लॉकडाऊनमध्ये ग्राहकांना लुबाडणाऱ्या रेशन दुकानदारांवर कारवाई

| Updated on: Apr 13, 2020 | 11:57 PM

निश्चित दरापेक्षा जास्त दरात धान्य विक्री करणाऱ्या अशाच रेशन दुकानदारांवर कारवाई करण्यात आली आहे.

लॉकडाऊनमध्ये ग्राहकांना लुबाडणाऱ्या रेशन दुकानदारांवर कारवाई
Follow us on

मुंबई : कोरोना विषाणूचा धोका पाहता सध्या (Lockdown Effect) राज्यात लॉकडाऊन आहे. या काळात कुणालाही घराबाहेर पडण्यास मज्जाव करण्यात आला आहे. सर्व कंपन्या, ऑफिस सर्व बंद आहे. त्यामुळे लोक त्यांच्या घरात आहेत. नागरिकांना अडचण होऊ नये म्हणून सरकारने रेशनकार्ड धारकांना कमी दरात रेशन उपलब्ध करुन दिलं. मात्र, काही रेशन दुकानदार या काळातही ग्राहकांची फसवणूक करताना आढळत आहेत. निश्चित दरापेक्षा जास्त दरात धान्य विक्री करणाऱ्या अशाच रेशन दुकानदारांवर (Lockdown Effect) कारवाई करण्यात आली आहे.

या दुकानदारांना हेराफेरी करताना रंगेहात पकडलं आहे. जीवनावश्यक वस्तू कायदाअंतर्गत या रेशनिंग दुकानदारांवर कारवाई करण्यात आली आहे. मुंबई-ठाण्यातील पाच दुकानदारांवर ही कारवाई करण्यात आली आहे. रेशनिंग अन्नधान्यात हेराफेरी करणाऱ्या मुंबईतील पाच रेशनिंग दुकानांवर (Lockdown Effect) रेशनिंग कंट्रोलरने कारवाई केली आहे. या रेशनिंग दुकानदारांवर जीवनावश्यक वस्तू कायदा कलम 3 आणि 7 अंतर्गत कारवाई करण्यात आली आहे.

हे रेशनिंग दुकानदार कार्डधारकांना गहू आणि तांदूळ विक्री करताना जास्त किमतीत दर लावून विकत असताना रेशनिंग कंट्रोल अधिकाऱ्यांनी यांना रंगेहात पकडले आहे. याचवेळी पुढील चार दिवसात मोफत तांदूळ रेशनिंगच्या दुकानात दिला जाईल, अशी माहिती मुंबई ठाण्याचे रेशनिंग कंट्रोलर कैलास पगारे यांनी दिली आहे (Lockdown Effect).

संबंधित बातम्या :

Corona : वापरलेले मास्क धुवून पुन्हा विक्रीसाठी, 50 लाखाचा बोगस N-95 मास्कचा साठा जप्त

देशात कोरोनाचं भयंकर संकट, पण चंद्रकांतदादांना सत्ता गेल्याचं दु:ख : राजू वाघमारे

72 वर्षीय माऊलीची आभाळमाया, 15 दिवसापासून 300 पोलिसांना भरवतेय घास

पुण्यातील भवानी पेठ कोरोनाचे ‘डेथ सेंटर’, 11 रहिवासी दगावले, रुग्णसंख्या 69 वर