण्या मान्य करण्यासाठी बॅनर फडकावले. मुख्यमंत्र्यांचे भाषण सूरु असताना हा प्रकार घडला. आंदोलक प्रकल्पग्रस्ताना पोलिसांनी ताब्यात घेतले. [/svt-event]
[svt-event title=”शहापूरमध्ये मुसळधार पाऊस, भातसा धरणाच्या पाणी पातळीत वाढ” date=”03/08/2019,3:16PM” class=”svt-cd-green” ] शहापूरमध्ये पडत असलेल्या मुसळधार पावसाने भातसा धरणाची पाणी पातळी वाढली आहे. धरणाचे 5 दरवाजे 2:50 मीटरने उघडण्यात आले असून 3 हजार प्रति सेकंद क्यूसेसने पाण्याचा विसर्ग होत आहे. मात्र यामुळे संपूर्ण गाव भीतीच्या दहशतीखाली आहे. गावातील नागरिकही भयभीत झाले आहेत. विसर्ग वाढल्याने तीवरे धरणासारखी परिस्थिती सावरशेत गावाची होऊ शकते. [/svt-event]
[svt-event title=”गडचिरोलीत मुसळधार पाऊस, शेकडो गावांचा संपर्क तुटला” date=”03/08/2019,3:12PM” class=”svt-cd-green” ] गडचिरोलीत काल मुसळधार पाऊस पडल्याने जिल्ह्यातील नद्या, नाल्यांना पूर आला आहे. दक्षिण भागातील चार मार्ग बंद झाल्याने शेकडो गावांचा संपर्क तुटला आहे. काल दुपारपासून पर्लकोटा आणि बांडिया नदीला पूर आला आहे. वडसा-नागपूर राष्ट्रीय महामार्गही बंद झाला आहे. [/svt-event]
[svt-event title=”भंडारदरा धरण ओव्हर फ्लो” date=”03/08/2019,3:08PM” class=”svt-cd-green” ] भंडारदार उत्तर नगर जिल्ह्यातील 11 टीएमसी क्षमतेचे धरण आहे. 10 हजार 500 मिली साठा झाल्यावर धरण तांत्रिकदृष्ट्या भरल्याची घोषणा करण्यात आली. धरणाच्या स्पिल-वे-गेटमधून 2400 क्युसेक वेगाने विसर्ग सुरु आहे. विसर्ग सुरु झाल्याने पाणी निळवंडे धरणात जमा होणार. [/svt-event]
[svt-event title=”हार्बर मार्गावरील रेल्वे वाहतूक ठप्प” date=”03/08/2019,2:56PM” class=”svt-cd-green” ] हार्बर मार्गावरील रेल्वे वाहतूक ठप्प झाली. कुर्ला ते चुनाभट्टी रेल्वे रुळांवर पाणी साचल्याने रेल्वे वाहतूकीवरही परिणाम झाला आहे. पुलाचा कठडा कोसळल्याने वाहतूक ठप्प झाली आहे. कल्याणकडे जाणारी जलद मार्गावरील वाहतूक ठप्प झाल्यामुळे जलद मार्गावरील सर्व गाड्या धिम्या मार्गावर वळवण्यात आल्या आहेत. [/svt-event]
[svt-event title=”पुण्यातील मुळशी धरण 93% भरले, धरण परिसरात पावसाचा जोर वाढला” date=”03/08/2019,1:25PM” class=”svt-cd-green” ]
#पुणे – मुळशी धरण 93% भरले, धरण परिसरात पावसाचा जोर वाढला,
मुळशी धरणातून विसर्ग चालू pic.twitter.com/RMiImLE0kh— TV9 Marathi (@TV9Marathi) August 3, 2019
[svt-event title=”VIDEO : मुलुंडमध्ये रेल्वे परिसरात पाणीच पाणी तर वसईमध्ये रस्ते जलमय” date=”03/08/2019,1:23PM” class=”svt-cd-green” ]
VIDEO : मुलुंडमध्ये रेल्वे परिसरात पाणीच पाणी तर वसईमध्ये रस्ते जलमय pic.twitter.com/Wn1y3gDee7
