विधानसभा निवडणुकीत कोणत्या पक्षाला किती मतं मिळाली?; संपूर्ण आकडेवारी…

| Updated on: Nov 25, 2024 | 1:25 PM

BJP made two records in Maharashtra assembly election : महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीचा निकाल लागला आहे. यात भाजपने 132 जागा जिंकल्या आहेत. या निवजणुकीत भाजपने रेकॉर्ड ब्रेक कामगिरी केली आहे. यंदाच्या निवडणुकीत भाजपला किती मतं मिळाली? वाचा सविस्तर...

विधानसभा निवडणुकीत कोणत्या पक्षाला किती मतं मिळाली?; संपूर्ण आकडेवारी...
महाराष्ट्र विधानसभा निवडणूक
Follow us on

महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीचा निकाल लागलेला आहे. महायुतीला बहुमत मिळालेलं आहे. तर 233 जागांवर महायुतीने यश मिळवलं आहे. तर 132 जागा मिळवत भाजप सर्वात मोठा पक्ष ठरला आहे. यंदाच्या निवडणुकीत भाजपने इतिहास रचला आहे. 26. 77 % मतं भाजपने मिळवली आहेत. 1 कोटी 72 लाख 93 हजार 650 मतं मिळवत भाजपने 132 जागा जिंकल्या आहेत. 100 जागांवर जास्तीत जास्त मतं मिळवत भाजपने रेकॉर्ड केला आहे. भाजपने 2014 ला 122 जागा जिंकल्या होत्या. 2019 ला 105 जागा जिंकल्या होत्या. आता भाजपने स्वपक्षाचा रेकॉर्ड मोडला आहे.

काँग्रेसला किती टक्के मतं?

काँग्रेसचा विचार केला तर काँग्रेसने 101 जागांवर निवडणूक लढली. यापैकी 16 जागांवर काँग्रेस विजयी झाली. यंदाच्या निवडणुकीत 12. 42 टक्के मतं मिळाली. तर मतांची आकडेवारी पाहिली तर राज्यात काँग्रेसला दुसऱ्या क्रमांकावर मतं मिळाली. 80 लाख 20 हजार 921 मतं काँग्रेसला मिळाली.

शिंदेगट आणि ठाकरे गटाला किती मतं?

शिवसेना शिंदे गटाने 81 जागांवर निवडणूक लढवली. त्यापैकी 57 जागा शिंदेगटाने जिंकल्या 12. 38 टक्के मतं शिवसेना शिंदे गटाला मिळाली. 79 लाख 96 हजार 930 मतं शिंदे गटाला मिळाली आहेत. शिवसेना उद्धव ठाकरे गटाला 20 जागांवर विजय मिळवता आला आहे. 9. 96 टक्के मतं शिवसेना ठाकरे गटाला मिळाली आहेत. 64 लाख 33 हजार 013 इतकी एकूण मतं शिवसेना ठाकरे गटाला मिळाली आहेत.

अजितदाद गटापेक्षा शरद पवार पक्षाला अधिक मतं

राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाला अजित पवार गटापेक्षा जास्त मतं मिळाली. पण उमेदवार कमी निवडून आले आहेत. शरद पवार गटाने 86 जागांवर निवडणूक लढली आहे. 11. 28 टक्के मतं शरद पवार गटाला मिळाली आहेत. 72 लाख 87 हजार 797 इतकी मतं शरद पवार गटाला विधानसभा निवडणुकीत मिळाली आहेत. राष्ट्रवादी अजित पवार गटाने 59 जागा लढल्या यापैकी 41 जागांवर अजित पवार गटाचा विजय झाला. 9. 01 टक्के मतं अजित पवार गटाला मिळाली आहेत. 58 लाख 16 हजार 566 इतकी एकूण मतं अजित पवार गटाला मिळाली आहेत.

निवडणुकीच्या रिंगणाचत उतरेलल्या उमेदवारांपैसरी एकही व्यक्ती योग्य वाटत नसेल. तर नोटा हा एक पर्याय मतदारांसमोर असतो. नोटाला यावेळी 4 लाख 61 हजार 886 मतं मिळाली आहेत. याची टक्केवारी 0.72 आहे. यंदा विधानसभा निवडणुकीत 66. 05 टक्के मतदान झालं आहे. तर 2019 ला 61. 1 टक्के मतदान झालं होतं.