मुंबई : कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लॉकाडऊनचा (Lockdown Rules In Maharashtra) कालवाधी वाढवत 3 मे पर्यंत केला. त्यानंतर लॉकडाऊनसंदर्भात राज्य शासनाने नवीन सर्वसमावेशक अधिसूचना जारी केली आहे.
या नियमावलीमध्ये, लॉकडाऊनच्या काळात काय सुरु राहील आणि काय नाही. तसेच, कुठल्या गोष्टींमध्ये सूट देण्यात आली आहे याबाबतही माहिती देण्यात आली आहे.
लॉकडाऊनचा दुसरा टप्पा
– लॉकडाऊनच्या दुसऱ्या टप्प्यात अतिरिक्त औद्योगिक घटकांसह, शेतीविषयक बाबी, बांधकाम क्षेत्र यांना अधिक सूट देण्यात आली आहे.
– सराकारी कार्यालयांमध्ये 10 टक्के शासकीय कर्मचाऱ्यांची उपस्थिती अनिवार्य असेल.
– मंत्रालयात येण्या-जाण्यासाठी ‘एस.टी.’ आणि ‘बेस्ट’ची विशेष बस सुविधा असेल.
– जीवनावश्यक वस्तूंची दुकानं सुरु राहणार.
– जीवनावश्यक वस्तूंची मालवाहतूक करणारे ट्रक आणि ट्रक गॅरेजही सुरु असेल.
– शेती विषयक कामं, कीटकनाशके, खते विक्री दुकानं मत्स्यव्यवसाय, सिंचन प्रकल्प, मनरेगाची कामं सुरु राहणार.
– डिजीटल व्यवहार सुरु राहणार.
– आयटी सेवा आणि कॉल सेंटरमध्ये 50 टक्के कर्मचाऱ्यांची उपस्थितीची मुभा असेल.
– कुरिअर सेवा सुरु असेल.
– ऑनलाइन शिक्षण सुरु असेल.
– सरकारी कार्यालयं सुरु असतील.
– आरोग्य सेवा सुरु असतील.
– लॉकडाऊनमध्ये अडकलेल्या लोकांसाठी राहण्याची व्यवस्था करणारी हॉटेल आणि तोरण टाईम सेंटर सुरु राहतील.
– इलेक्ट्रिशिअन, प्लंबर, मोटार मेकॅनिक, पार्टी सुविधा देणारे कर्मचारी काम करु शकतील.
लॉकडाऊनच्या काळात 20 एप्रिलपासून या सर्व गोष्टी सशर्त सुरु राहणार आहेत.
स्पेशल रिपोर्ट : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे नेमके आमदार कसे होणार?https://t.co/8o3sGMPUjE #cmomaharashtra
— TV9 Marathi (@TV9Marathi) April 17, 2020
केंद्रीय गृह मंत्रालयातूनही लॉकडाऊनच्या दुसऱ्या टप्प्यात कोणाला सूट मिळणार, काय नियम असणार याबाबत मार्गदर्शन करणारी नियमावली जारी करण्यात आली होती.
केंद्राच्या नियमावलीनुसार लॉकडाऊनच्या दुसऱ्या टप्प्यात काय सुरु राहणार?
लॉकडाऊनच्या दुसऱ्या टप्प्यात अत्यावश्यक सेवा, शेती संबंधित कामं, आरोग्य सेवा, मेडिकल, रुग्णालय, नर्सिंग होम, दवाखाने, पॅथलॅब आणि औषधाशी संबंधित सर्व कामं सुरु राहतील. त्यासोबत बँका आणि एटीएमही सुरु राहणार आहेत.
केंद्राच्या नियमावलीनुसार लॉकडाऊनच्या दुसऱ्या टप्प्यात काय बंद राहणार ?
आंतरराज्यीय आणि आंतरराष्ट्रीय विमानवाहतूक, ट्रेन, मेट्रोसेवा, बससेवा, सर्व शैक्षणिक संस्था, औद्योगिक आणि कमर्शिअल कामे, हॉटेल, टॅक्सी, ऑटोरिक्षा, सायकल रिक्षा, चित्रपट गृह, शॉपिंग, कॉम्प्लेक्स, व्यायामशाळा, स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स, स्वीमिंग पूल, बार, कोणताही सार्वजनिक कार्यक्रम, सर्व धार्मिक कार्यक्रम बंद राहणार आहेत.