— TV9 Marathi (@TV9Marathi) August 3, 2019
[svt-event title=”नवी मुंबईतील पांडवकडा येथे तीन महिलांचा बुडून मृत्यू” date=”03/08/2019,12:28PM” class=”svt-cd-green” ] नवी मुंबईतील पांडवकडा येथे तीन महिलांचा बुडून मृत्यू झाला आहे. एका महिलेचा मृतदेह मिळाला असून इतर दोन वाहून गेल्याचे सांगण्यात येत आहे. घटनास्थळी खारघर पोलीस आणि अग्निशमन दलाचे कर्मचारी दाखल झाले असून शोध मोहिम सुरु आहे. [/svt-event]
[svt-event title=”उल्हासनगरमध्ये शॉक लागून तरुणाचा मृत्यू” date=”03/08/2019,11:53AM” class=”svt-cd-green” ] उल्हासनगरमध्ये शॉक लागून 14 वर्षीय तरुणाचा मृत्यू झाला आहे. ही घटना सी ब्लॉक रोड येथील रोहिदास नगर परिसरात घडली. विजेच्या खांब्याला स्पर्श झाल्याने शॉक लागल्याचा अंदाज [/svt-event]
[svt-event title=”नवी मुंबईतील एपीएससी मार्केटमध्ये पाणी साचलं” date=”03/08/2019,11:23AM” class=”svt-cd-green” ] मुसळधार पावसामुळे नवी मुंबईतही ठिकठिकाणी पाणि साचलं आहे. उरण फाटा, पनवेल उड्डाणपूला खाली, एरोली, वाशीजवळही पाणी साचलं आहे. [/svt-event]
[svt-event title=”उल्हास नदीला पूर, बदलापूरमधील नागरिकांना सतर्कतेचा ईशारा” date=”03/08/2019,11:21AM” class=”svt-cd-green” ] उल्हास नदी दुथडी भरुन वाहत आहे. धोक्याची पातळी ओलांडायला आणखी दीड मीटर बाकी आहे. जोरदार पावसामुळे नदी पात्र ओलांडून पाणी शेजारील परिसरात घुसण्याची शक्यता आहे. त्यामुळे प्रशासनाकडून सावधगिरी म्हणून नागरिकांना सतर्कतेचा इशारा दिला आहे. [/svt-event]
[svt-event title=”घोडबंदर इमारतीची संरक्षण भिंत कोसळली ” date=”03/08/2019,11:18AM” class=”svt-cd-green” ] ठाणे घोडबंदर येथे इमारतीची भिंत कोसळली आहे. भिंत कोसळल्याने इमारतीमध्ये पाणी शिरलं आहे. इमारतीमधील गाड्यांचे नुकसान झाले असून कोणीतीही जिवीतहानी नाही. [/svt-event]
[svt-event title=”आज दुपारी सर्वात मोठी हाय टाईड, प्रशासनाकडून सतर्क राहण्याचा ईशारा” date=”03/08/2019,10:52AM” class=”svt-cd-green” ]
#MumbaiRainsLive –
आज ३ ऑगस्टला दुपारी १ वाजून ४४ मिनिटांदरम्यान ४.९ मिटरची हाय टाइड असल्याने नागरिकांनी सतर्क रहावे. समुद्रकिनारी जाणाऱ्या पर्यटकांनी देखील काळजी घेण्याचे राज्य आपत्ती व्यवस्थापन मंत्रालय नियंत्रण कक्षाचे आवाहन pic.twitter.com/o2KhqJg1Yx— MAHARASHTRA DGIPR (@MahaDGIPR) August 3, 2019
