नाशिक: कोरोनाची दुसरी लस घेतल्यानंतर अरविंद सोनार यांच्या हाताला नाणी, चमचे चिकटत असल्याचं प्रकरण समोर आलं होतं. अरविंद सोनार यांनी या प्रकरणी कोणत्याही प्रकारच्या तपासणीला सामोरं जाण्यास तयार असल्याचं देखील म्हटलं होतं. सोनार यांच्या हाताला लोखंडी आणि स्टीलच्या वस्तू चिटकत असल्याचा वरील व्हिडिओ व्हायरल होत आहे. महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीनं अरविंद सोनार यांच्या शरीरावर नाणी, चमचे आणि स्टील वस्तू का चिकटत आहेत यामागील कारण सांगितलं आहे.
नाणी शरीरावर चिकटणे हा 0 प्रयोग कोणीही माणूस करून पाहू शकतो. नाणे, उलथन जरासे ओले करून घ्या आणि पोट, दंड, पाठ अशा सपाट भागावर हलकेसे दाबून ठेवा. निर्वात पोकळी निर्माण होऊन जरावेळ अशी वस्तू चिकटून राहते. पाणी सुकले की मात्र पडते, असं महाराष्ट्र अंनिसकडून सांगण्यात आलं आहे.
डॉ. हमीद दाभोळकर यांची फेसबूक पोस्ट
अरविंद सोनार यांच्या घरी नाशिक मनपाच्या आरोग्य पथकाने येऊन चौकशी केली आहे. नोडल अधिकारी नवीन बाजी यांच्या उपस्थितीत ही तपासणी करण्यात आली. लस घेतल्या नंतर त्यांच्या अंगाला नाणी तसेच स्टीलच्या वस्तू चिटकत असल्याचा दावा सोनार यांनी केला. अगोदर अस काही होत नव्हतं,मात्र लस घेतल्यानंतर हे घडलंय, अस त्यांच्या घरच्या लोकांचं ही मत आहे.
आरोग्य पथक सविस्तर अहवाल वरिष्ठ लेव्हलला सादर करणार आहे.त्यामुळे कोणी ही लसी संदर्भात अफवा पसरवू नये,वैद्यकीय कारण लवकरच समोर येईल, असं सागण्यात आलं आहे.
अरविंद सोनार यांनी 8 दिवसांपूर्वी लस घेतली होती. सोनार यांच्या मुलाने युट्युबवर दिल्लीच्या एका माणसाचा नाणी चिकटतात, असा एक व्हिडिओ बघितला. जयंत सोनार यानं कोरोना लसीचं दोन लस घेतलेल्या वडिलांच्या अंगाला स्टील लोखंड,नाणं चिकटवून बघितलं तर अगदी सहज चिटकल. रवींद्र सोनार यांनी सुरुवातीला घामामुळे असा प्रकार होत असावा म्हणून अंघोळ करुन पाहिलं. अंघोळ केल्यानंतर पुन्हा एकदा नाणी आणि चमचे शरीरावर चिकटतात की नाही हे तपासलं. यावेळी पुन्हा एकदा नाणी चिकटली.
VIDEO : अजब-गजब, नाशिकमध्ये कोरोना लस घेतल्यानंतर दंडाला लोखंड, स्टील चिटकलं
PHOTO : सोनारांच्या अंगाला लोखंड, कॉईन चिटकलं, नाशिकमध्ये लस घेतल्यानंतर अजब प्रकार उघडकीस
(Maharashtra Anis revealed the truth behind claim of Arvind Sonar Nashik that coin attaching his body )