मुंबई : महाराष्ट्रात कोरोनाचा पहिला बळी गेला आहे. दुबईहून मुंबईत आलेल्या 64 वर्षीय वृद्धाचा मृत्यू (Maharashtra corona first death) झाला आहे. पीडित वृद्धावर मुंबईतील कस्तुरबा रुग्णालयात उपचार सुरु होते. उपचारादरम्यान त्यांनी अखेरचा श्वास घेतला. (Maharashtra corona first death)
मृत्यू झालेला वृद्ध हा व्यावसायिक होता. व्यापारानिमित्त ते दुबईला गेले होते. दुबईवरुन मुंबईत परतल्यानंतर ते कोरोना पॉझिटिव्ह असल्याचं समोर आलं होतं. या रुग्णावर आधी खासगी रुग्णालयात उपचार सुरु होते.
मुंबईतील करोनाबाधित मयत व्यक्ती हे 6 मार्च रोजी दुबईहून आले होते. 7 मार्च रोजी त्यांना अस्वस्थ वाटू लागल्याने त्यांना माहीम येथील एका मोठ्या हॉस्पिटलमध्ये नेण्यात आलं. तिथे त्यांची करोना टेस्ट पॉझिटिव्ह आल्याने तात्काळ 7 मार्च रोजी त्यांना मुंबई पालिकेच्या कस्तुरबा हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं होतं. यानंतर उपचार सुरू असताना या व्यक्तीचा आज मृत्यू झाला.
Maharashtra: A 64-year-old COVID-19 patient passes away at Mumbai’s Kasturba hospital pic.twitter.com/E1X8Dj78n0
— ANI (@ANI) March 17, 2020
दरम्यान या रुग्णाच्या संपर्कात 9 जण आले होते अशीही माहिती समोर आली आहे. या सर्व 9 जणांना अलिप्त ठेवण्यात आलं आहे.
राज्यातील बाधितांचा आकडा 39 वर
राज्यात कोरोनाबाधितांच्या (Corona Patients Increased) संख्येत दिवसेंदिवस वाढ होतं आहे. नवी मुंबईत आणखी एकाला कोरोनाची लागण झाल्याची माहिती 16 मार्चला समोर आली. आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी ट्विट करत याबाबतची माहिती दिली. त्यामुळे राज्यात कोरोना बाधितांची संख्या 39 वर गेली आहे. सुदैवाची बाब म्हणजे काल रात्रीपासून आज सकाळपर्यंत नवा रुग्ण आढळलेला नाही.
देशात आतापर्यंत तिघांचा मृत्यू
दरम्यान, महाराष्ट्रात कोरोनामुळे पहिला मृत्यू झाला असला तरी देशातील मृतांची संख्या 3 वर पोहोचली आहे. यापूर्वी कर्नाटक आणि दिल्लीत प्रत्येकी एकाचा मृत्यू झाला होता.
कर्नाटकमधील कुलबर्गी येथे 11 मार्चला एका 76 वर्षीय वृद्धाचा मृत्यू झाला होता. तो देशातील कोरोनाचा पहिला मृत्यू होता. त्यानंतर 13 मार्चला दिल्लीत 69 वर्षीय महिलेचा कोरोनामुळे मृत्यू झाल्याची माहिती समोर आली होती. परदेशातून परतलेल्या मुलामुळे आईला संसर्ग झाला होता. मग 17 मार्चला मुंबईत 64 वर्षीय वृद्धाचा मृत्यू झाल्याचं समोर आलं.
आरोग्य मंत्री राजेश टोपे
कोरोना संसर्ग झालेल्या रुग्णांच्या संख्येत आज कोणतीही वाढ झालेली नाही. सर्वांची तब्येत स्थिर आहे. आज कॅबिनेट बैठक देखील आहे. त्यातही कोरोनाच्या संबंधात चर्चा होईल. आपण अनेक खबरादारीचे उपाय केले आहेत. काल शाळा, कॉलेज बंद करण्यासोबतच परीक्षा पुढे ढकलण्याचाही निर्णय घेण्यात आला आहे.
जे काही निर्णय आपण घेतले आहेत त्याची कठोर अंमलबजावणी करण्याची गरज आहे, कॉर्पोरेट सेक्टरबरोबर महत्वाची बैठक घेऊन त्यांनी कमीत कमी स्टाफ बोलावून काम करू शकता का? सी एस आर फंडातून आम्हला काही मदत भेटेल का? मग ती कुठल्याही प्रकारची मदत असो त्याचं स्वागत आहे, कुठल्याही परिस्थितीत गर्दी कमी करणे महत्वाचे आहे, सद्याच्या परिस्थितीमध्ये माझं सर्वांना आवाहन आहे की गर्दी करू नका , शक्य होईल तेवढी काळजी घ्या, असं आरोग्य मंत्री राजेश टोपे म्हणाले.
पुण्यात व्यापार बंद
कोरोनाला रोखण्यासाठी पुण्यातील घाऊक आणि किरकोळ व्यापार आजपासून तीन दिवस बंद (Pune trade market and shops close) राहणार आहे. पुण्यातील व्यापारी महासंघाने हा निर्णय घेतला आहे. किराणा, दूध, भाजीपाला वगळून, घाऊक आणि रिटेल व्यापाऱ्यांची दुकाने बंद ठेवण्यात येतील. महासंघाचे उपाध्यक्ष सूर्यकांत पाठक यांनी ही माहिती, दिली. (Pune trade market and shops close)
कोरोनाचे कुठे किती रुग्ण?
महाराष्ट्रात कुठे आणि कधी कोरोनाचे रुग्ण आढळले?
कोरोनामुळे आतापर्यंत कुठे किती मृत्यू?