[svt-event title=”अतिवृष्टीमुळे कर्जत ते मुंबई लोकल सेवा ठप्प” date=”03/08/2019,9:27AM” class=”svt-cd-green” ] अतिवृष्टीमुळे मुंबई ते कर्जत लोकल सेवा ठप्प झाली आहे. तर एसटी वाहतूक ही जागोजागी बंद झाली आहे. सावित्री नदीला पूर आल्याने जिल्ह्यातील अनेक भागात पाणी साचलं आहे. 8.27 ला कर्जतहून निघालेली लोकल नेरळ स्थानकात थांबवण्यात आली आहे. [/svt-event]
[svt-event title=”गोदावरी नदीच्या पाणी पातळीत वाढ” date=”03/08/2019,9:22AM” class=”svt-cd-green” ] नाशिकमधील गोदावरी नदीच्या पाणी पातळीत वाढ झाली आहे. पहाटेपासून पावसाची जिल्ह्यात जोरदार बॅटिंग सुरु आहे. गंगापूर धरणातून 8973 क्यूसेसने गोदावरीत पाण्याचा विसर्ग सुरु आहे. त्यामुळे गोदावरी काठीवरील मंदिरे, दुकाणने पाण्याखाली गेली आहेत. [/svt-event]
[svt-event title=”महाड शहरात सावित्री नदीचे पाणी शिरले” date=”03/08/2019,9:19AM” class=”svt-cd-green” ] रायगड येथील सावित्री नदीने धोक्याची पातळी गाठली आहे. महाड बाजारपेठ तसेच आजूबाजूच्या गावात सावित्री नदीचे पाणी शरिले आहे. महाडमध्ये आपत्कालीन परिस्थिती निर्माण झाली आहे. [/svt-event]
[svt-event title=”ठाणे रेल्वे ट्रॅकवर पाणी साचलं, मध्य रेल्वे विस्कळीत” date=”03/08/2019,9:14AM” class=”svt-cd-green” ]
VIDEO : ठाणे : मुसळधार पावसाने पूर परिस्थिती, ठाणे रेल्वे ट्रॅकवर पाणी साचले, मध्य रेल्वे वाहतूक विस्कळीत तर लोकल कासव गतीने धावत आहेत. pic.twitter.com/qOljzRFfMA
— TV9 Marathi (@TV9Marathi) August 3, 2019
[svt-event title=”मुसळधार पावसामुळे ठाण्यातील मनपा शाळांना सुट्टी” date=”03/08/2019,9:07AM” class=”svt-cd-green” ] मुसळधार पावसामुळे ठाण्यातील मनपा शाळांना सुट्टी देण्यात आली आहे. रात्रीपासून पावसाचा जोर कायम असल्यामुळे अनेक भागात पाणी साचलं आहे. त्यामुळे मनपा आयुक्तांनी आज सर्व शाळा बंद ठेवण्याचे आदेश दिले आहेत. [/svt-event]
[svt-event title=”मध्य रेल्वे विस्कळीत, लोकल 30 ते 40 मिनिटं उशिारने ” date=”03/08/2019,9:02AM” class=”svt-cd-green” ] कालरात्रीपासून संततधार पडणाऱ्या पावसाचा फटका आता मुंबईच्या लोकल ट्रेनलाही बसला आहे. मध्ये रेल्वे मार्गावर 30 ते 40 मिनिटं उशिराने लोकल ट्रेन धावत आहे. त्यामुळे मोठ्या प्रमाणात चाकरमन्यांचे हाल झाले आहेत. कल्याण रेल्वे स्थानकातील रेल्वे ट्रॅकवर पाणी साचल्याने अप आणि डाऊ लोकल सेवा विस्कळीत झाली आहे. [/svt-event]
[svt-event title=”मुंबईत पुढील 24 तासात मुसळधार पावसाची शक्यता” date=”03/08/2019,8:58AM” class=”svt-cd-green” ] मुंबईत पुढील 24 तासात मुसळधार पावसाची शक्यता वेधशाळेने वर्तवली आहे. मुंबईसह उपनगर, ठाणे, नवी मुंबई विभागातही जोरदार पाऊस पडण्याची शक्यता आहे. [/svt-event]
