पॅनिक होऊ नका, सुरक्षेसाठी विधीमंडळाचं कामकाज आटोपलं: मुख्यमंत्री

| Updated on: Jul 05, 2019 | 4:22 PM

मुंबई: “अधिवेशनपेक्षा राज्याची सुरक्षा महत्वाची आहे. मात्र पॅनिक होण्याची अर्थात घाबरण्याची गरज नाही. महाराष्ट्राचे पोलीस महासंचालक, इंटेलिजन्स आणि कायदा सुरक्षेची माहिती घेतली आहे. सर्वपक्षीय बैठकीत याबाबतची माहिती दिली. त्यामुळे राज्याच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाचं कामकाज आटोपतं घेत आहोत”, अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत दिली. अधिवेशनाचं कामकाज आटोपतं घेत असलो तरी महत्त्वाचं कामकाज झालं आहे, असं मुख्यमंत्री […]

पॅनिक होऊ नका, सुरक्षेसाठी विधीमंडळाचं कामकाज आटोपलं: मुख्यमंत्री
Follow us on

मुंबई: “अधिवेशनपेक्षा राज्याची सुरक्षा महत्वाची आहे. मात्र पॅनिक होण्याची अर्थात घाबरण्याची गरज नाही. महाराष्ट्राचे पोलीस महासंचालक, इंटेलिजन्स आणि कायदा सुरक्षेची माहिती घेतली आहे. सर्वपक्षीय बैठकीत याबाबतची माहिती दिली. त्यामुळे राज्याच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाचं कामकाज आटोपतं घेत आहोत”, अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत दिली.

अधिवेशनाचं कामकाज आटोपतं घेत असलो तरी महत्त्वाचं कामकाज झालं आहे, असं मुख्यमंत्री म्हणाले.

पुलवामा हल्ल्यानंतर भारताने पाकिस्तानवर एअर स्ट्राईक करुन शेकडो दहशतवादी ठार केले. त्यानंतर पाकिस्तानकडूनही एअर स्ट्राईकचा प्रयत्न होत आहे. त्या पार्श्वभूमीवर देशाच्या विविध राज्यात हायअलर्ट जारी करण्यात आला आहे. मुंबईसह महाराष्ट्रातील प्रमुख शहरांतही हा अलर्ट देण्यात आला आहे.

असा अलर्ट असताना राज्यात सध्या अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरु आहे. त्यामुळे इथे मोठ्या प्रमाणात पोलीस सुरक्षेच्या कामकाजात अडकून आहेत. त्यामुळे राज्य सरकारने अधिवेशन मुदतीपूर्वीच संपवण्याचा निर्णय घेतला.  राज्य सरकारच्या या ठरावाला सर्वपक्षीयांनी एकमताने पाठिंबा दिला. पुढील अधिवेशन 17 जूनला सुरु होईल. हे विधानसभेचं पावसाळी अधिवेशन असेल.

महाराष्ट्राचे पोलीस महासंचालक, इंटेलिजन्स आणि कायदा सुरक्षेची माहिती सर्वपक्षीय बैठकीत दिली. सर्वपक्षीय बैठकीत अधिवेशन आटोपतं घेण्याचा निर्णय घेतला. कामकाज पूर्ण झाले आहे. अधिवेशनापेक्षा राज्याची सुरक्षा महत्वाची आहे, असं मुख्यमंत्र्यांनी सभागृहाला सांगितलं.

अंतर्गत सुरक्षा अबाधित  राखणे गरजेचं आहे. पॅनिक होण्याची स्थिती नाही, मात्र काळजी घेणे गरजेचेच आहे. 6 हजार पोलीस अधिवेशनाच्या सुरक्षेसाठी तैनात आहेत. त्यामुळे राज्याच्या सुरक्षेच्या दृष्टीने पोलिसांवरील भार कमी व्हावा आणि अन्य ठिकाणी सुरक्षा सज्ज व्हावी यादृष्टीने अधिवेशन आटोपतं घेत आहोत, असं मुख्यमंत्र्यांनी नमूद केलं.