LIVE : … सचिन वाझेंच्या अकटेनंतर मुंबई पोलिसातील बड्या अधिकाऱ्यांची एनआयएकडून चौकशी होण्याची शक्यता

| Updated on: Mar 24, 2021 | 6:52 AM

महाराष्ट्रासह देशभरातील महत्त्वाच्या बातम्यांचे LIVE अपडेट्स, ब्रेकिंग न्यूज, मनोरंजन विश्वातील घडामोडी, मुंबई-पुण्यातील बातम्या, हवामानाचे अपडेटसह सर्व माहिती एकाच ठिकाणी

LIVE : ... सचिन वाझेंच्या अकटेनंतर मुंबई पोलिसातील बड्या अधिकाऱ्यांची एनआयएकडून चौकशी होण्याची शक्यता
ब्रेकिंग न्यूज
Follow us on

महाराष्ट्रासह देशभरातील महत्त्वाच्या बातम्यांचे LIVE अपडेट्स, ब्रेकिंग न्यूज, मनोरंजन विश्वातील घडामोडी, मुंबई-पुण्यातील बातम्या, हवामानाचे अपडेटसह सर्व माहिती एकाच ठिकाणी

LIVE NEWS & UPDATES

The liveblog has ended.
  • 14 Mar 2021 08:38 AM (IST)

    NIA मुंबई पोलिसांतील बड्या अधिकाऱ्यांची चौकशी करणार?

    – NIA च्या सुत्रांची माहिती
    – स्फोटकांनी भरलेली गाडी प्रकरण
    – कटात ५-७ जणांचा समावेश असण्याची शक्यता…
    – मुंबई पोलिस दलातील आणखी काही बड्या अधिका-यांची होवू शकते चौकशी…
    – मुंबई पोलिस आयुक्तालयात आॅन ड्युटी सचिन वाझे यांच्या अटकेनंतर खळबळ…
    – ठाणे येथून आणखी ३ जणांना एनआयए ताब्यात घेण्याची शक्यता…
    – इनोव्हा गाडीतून जाणारे दोन्ही चालक आणि एका व्यावसायीकाला ताब्यात घेण्याची शक्यता…

  • 14 Mar 2021 08:17 AM (IST)

    कोरोना प्रतिबंधक लशीचे हिशोब द्या, आरोग्य खात्याची पुणे महापालिकेला विचारणा

    -कोरोना प्रतिबंधक लशीचे हिशोब द्या, आरोग्य खात्याची पुणे महापालिकेला विचारणा,

    – कोणाला किती डोस दिले, त्याचा हिशेब सार्वजनिक आरोग्य खात्याने महापालिकेला मागितला

    – तसेच प्रत्येक केंद्रावर किमान पाच दिवसांच्या डोसचा साठा शिल्लक राहील, या प्रमाणात लशीचे वितरण करा, आरोग्य खात्याचा सल्ला,

    – कोरोना प्रतिबंधक लस शिल्लक नाही. राज्याकडून लशीचा पुरवठा झालेला नाही. आता डोस द्यायचे कसे,’ असा गंभीर प्रश्न पुण्यात निर्माण झाला होता,

    – पुण्यात लशीची मागणी वाढत आहे, पण मागणीप्रमाणे पुरवठा होत नाही असे आरोप होत आहेत,

    – पिंपरी-चिंचवड महापालिकेकडून उधार-उसनवारी करून पुण्यातील लसीकरण सुरू असल्याचं चित्र,

    – या पार्श्वभूमीवर पुणे महापालिकेला सार्वाजनिक आरोग्य खात्याने लशीचा हिशेब विचारलाय.