[svt-event title=”संततधार पावसामुळे भिवंडी शहरातील अनेक भागात पाणी साचले” date=”03/08/2019,8:54AM” class=”svt-cd-green” ] भिवंडी शहरात रात्रीपासून सुरु असलेल्या मुसळधार पावसामुळे पुन्हा एकदा शहरातील सखल भागात पाणी साचण्यास सुरवात झाली आहे. कल्याण नाका, पदमानगर, कमला हाॅटेल, नदीनाका, मंडई, बाजारपेठ, इदगाह भागात पाणी साचले आहे. [/svt-event]
[svt-event title=”मुसळधार पावसामुळे उपनगरातील ट्रेन उशिराने” date=”03/08/2019,8:50AM” class=”svt-cd-green” ]
Due to heavy rains, suburban trains are running with cautious speed causing some delays but no hold up of traffic as of now. Inconvenience is regretted.@drmmumbaicr @RidlrMUM @m_indicator
— Central Railway (@Central_Railway) August 3, 2019
[svt-event title=”नागपूरमध्ये नांद नदीला पूर” date=”03/08/2019,8:47AM” class=”svt-cd-green” ] नांद-शिडेश्वर धरणाचे 5 दरवाजे उघडले. त्यामुळे सर्वत्र पूरग्रस परिस्थिती निर्माण झाली आहे. शेतात पाणी गेल्याने मोठं नुसकसान झालं आहे. [/svt-event]
[svt-event title=”मालाड सबवे वाहतुकीसाठी बंद” date=”03/08/2019,8:38AM” class=”svt-cd-green” ] मुंबईत संततधार सुरु असलेल्या पावसामुळे मालाड सबवे बंद करण्यात आला आहे. दोन्ही बाजूने या सबवेला बॅरिकेट्स लावण्यात आले आहेत. काहीदिवसांपूर्वी या सबवेमध्ये गाडी अडकल्याने दोन जणांचा मृत्यू झाला होता. त्यामुळे हा सबवे बंद करण्यात आला आहे. [/svt-event]
[svt-event title=”पुण्यातील खडकवासला धरणातून पाण्याचा विसर्ग वाढणार” date=”03/08/2019,8:35AM” class=”svt-cd-green” ] खडकवासला धरणातून 11 वाजता 27 हजार 203 क्युसेक पाण्याचा विसर्ग होणार, मुठा नदी पात्रातील रस्त्यांवर पाणी पोहोचणार असल्याने भिडे पूल पाण्याखाली जाणार आहे. त्यामुळे नदीपात्रातील या मार्गावरील वाहतूक बंद करण्यात येणार आहे. [/svt-event]
[svt-event title=”रायगड येथील माणगाव-श्रीवर्धन रोड बंद, दोन गावांचा संपर्क तुटला” date=”03/08/2019,8:31AM” class=”svt-cd-green” ] रायगड येथे माणगाव-श्रीवर्धन रोड बंद करण्यात आला आहे. मुसळधार पावसामुळे नद्यांना महापूर आला आहे. माणगाव श्रीवर्धन रोडवरील नदी-नाले ओव्हरफ्लो झाल्यामुळे दोन तालुक्याचा सपंर्क तुटला. अनेक वाहने ठिकठिकाणी अडकली असून जनजिवन विस्कळीत झाले आहे. [/svt-event]
[svt-event title=”रत्नागिरी-मुंबई-गोवा महामार्गावरील वाहतूक सुरु” date=”03/08/2019,8:27AM” class=”svt-cd-green” ] खेड येथील जगबुडी नदीच्या पाण्याची पातळी कमी झाल्याने वाहतूक सुरु करण्यात आली आहे. 8 तासानंतर जगबुडी नदी पुलावरील वाहतूक सुरु केली आहे. काल रात्री 11.20 वाजल्यापासून जगबुडी पूल वाहतुकीसाठी बंद करण्यात आला होता. [/svt-event]
