मुंबई : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या (Maharashtra Cabinet Meeting) नेतृत्त्वात आज मंत्रिमंडळाची बैठक पार पडली. या बैठकीत ‘निसर्ग’ चक्रीवादळामुळे झालेल्या नुकसानीचा आढावा घेण्यात आला. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आज ‘निसर्ग’ चक्रीवादळबाधितांना (Cyclone Nisarga) वाढीव मदतीची घोषणा करण्याची (Maharashtra Cabinet Meeting) शक्यता आहे.
राज्य मंत्रिमंडळाची बैठक संपली, बैठकीत निसर्ग चक्रीवादळ नुकसानीचा आढावा, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे ‘निसर्ग’चक्रीवादळ बाधितांना वाढीव मदतीची घोषणा सोशल मीडियाच्या माध्यमातून करण्याची शक्यता @dineshdukhande @CMOMaharashtra pic.twitter.com/qsaVNWMFDS
— TV9 Marathi (@TV9Marathi) June 9, 2020
मंत्रिमंडळ बैठकीतील महत्त्वाचे निर्णय
Maharashtra Cabinet Meeting
शरद पवारांचा कोकण दौरा
राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार आज (9 जून) कोकण दौऱ्यावर आहेत. यावेळी त्यांनी थेट शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन त्यांच्याशी चर्चा केली आणि प्रश्न समजून घेतले. आज दिवसभर रायगड जिल्ह्यातील नुकसानीची पाहणी करणार आहेत. त्यांच्यासोबत सुनिल तटकरे, रायगडच्या पालकमंत्री आदिती तटकरे आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे इतर अनेक नेते आहेत.
Maharashtra Cabinet Meeting
संबंधित बातम्या :
शरद पवारांचा झंझावाती कोकण दौरा, नुकसानग्रस्तांना थेट बांधावर जाऊन धीर
मुख्यमंत्री केस-दाढी कुठे करतात? नाभिक समाजावर अन्याय का? : प्रसाद लाड