  • 14 Mar 2021 08:07 AM (IST)

    नागपुरात उद्यापासून 21 मार्चपर्यंत कडक लॉकडाऊन

    नागपुरात उद्या 15 मार्च पासून 21 मार्च पर्यंत लागणार कडक लॉक डाऊन

    लॉक डाऊन सफल करण्यासाठी पोलिसांनी कसली कंबर

    शहराच्या बाहेरून येणाऱ्या सीमा वर होणार कडक तपासणी

    शहरात 107 ठिकाणी राहणार नाका बंदी

    बिना कामाने शहरात फिरल्यास त्याच्यावर कडक कारवाई

    दुचाकी वर फक्त एक तर चार चाकी वाहनातून दोन लोकांना प्रवास करता येईल

  • 14 Mar 2021 07:50 AM (IST)

    ठाण्यातील कोणच्या नेत्यांची एनआयएकडून चौकशी?

    तब्बल 13 तास चौकशी केल्यानंतर सचिन वाझेंना रात्री 12 च्या सुमारास अटक करण्याचा निर्णय घेतला. एनआयएला सचिन वाझेंविरोधात काही तरी सबळ पुरावा मिळालाय, असा अंदाज बांधला जातोय. या प्रकरणी सचिन वाझे यांचे राजकीय नेत्यांसोबत आर्थिक संबंध असल्याचंही बोललं जातंय. या प्रकरणात आता इतरही अनेक नावं समोर येण्याची शक्यता आहे. एनआयए या प्रकरणी ठाण्यातील राजकिय नेत्यांचीही चौकशी करू शकते अशी सुत्रांची माहीती…

  • 14 Mar 2021 06:46 AM (IST)

    नाशिक शहरातील कोरोनाचा वाढता धोका, मनपा आयुक्त कैलास जाधव अॅक्शन मोडमध्ये

    नाशिक शहरातील कोरोनाचा वाढता धोका लक्षात मनपा आयुक्त कैलास जाधव ऍक्शन मोडवर
    – रस्त्यावर उतरून आयुक्तांची नियमांची पायमल्ली करणाऱ्यांवर कारवाईची धडक मोहीम
    – गंगापूर रोड परिसरातील हॉटेल पकवान,आणि कॉलेज रोड परिसरातील ग्रीन फिल्ड कृष्णा हॉटेलवर कारवाईचा बडगा
    – 50 टक्के क्षमतेने हॉटेल सुरू ठेवण्याचे आदेश तोडत तसेच सोशल डिस्टन्सचे नियम न पाळल्याने या दोन ही हॉटेल ला प्रत्येकी 5 हजार रुपयांचा ठोकला दंड
    – नियमांचं उल्लंघन केल्यास कठोर कारवाई करण्याचा मनपा आयुक्तांचा इशारा

  • 14 Mar 2021 06:46 AM (IST)

    नाशिक जिल्ह्यात कोरोना रुग्णांचा वाढता आलेख कायम

    नाशिक जिल्ह्यात कोरोना रुग्णांचा वाढता आलेख कायम
    – गेल्या 24 तासात पुन्हा 1522 रुग्णांची नव्याने भर,2 रुग्णांचा मृत्यू
    – अवघ्या 4 दिवसात 5 हजार 127 नवे बाधित
    – तर 682 रुग्णांना डिस्चार्ज
    – मृत्यूचा एकूण आकडा गेला 2168 वर
    – दररोजच्या वाढत्या रुग्णसंख्यमुळे प्रशासन आणखी अलर्ट

  • 14 Mar 2021 06:44 AM (IST)

    उद्धव ठाकरे आणि परमबीर सिंग प्रश्नांची उत्तरं द्या : किरीट सोमय्या

    सचिन वाझे यांना अटक झाल्यानंतरही भाजपचे माजी खासदार किरीट सोमय्या यांनी मुंबई पोलीस आयुक्त परमबीर सिंग आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर हल्लाबोल केला आहे.

    किरीट सोमय्या यांनी म्हटले की, सचिन वाझेची अटक झाली परंतु त्यांना वाचवणारे मुंबई पोलीस आयुक्त परमबीर सिंगला जबाब तर द्यावचा लागेल. त्यांनी सचिन वाझेंचा उल्लेख शिवसेनाचे प्रवक्ता ओसामा सचिन वाझे असा करत केला.