[svt-event title=”ठाण्यात मुसळधार पाऊस” date=”03/08/2019,7:57AM” class=”svt-cd-green” ] मुंबईसह ठाण्यात दुसऱ्या दिवशीही पावसाचा जोर कायम आहे. सकाळ पासून ठाण्यात मुसळधार पावसाला सुरुवात झाली. ठाण्यातील अनेक सखोल भागात पाणी साचले, तर ठाण्यातील डॉ.आंबेडकर रोड या महत्त्वाच्या मार्गावरील नाला तुडूंब भरल्याने नाल्यातील पाणी रस्त्यावर आलं आहे. पूर्ण रस्ता बंद करण्यात आला आहे. तसेच हजुरी आणि हिरानंदानी इस्टेट भागातही पाणी साचलं आहे. [/svt-event]
[svt-event title=”मुंबई-रायगड वाहतूक ठप्प” date=”03/08/2019,7:52AM” class=”svt-cd-green” ] मुंबई-रायगड महामार्गावर दरड कोसळल्याने वाहतूक ठप्प झाली आहे. ही घटना पोलादपूर तालुक्यातील कशेडी घाटात घडली. येथे दोन ठिकाणी दरड पडल्याने वाहतूक बंद झाली आहे. युद्धपातळीवर दरड आणि मातीचा ढिगारा बाजूला करण्याचे काम चालू आहे. [/svt-event]
[svt-event title=”रत्नागिरी-मुंबई-गोवा महामार्गावरील वाहतूक ठप्प” date=”03/08/2019,7:49AM” class=”svt-cd-green” ] रत्नागिरी -मुंबई-गोवा महामार्गावरील वाहतूक ठप्प झाली आहे. खेड येथील जगबुडी नदीने धोक्याची पातळी गाठल्याने वाहतूक बंद करण्यात आली आहे. रात्री 11.20 वाजल्यापासून जगबुडी पूल वाहतुकीसाठी बंद केला असून पुलावर मदतीसाठी स्थानिकांचा खडा पहारा [/svt-event]
[svt-event title=”मुंबईसह पूर्व-पश्चिम उपनगरात जोरदार पाऊस” date=”03/08/2019,7:45AM” class=”svt-cd-green” ] मुंबईसह उपनगरात काल ( 2 ऑगस्ट) रात्रीपासून जोरदार पाऊस पडत आहे. त्यामुळे काही ठिकाणी पाणी साचलं आहे. ठाणे, भांडूप, घाटकोपर, कुर्ला, वांद्रे, सांताक्रुझ, दहिसर, गोरेगाव, वरळी, लालबाग, दादरमध्ये सतंतधार पाऊस [/svt-event]
[svt-event title=”पालघर येथे झाड कोसळ्याने वाहतूक बंद” date=”03/08/2019,7:42AM” class=”svt-cd-green” ] रात्रीपासून मुसळधार पाऊस आणि जोरदार हवेमुळे पालघर येथे झाड पडले. सकाळी बोईसर चित्रालय रस्ता येथे हे झाड पडले. झाड कोसळ्याने मोठ्या गाड्यांची वाहतूक बंदअसून फक्त छोट्या गाड्यांची वाहतूक सुरु आहे. [/svt-event]
[svt-event title=”वसई, विरार आणि नालासोपारा परिसरात जोरदार पाऊस” date=”03/08/2019,7:39AM” class=”svt-cd-green” ] वसई, विरार आणि नालासोपारा परिसरात जोरदार पाऊस, शहरातील अनेक रस्ते जलमय, विरार पश्चिम विवा कॉलेज रस्ता, उत्कर्ष विद्यालया समोरील बस्थानक रस्ता, नालासोपारा पूर्व सेन्ट्रलपार्क, ओसवाल नगरी, तुलिंज रोड, आचोले रोड, वसई आनंद नगर, डिजी नगर परिसरातील मुख्य रस्त्यावर पाणी साचलं आहे. [/svt-event]