महाराष्ट्राच्या राजकारणात पडद्यामागे घडामोडी, मुख्यमंत्री दिल्ली दौऱ्यावर जाणार असतानाच मविआ नेते थेट राजभवनात दाखल

| Updated on: Feb 26, 2023 | 6:28 PM

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) दिल्ली दौऱ्यावर जाणार असल्याची बातमी समोर आलेली असतानाच महाराष्ट्राची राजधानी असलेल्या मुंबई शहरात घडामोडींना प्रचंड वेग आलाय.

महाराष्ट्राच्या राजकारणात पडद्यामागे घडामोडी, मुख्यमंत्री दिल्ली दौऱ्यावर जाणार असतानाच मविआ नेते थेट राजभवनात दाखल
Follow us on

मुंबई : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) दिल्ली दौऱ्यावर जाणार असल्याची बातमी समोर आलेली असतानाच महाराष्ट्राची राजधानी असलेल्या मुंबई शहरात घडामोडींना प्रचंड वेग आलाय. राज्यात उद्यापासून अर्थसंकल्पीय अधिवेशनाला सुरुवात होणार आहे. तर दुसरीकडे एकनाथ शिंदे आज मंत्रिमंडळ बैठकीनंतर दिल्ली दौऱ्यावर जाणार असल्याची माहिती सूत्रांकडून मिळालीय. या घडामोडी घडत असताना महाविकास आघाडीच्या गोटातही महत्त्वाच्या घडामोडी घडत आहेत. कारण महाविकास आघाडीच्या शिष्टमंडळाने आज थेट राजभवन गाठत महाराष्ट्राचे नवनिर्नाचित राज्यपाल रमेश बैस यांची भेट घेतलीय. त्यामुळे वेगवेगळ्या चर्चांना उधाण आलंय.

राज्य विधी मंडळाचं अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरु होण्याआधी मुंबईत घडामोडींना वेग आलाय. अर्थसंकल्पीय अधिवेशनाआधी महाविकास आघाडीच्या नेत्यांची अतिशय महत्त्वाची बैठक पार पाडलीय. या बैठकीत अतिशय महत्त्वाच्या मुद्द्यांवर चर्चा झाल्याची माहिती मिळाली आहे. या अधिवेशनात सर्वसामान्य, गरीब जनता आणि शेतकऱ्यांचे मुद्दे अधिवेशनात मांडण्यााबाबत चर्चा झाल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे. याशिवाय राज्य सरकारला कोणकोणत्या मुद्द्यांवर घेरता येईल, याबाबतही चर्चा झाल्याची माहिती मिळत आहे.

या बैठक सत्राची बातमी ताजी असताना मुंबईत आणखी महत्त्वाची घडामोड घडली. राष्ट्रवादी मविआच्या शिष्टमंडळाने महाराष्ट्राचे नवनिर्वाचित राज्यपाल रमेश बैस यांची भेट घेतलीय. त्यामुळे अनेकांना आश्चर्याचा धक्का बसलाय. राष्ट्रवादीच्या शिष्टमंडळाने अचानक राज्यपालांची भेट घेतल्याने या भेटीमागे नेमकं कारण काय असेल? अशी चर्चा आता राजकीय वर्तुळात सुरुय. पण या भेटीनंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी प्रसारमाध्यमांना प्रतिक्रिया दिली.

हे सुद्धा वाचा

अजित पवार यांची प्रतिक्रिया

“विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे, आमदार जितेंद्र आव्हाड, अनिल परब, धनंजय मुंडे, छगन भुजबळ, सुनील प्रभू असे आम्ही अनेकजण भेटायला आलो होतो. भेटीमागील कारण एवढंच होतं की, त्यांच्या शपथविधी कार्यक्रमाचं आम्हाला निमंत्रण होतं पण त्यावेळी आम्ही मुंबईत नव्हतो. त्यामुळे त्यांना भेटता आलं नव्हतं. म्हणूनच आम्ही भेटायला आलो. अतिशय चांगली भेट झाली. सर्वांनी चर्चा केली”, अशी प्रतिक्रिया अजित पवार यांनी दिली.

“रमेश बैस यांनी अनेक वर्ष रायपूरमधून खासदारकी केली. याशिवाय ते त्रिपुरामध्ये राज्यपाल होते. आता महाराष्ट्रात आले आहेत. आमची आजची चर्चा अतिशय समाधानी झाली. आम्ही त्यांना सांगितलं की आमचे काही इशू असलं तर तुम्हाला भेटू. त्यावर त्यांनी सांगितलं सत्ताधारी आणि विरोधक असले तरी दोघांनी मिळून काम करायचं असतं. आम्ही त्यांच्या वाटचालीकरता शुभेच्छा दिल्या आहेत. त्यांचं उद्या अभिभाषण होणार आहे”, असं अजित पवार यांनी सांगितलं.