महाराष्ट्रातील मतदान प्रक्रिया संपताच निवडणूक आयोगाची पत्रकार परिषद; म्हणाले, ‘तोपर्यंत’ आचारसंहिता लागू असणार

| Updated on: May 22, 2024 | 7:27 PM

Joint Secretary Kiran Kulkarni on Election process Lokasabha Election 2024 : लोकसभा निवडणूक देशभरात पार पडते आहे. महाराष्ट्रातील मतदान प्रक्रिया पार पडली आहे. यानंतर राज्य निवडणूक आयोगाकडून पत्रकार परिषद घेण्यात आली. नेमकं काय म्हणण्यात आलं? वाचा सविस्तर...

महाराष्ट्रातील मतदान प्रक्रिया संपताच निवडणूक आयोगाची पत्रकार परिषद; म्हणाले, तोपर्यंत आचारसंहिता लागू असणार
election
Follow us on

देशात सार्वत्रित लोकसभा निवडणूक होत आहे. पाच टप्प्यातील मतदान प्रक्रिया पूर्ण झाली आहे. अजून दोन टप्प्यातील मतदान होणं बाकी आहे. मात्र महाराष्ट्रातील निवडणूक प्रक्रिया पूर्ण झाली आहे. महाराष्ट्रातील मतदान प्रक्रिया पूर्ण होताच राज्य निवडणूक आयोगाकडून पत्रकार परिषद घेण्यात आली आहे. सहसचिव तसंच महाराष्ट्राचे अतिरिक्त मुख्य निवडणूक अधिकारी किरण कुलकर्णी यांनी पत्रकार परिषद घेतली. या पत्रकार परिषदेत त्यांनी विविध मुद्द्यांवर भाष्य केलं. महाराष्ट्रात राबवण्यात आलेल्या निवडणूक प्रक्रियेवर त्यांनी भाष्य केलं आहे.

महाराष्ट्रातील मतदान प्रक्रिया

महाराष्ट्र राज्यातील मतदान प्रक्रियेवर त्यांनी भाष्य केलं आहे. पाचव्या टप्प्यातील मतदान प्रक्रिया संपन्न झाली आहे. 13 लोकसभासंघात मुंबई बद्दल जर बोलायचं म्हटलं तर 6 लोकसभा मतदार संघात 12 हजार पोलिंग बूथ आहेत. या पोलिंग बुथवर व्यवस्थित प्रक्रिया पार पडली आहे. फक्त 10 ते 12 ठिकाणी स्लो प्रक्रिया होत्या. ईव्हीएम किंवा इतर अडचणी दूर केल्या आहेत . रिझर्व स्टॉक मधील ईव्हीएम उपलब्ध केल्या आहेत. त्यावेळी लवकरच अर्धा तासाच्या आधी राजकीय पक्षांनी केलेल्या आरोपावर मी बोलणार नाही, असं किरण कुलकर्णी यांनी म्हटलं आहे.

यंदाच्या निवडणुकीत अनेक मतदारांची मतदार यादी नावंच नसल्याचं समोर आलं आहे. यावरही किरण कुलकर्णी यांनी भाष्य केलं आहे. मतदानाच्या दिवशी आपलं नाव मतदार यादीत आहे की नाही हे तपासणं योग्य नाही. सुजाण नागरिकांना हे लक्षात आलं पाहिजे. आम्ही 21 एप्रिल रोजी जाहिरात दिल्या होत्या. नाव तपासून घेण्यासंदर्भात.आता त्यांनी ऑनलाईन नोंदणी करून घ्यावी. ते विधानसभेला कामाला येईल, असं त्यांनी म्हटलं आहे.

आचारसंहितेवर काय म्हणाले?

महाराष्ट्रातील निवडणूक प्रक्रिया पूर्ण झाली आहे. मात्र देशातील दोन टप्प्यातील महदान होणं अद्याप बाकी आहे. या पार्श्वभूमी आचारसंहितेवर किरण कुलकर्णी यांनी प्रतिक्रिया दिली. नवीन लोकसभा स्थपण होई पर्यंत ही आचारसंहिता कायम राहणार आहे. मुख्य सचिव यांच्यामार्फत काही प्रस्ताव आमच्याकडे आले होते. ते आम्ही केंद्रीय निवडणूक आयोगाला पाठवले ते पावसाळ्याआधी काही महत्त्वाची कामे करण्यासंबंधी त्यावर निवडणूक आयोगाने आचारसंहिता शिथिल करण्यासंबंधी परवानगी दिली आहे. मात्र पूर्ण आचारसंहिता शिथिल होणार नाही, असंही किरण कुलकर्णी यांनी म्हटलं आहे.