विशेष म्हणजे कोरोनाच्या हॉटस्पॉट भागांमध्ये कोणत्याही प्रकारची सूट दिली जाणार नाही. या भागातील नागरिकांना घरातून बाहेर पडण्यास बंदी आहे. त्यासोबत सर्व जीवनावश्यक वस्तू या घरपोच देण्यात येणार आहेत. या विभागात अत्यावश्यक सेवेतील कर्माचाऱ्यांनाच जाण्यायेण्याची मुभा मिळणार आहे.
दरम्यान, देशात दिवसेंदिवस कोरोनाबाधितांच्या संख्येत वाढ होत आहे. आतापर्यंत देशात 9756 कोरोना रुग्ण आढळले आहेत. तर 377 रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. देशात आतापर्यंत 1305 जण कोरोनामुक्त झाले आहेत.
राज्यात कोरोनाचे किती रुग्ण?
राज्यातील कोरोनाबाधित रुग्णांची संख्या 3320 वर पोहोचली आहे (Total Corona Patient in Maharashtra). राज्यात आज दिवसभरात 118 नवीन रुग्णांची नोंद झाली. तर 31 रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला. राज्यात आतापर्यंत 331 रुग्ण बरे झाले असून त्यांना घरी सोडण्यात आलं असल्याची माहिती आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी दिली
कोरोना रुग्णांची अद्ययावत आकडेवारी :
जिल्हा | रुग्ण | बरे | मृत्यू |
---|---|---|---|
मुंबई | 343962 | 318995 | 11535 |
पुणे | 439562 | 405696 | 8144 |
ठाणे | 293052 | 274816 | 5873 |
पालघर | 49872 | 47852 | 939 |
रायगड | 72974 | 69761 | 1613 |
रत्नागिरी | 12336 | 11646 | 425 |
सिंधुदुर्ग | 6777 | 6359 | 180 |
सातारा | 60722 | 57120 | 1858 |
सांगली | 51829 | 49294 | 1800 |
नाशिक | 137449 | 128167 | 2093 |
अहमदनगर | 79880 | 76380 | 1171 |
धुळे | 18870 | 16902 | 337 |
जळगाव | 69604 | 63098 | 1542 |
नंदूरबार | 11448 | 10157 | 229 |
सोलापूर | 59754 | 56379 | 1859 |
कोल्हापूर | 50144 | 48056 | 1684 |
औरंगाबाद | 59429 | 50987 | 1289 |
जालना | 16713 | 15779 | 394 |
हिंगोली | 5342 | 4497 | 100 |
परभणी | 9332 | 7943 | 313 |
लातूर | 26927 | 25245 | 716 |
उस्मानाबाद | 18533 | 17413 | 576 |
बीड | 20796 | 18513 | 577 |
नांदेड | 26170 | 22710 | 692 |
अकोला | 20302 | 16111 | 404 |
अमरावती | 43318 | 38752 | 567 |
यवतमाळ | 21989 | 18875 | 497 |
बुलडाणा | 20865 | 17605 | 270 |
वाशिम | 11352 | 10120 | 169 |
नागपूर | 173547 | 152959 | 3584 |
वर्धा | 16143 | 14254 | 325 |
भंडारा | 14604 | 13711 | 315 |
गोंदिया | 14858 | 14440 | 175 |
चंद्रपूर | 25987 | 24485 | 422 |
गडचिरोली | 9325 | 8994 | 103 |
इतर राज्ये (महाराष्ट्रात उपचार सुरु) | 146 | 0 | 91 |
एकूण | 2314413 | 2134072 | 52861 |
संबंधित बातम्या :
Corona | राज्यात दिवसभरात 31 रुग्णांची कोरोनावर मात, बाधितांची संख्या 3320 वर
पुण्यात 580 जणांना कोरोना संसर्ग, 47 जणांचा मृत्यू, हॉटस्पॉट ठरलेल्या भवानी पेठेसह कोठे किती रुग्ण?
Corona : कोरोनाचा विळखा वाढताच, नागपुरात जनजागृतीसाठी ‘कोरोना पुतळा’
लॉकडाऊन काळात 50 हजार गुन्हे दाखल, 1 कोटींचा दंड वसूल, 10 हजार जणांना अटक