भाजपमध्ये सर्जिकल स्ट्राईक? नितीन गडकरी म्हणाले, भाजपाचं पीक जोमात, पण नासक्या मालांवर…

| Updated on: Nov 10, 2024 | 9:22 AM

Nitin Gadkari Big Statement: भाजपचे वरिष्ठ नेते आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या एका वक्तव्याने मोठी खळबळ उडाली आहे. सध्या भाजपचं पीक जोमात आलं आहे, हे त्यांनी ठासून सांगितलं. तर या विधानसभा निवडणुकीत भाजपासह महायुती जोरदार कामगिरी बजावणार असल्याचा दावा त्यांनी केला. त्याचवेळी त्यांनी पक्षातंर्गत सर्जिकल स्ट्राईकचा बॉम्ब टाकला...

भाजपमध्ये सर्जिकल स्ट्राईक? नितीन गडकरी म्हणाले, भाजपाचं पीक जोमात, पण नासक्या मालांवर…
Follow us on

भाजपचे वरिष्ठे नेते आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या एका वक्तव्याने एकच खळबळ उडाली आहे. त्यांनी सध्याचे राजकारण, भाजपमधील वाढते इनकमिंग आणि विधानसभा निवडणुकीवर स्पष्ट मतं मांडली. गडकरी हे स्पष्ट वक्ते म्हणून ओळखल्या जातात. बेधडक वक्तव्यामुळे पण जनता त्यांच्यावर प्रेम करते. भाजपामध्ये सध्या राजकीय जोमात आहे. अनेक जण पक्षात येत आहेत. पक्षात गोतावळा वाढत आहे, असे त्यांनी सांगितले. पण त्याचवेळी त्यांनी एक महत्त्वाचं विधान केलं आहे. त्यांनी पक्षातंर्गत सर्जिकल स्ट्राईक करण्याचा बॉम्ब टाकला आहे. त्यांच्या वक्तव्याने आयाराम-गयाराम नेत्यांचे धाबे दणाणले आहे, एवढे निश्चित…

गडकरी यांचा वऱ्हाडी ठेचा

“भाजपा हा कार्यकर्त्यांचा पक्ष आहे. नवीन कार्यकर्ते, नेते विविध कारणांनी पक्षात येत आहेत. त्यांना प्रशिक्षण देणे, विचाराधारा शिकवणे आणि त्यांना कार्यकर्ता म्हणून तयार करणे ही आमची जवाबदारी आहे. आमचा प्रयत्न सुरू आहे. हजारो कार्यकर्ते कष्ट घेत आहेत. पण एका कार्यकर्त्याचे चुकीचे वर्तन, चुकीची माहिती सर्व प्रयत्नांवर पाणी फेरते.” असे स्पष्ट मत गडकरी यांनी मांडले. एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत त्यांनी अनेक मुद्दांवर बेधडक विचार मांडले.

हे सुद्धा वाचा

नासक्या मालावर….

आपल्या देशात मतभेद ही काही समस्या नाही. पण विचारांचा, धोरणांचा अभाव ही मोठी समस्या आहे. सोयीच्या राजकारणाचे धोरण महत्त्वपूर्ण नाही, तर विचारधारेशी सुसंगत राजनीती महत्त्वाची असल्याचे गडकरी म्हणाले. यावेळी त्यांनी नव्याने दाखल होत असलेल्या विविध विचारधारेतील कार्यकर्ते, नेत्यांना एक गर्भित इशारा पण दिला.

भाजपामध्ये इतर पक्षाचे नेते आणि कार्यकर्ते विविध कारणांमुळे दाखल होत आहे. जस जसे पीक जोमात येते. तस तसा रोगाचा प्रादुर्भाव वाढतो. चांगल्या धान्याला कीड लागते. पीक वाचावं यासाठी मग रोगावर कीटकनाशक मारावं लागतं, असा इशारा त्यांनी दिला. गडकरी यांच्या वक्तव्याने आयाराम-गयाराम नेत्यांचे धाबे दणाणले आहे. इतर पक्षात अनेक वर्षे सत्तेच्या लादीवर बसलेली काही नेते भाजपमध्ये सुगीचे दिवस शोधत आहेत. ज्यांना भाजपाच्या विचारधारेशी घेणे-देणे नाही, सत्तेशी ज्यांची जवळीकता आहे. त्यांच्यावर आता सर्जिकल स्ट्राईक होणार का? यावर आता खल सुरू झाला आहे.