राज्यात विधानसभा निवडणुकीचं वारं वाहतं आहे. ठिकठिकाणी नेत्यांच्या जाहीर सभा होत आहेत. नेत्यांनी जाहीर सभांमध्ये केलेली विधानं गाजत आहेत. असं असतानाच काँग्रेसचे वरिष्ठ नेते आणि विधानसभेचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी केलेल्या भाषणावर भाजपने आक्षेप घेतला आहे. विजय वडेट्टीवार यांनी भाषणादरम्यान शिवीगाळ केल्याचा आरोप भाजपकडून करण्यात आला आहे. विजय वडेट्टीवार यांच्या भाषणाचा व्हीडिओ भाजपने ट्विट केला आहे. विजय वडेट्टीवार यांच्या विधानावरून काँग्रेसला घेरलं आहे. आता जनताच काँग्रेसला धडा शिकवेल, असं भाजपकडून म्हणण्यात आलं आहे.
मतदारांशी बोलताना विजय वडेट्टीवार यांनी शिवीगाळ केलीय. हरामखोर, भडवे, नालायक म्हणत वडेट्टीवार यांची मतदारांना जाहीर शिवीगाळ केला. विजय वडेट्टीवार यांचा वादग्रस्त व्हीडिओ भाजपकडून ट्विट करण्यात आला आहे. काँग्रेसचा हात, मतदारांचा घात… असं म्हणत भाजपने विजय वडेट्टीवार यांच्यावर टीका केली आहे. भाजपनं आपल्या एक्स अकाऊंटवरून हा व्हीडिओ शेअर करत टीकास्त्र डागलं आहे.
काँग्रेसचा हात, मतदारांचा घात… कॉंग्रेस नेते, विजय वडेट्टीवार मतदारांना हरा*खोर म्हणत आहेत. 20 तारखेनंतर तुला पाहून घेईन. तुमचे नाव लिहून ठेवले आहेत. अशी धमकीच त्यांनी मतदारांना दिली आहे.
लोकशाहीत मतदार हा राजा असतो मात्र लोकशाही, संविधान, अभिव्यक्ती स्वातंत्र्य याचा काँग्रेसला सुरुवातीपासूनच तिटकारा आहे.
ज्या काँग्रेसने संविधानाची पायमल्ली करत देशावर आणीबाणी लादली असंख्य सामान्य लोकांना तुरूंगात डांबून ठेवले ती काँग्रेस पुन्हा मतदारांना धमकवण्याचा प्रयत्न करत आहे.
महाराष्ट्राची जनता मतदानातून काँग्रेसची ही मस्ती नक्कीच उतरवणार…
काँग्रेसचा हात, मतदारांचा घात
कॉंग्रेस नेते, @VijayWadettiwar मतदारांना हरा*खोर म्हणत आहे, 20 तारखेनंतर तुला पाहून घेइन, तुमचे नाव लिहून ठेवले आहेत. अशी धमकीच त्यांनी मतदारांना दिली आहे.
लोकशाहीत मतदार हा राजा असतो मात्र लोकशाही, संविधान, अभिव्यक्ती स्वातंत्र्य याचा काँग्रेसला… pic.twitter.com/pfwi8apMi8
— भाजपा महाराष्ट्र (@BJP4Maharashtra) November 6, 2024
लोक म्हणत आहेत, की 20 तारीख येऊदेत मग मी दाखवतो. मी माझ्या आयुष्यात कधी धमकी दिली नाही. तुमच्या तोंडात किडे पडतील हरामखोरांनो… एवढं खोटं बोलू नये. लहान कार्यकर्ता असला तरी मी त्याच्याशी सन्मानाने वागतो, असं विजय वडेट्टीवार या व्हीडिओमध्ये बोलताना दिसत आहेत.