‘त्या’ मतदारसंघातील उमेदवारांची नावे गुलदस्त्यात, ठाकरे गटाने वाढवला पाच जागांवरील सस्पेन्स

| Updated on: Mar 27, 2024 | 2:21 PM

ठाकरे गटाने 16 उमेदवारांची यादी जाहीर करण्यात आली आहे. त्यानंतर अनिल देसाई यांच देखील नाव संजय राऊत यांनी ट्विट करून माहिती दिली आहे. त्यामुळे ठाकरे गटाचे 17 उमेदवारांची यादी जाहीर झाली आहे. परंतु ठाकरे गट 22 जागांवर उमेदवार देणार आहे.

त्या मतदारसंघातील उमेदवारांची नावे गुलदस्त्यात, ठाकरे गटाने वाढवला पाच जागांवरील सस्पेन्स
uddhav thackeray
Follow us on

नाशिक लोकसभा मतदारसंघातून उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाने राजाभाऊ वाजे यांना लोकसभेचं तिकीट दिलं आहे. राजाभाऊ वाजे सिन्नर विधानसभा मतदारसंघाचे माजी आमदार आहे. ठाकरेंनी मराठा चेहऱ्यावर विश्वास दाखवला आहे. संयमी शांत नेता आणि मराठा चेहरा अशी राजाभाऊ वाजे यांची ओळख आहे. 2014 च्या विधानसभा निवडणुकीत राजाभाऊ वाजे पहिल्यांदा आमदार झाले होते. एकीकडे ठाकरे गटाने १७ जागांवर उमेदवार जाहीर केले असताना पाच जागांवर उमेदवार दिले नाही. त्यामुळे त्या जागांवर सस्पेन्स वाढला आहे.

नाशिकमध्ये वाजे यांचे नाव

नाशिकमध्ये जिल्हाप्रमुख विजय करंजकर यांच नाव नाशिक लोकसभेसाठी चर्चेत होते. परंतु त्यांच्या नावाला अचानक डावललं गेले. सिन्नरचे माजी आमदार राजाभाऊ वाजे यांना नाशिक लोकसभेची उमेदवारी दिली आहे. माजी आमदार राजाभाऊ वाजे शिवसेनेचे एकनिष्ठ आहेत.

वैद्यकीय क्षेत्रात त्यांनी महामार्गावरील अपघात व अन्य रुग्णांसाठी गेली वीस वर्ष सातत्याने काम केले आहे. उमेदवारीसाठी इच्छुकांची ओढाताण सुरू असताना वाजे मात्र शांत होते. वरिष्ठ नेत्यांच्या मनात मात्र त्यांनी स्थान प्राप्त केले आहे. या कारणांमुळेच वाजे हे शिवसेनेत उमेदवारी मिळाली असल्याची चर्चा आहे.

हे सुद्धा वाचा

या जागांवर निर्णय नाही

ठाकरे गटाने 16 उमेदवारांची यादी जाहीर करण्यात आली आहे. त्यानंतर अनिल देसाई यांच देखील नाव संजय राऊत यांनी ट्विट करून माहिती दिली आहे. त्यामुळे ठाकरे गटाचे 17 उमेदवारांची यादी जाहीर झाली आहे. परंतु ठाकरे गट 22 जागांवर उमेदवार देणार आहे. आता रहिलेल्या जागांवर सस्पेन्स आहे. त्यात उत्तर मुंबईमधून विनोद घोसाळकर यांच नाव चर्चेत होते. कल्याणमधून उमेदवाराची चाचपणी सुरू आहे. जळगावमध्ये ललिता पाटील तर पालघरमध्ये भारती कामडीचे नाव घेतले जात आहे. हातकंणगलेमध्ये राजू शेट्टी यांनी महाविकास आघाडीत यावे, यावर चर्चा सुरु आहे.

यांची नावे जाहीर

बुलढाणा नरेंद्र खेडेकर, यवतमाळ- संजय देशमुख, मावळ – संजोग वाघेरे- पाटील, सांगली -चंद्रहार पाटील, हिंगोली- नागेश अष्टीकर, छत्रपती संभाजीनगर- चंद्रकांत खैरे, धाराशीव- ओमराजे निंबाळकर, शिर्डी- भाऊसाहेब वाघचौरे, नाशिक- राजाभाऊ वाझे, रायगड – अनंत गिते, रत्नागिरी- सिंधुदुर्ग – विनायक राऊत, ठाणे- राजन विचारे, मुंबई- ईशान्य – संजय दीना पाटील, मुंबई- दक्षिण- अरविंद सावंत, मुंबई- वायव्य अमोल किर्तिकर, मुंबई दक्षिण मध्य- अनिल देसाई, परभणी- संजय जाधव यांचा समावेश आहे.