Big News! मुंबईतील ललित हॉटेल बॉम्बने उडवण्याची धमकी, फोनवरून इशारा

| Updated on: Aug 23, 2022 | 9:58 AM

मुंबईतील ललित हॉटेल बॉम्बने उडवण्याची धमकी आलेली आहे. फोनवरून हा इशारा देण्यात आलेला आहे. काल संध्याकाळी हा धमकीचा फोन आला होता.

Big News! मुंबईतील ललित हॉटेल बॉम्बने उडवण्याची धमकी, फोनवरून इशारा
Big breaking
Image Credit source: tv9
Follow us on

मुंबई : मागच्या काही दिवसांपासून मुंबई दहशतवाद्यांच्या टार्गेटवर असल्याचं दिसतंय. मुंबईतील ललित हॉटेल (The lalit Hotel) बॉम्बने उडवण्याची धमकी आलेली आहे. फोनवरून हा इशारा देण्यात आलेला आहे. काल संध्याकाळी हा धमकीचा फोन आला होता. कालही अश्याच एका कटाचा पर्दाफाश झाल्यानंतर आता हा धमकीचा फोन आलाय. भारतावर मोठा आतंकवादी हल्ला (Terrorist Attack) होणार होता. पण त्याआधीच त्याचा पर्दाफाश झालाय. रशियाने एका दहशतवाद्याला ताब्यात घेतलं त्याने ही कबुली दिली आहे. भारतावर एक मोठा आत्मघातकी हल्ला होणार होता. यात एका रशियाच्या फेडरल सिक्युरिटी सर्व्हिसने यातची माहिती दिली आहे. रशियाच्या अधिकाऱ्यांनी इस्लामिक स्टेट या दहशतवादी संघटनेचा सदस्य ताब्यात घेतला. त्याने ही कबुली दिली आहे.

ललित हॉटेल बॉम्बने उडवण्याची धमकी!

मुंबईतील ललित हॉटेल बॉम्बने उडवण्याची धमकी आलेली आहे. फोनवरून हा इशारा देण्यात आलेला आहे. काल संध्याकाळी हा धमकीचा फोन आला होता. कालही अश्याच एका कटाचा पर्दाफाश झाल्यानंतर आता हा धमकीचा फोन आलाय.

मुंबईवर 26/11 सारखा हल्ला करुन मुंबई शहर उडवून देण्यारे मेसेज मुंबई पोलिसांना आल्यानंतर मोठी खळबळ उडाली. असे 26 मेसेज पोलिसांना आले असले तरी मुंबई पोलिसांनीही खबरदारीचा इशारा म्हणून सुरक्षेत प्रचंड वाढ करून या मेसेज प्रकरणाचा कसून तपास सुरु करण्यात आला आहे. शुक्रवारी रात्री मुंबई पोलिसांच्या वाहतूक विभागात मुबारक हो मुंबई में हमला होने वाला है, असे धमकीचे 26 मेसेज मुंबई पोलिसांना आले आहेत. मुंबईला उडवण्याची तयारी सुरू आहे 26/11 सारखा किंवा त्यापेक्षा मोठा हल्ला करण्याकरिता काही हिंदुस्तानी लोक माझ्यासोबत असल्याचे मेसेजमध्ये म्हटले आहे. ज्या नंबरवरून हे मेसेज आले आहेत तो नंबर पाकिस्तानचा असल्याने पोलीस अधिक सतर्क झाले आहेत. या प्रकरणी विरारच्या भाटपाडामधू मोहम्मद असेच या 22 वर्षीय तरुणाला चौकशीसाठी ताब्यात घेण्यात आले आहे. त्याची कसून चौकशी सुरू करण्यात आली असून हा मेसेज कुठून आणि कसा आला त्याचीही इतर यंत्रणामार्फत चौकशी सुरू करण्यात आली आहे.

हे सुद्धा वाचा

हरिहरेश्वरमध्ये काही दिवसांआधी एक संशयित बोट आढळली होती. यात AK 47 बंदुका आणि काही काडतूसं आढळून आली होती. एकूण तीन बंदुकांनी भरलेली बोट समोर आल्यामुळे एकच खळबळ उडालेली. रायगड जिल्ह्यात हरिहरेश्वरमध्ये संशयास्पद बोट सकाळी आढळून आली होती. त्यानंतर रायगड जिल्हा प्रशासन आणि पोलीस घटनास्थळी दाखल झालं. त्यांनी पाहणी केला. या बोटीत शस्त्रास्त्र सापडल्याने अवघा देश हादरला होता. घातपाताचा संशय व्यक्त करण्यात आला. त्यानंतर मुंबई पोलिसांना धमकीचा फोन आणि आता तर खुद्द दहशतवाद्याने हल्ल्याची कबुली दिली आहे.