ठाकरे मंत्रिमंडळात फेरबदलाची चिन्हं, अनिल देशमुखांचं गृहमंत्रिपद जाणार?

| Updated on: Mar 23, 2021 | 9:47 AM

राज्यातील मंत्रिमंडळात फेरबदल केले जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे. (government ministerial portfolios shuffle)

ठाकरे मंत्रिमंडळात फेरबदलाची चिन्हं, अनिल देशमुखांचं गृहमंत्रिपद जाणार?
शरद पवार, अनिल देशमुख, उद्धव ठाकरे
Follow us on

मुंबई : मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांनी टाकलेल्या लेटर बॉम्बनंतर राज्याच्या राजकारणात मोठी खळबळ उडाली. सिंह यांनी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर केलेल्या आरोपावरुन आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झडत आहे. भाजप नेत्यांनी देशमुखांच्या राजीनाम्याची मागणी लावून धरली आहे. तर शरद पवार यांनी दिल्लीत पत्रकार परिषद घेत अनिल देशमुख यांना क्लीन चिट दिली आहे. याच पार्श्वभूमीवर राज्यातील मंत्रिमंडळात फेरबदल केले जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे. इकोनॉमिक्स टाईम्सने याबाबतचे वृत्त दिले आहे.  (Maha Vikas aghadi government shuffle of ministerial portfolios Anil Deshmukh likely to be shifted)

अनिल देशमुखांकडे दुसरं खातं सोपवलं जाण्याची शक्यता

इकोनॉमिक्स टाईम्सने दिलेल्या वृत्तानुसार, गेल्या काही दिवसात गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर आरोप-प्रत्यारोप केले जात आहेत. याच पार्श्वभूमीवर राज्य सरकारकडून डॅमेज कंट्रोलसाठी मंत्रिमंडळात फेरबदल केले जाण्याची शक्यता आहे. गृहमंत्री अनिल देशमुख यांच्याकडील गृहमंत्रिपद काढून दुसरं खातं सोपवलं जाण्याची शक्यता आहे. देशमुखांवरील आरोपांमुळे हे फेरबदल होणार असल्याचे बोललं जात आहे. मात्र अद्याप याबद्दल कोणतीही माहिती समोर आलेली नाही.

परमबीर सिंह यांच्या आरोपांनंतर वेगवान घडामोडी

परमबीर सिंह यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र पाठवत अनिल देशमुख यांची तक्रार केली. अनिल देशमुख यांनी पोलीस सहायक यांना 100 कोटी रुपये वसूल करायला सांगितले, असा आरोप त्यांनी पत्रात केला. हा बाब उघड झाल्यानंतर महाराष्ट्राच्या राजकारणात एकच खळबळ उडाली. विरोधक महाविकास आघाडी सरकारवर तुटून पडले. या दरम्यानच्या काळात महाविकास आघाडी सरकारच्या निर्मितीत महत्त्वाचे दुवा ठरलेले शिवसेना नेते संजय राऊत यांनीदेखील सत्ताधाऱ्यांनी आत्मपरिक्षण करण्याची वेळ आलीय, असं म्हटलं. त्यामुळे महाविकास आघाडी सरकारवर दबाव वाढला. विरोधकांकडून अनिल देशमुख यांच्या राजीनाम्याची मागणी होऊ लागली. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी पत्रकार परिषद घेऊन देशमुखांचा राजीनामा मागितला.

राष्ट्रावादी काँग्रेस पक्षातील घडामोडी

एकीकडे विरोधकांकडून घणाघात सुरु असताना दुसरीकडे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातील घडामोडींना वेग आला होता. सुरुवातीला राष्ट्रवादीचा एक बडा नेता आता गृहमंत्री पदाची जबाबदारी स्वीकारणार, अशी चर्चा सुरु होती. तेवढ्यात राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी दिल्लीत पत्रकार परिषद घेऊन राजीनामा मागण्याचा अधिकार मुख्यमंत्र्यांना असल्याचं म्हणत राजीनाम्याच्या चेंडू मुख्यमंत्र्याकडे टाकला.

त्यानंतर राष्ट्रवादीचे नेते जयंत पाटील, अजित पवार दिल्लीला गेले. तिथे शरद पवार यांच्यासोबत त्यांची बैठक झाली. या बैठकीनंतर जयंत पाटील यांनी अनिल देशमुख यांच्या राजीनाम्याचा प्रश्नच येत नाही, असं म्हटलं. त्यानंतर शरद पवार यांनी आज पत्रकार परिषद घेऊन अनिल देशमुख यांची पाठराखण केली. (Maha Vikas aghadi government shuffle of ministerial portfolios Anil Deshmukh likely to be shifted)

संबंधित बातम्या :

VIDEO | पोलीस वसुली करतात का? हो, पण मग पैसा जातो कुठे? IPS संजय पांडेंनी आमीर खानला काय सांगितलं?

15 फेब्रुवारीला नागपूरहून मुंबईला आल्याची गृहमंत्र्यांची कबुली, पवारांनी केलेला होम क्वारंटाईनचा दावा